देवबंद चळवळ मराठी माहिती | Deoband Chalval Information in Marathi

देवबंद चळवळ मराठी माहिती,Deoband Chalval Information in Marathi, deoband chalval marathi mahiti, devband chalval information in marathi

देवबंद चळवळ मराठी माहिती Deoband Chalval Information in Marathi

TCS व IBPS, MPSC राज्यसेवा, PSI-STI-ASO, वनरक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरती, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती, आरोग्य भरती आणि इतर सर्व सरळसेवा स्पर्धा परीक्षांसाठी देवबंद चळवळ मराठी माहिती

भारतीय इतिहासात, विशेषतः आधुनिक भारताच्या इतिहासात, अनेक सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी झाल्या. यातील काही चळवळींनी समाजाला नवीन दिशा दिली, तर काहींनी जुन्या परंपरांचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला. अशीच एक महत्त्वपूर्ण चळवळ म्हणजे देवबंद चळवळ
ही चळवळ केवळ धार्मिक नव्हती, तर तिने भारतीय स्वातंत्र्य चळवळीतही महत्त्वाची भूमिका बजावली. स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासात देवबंद चळवळी विषयी थोडक्यात माहिती असणे आवश्यक आहे . या लेखात आपण देवबंद चळवळी विषयी मराठी माहिती, तिची उद्दिष्ट्ये आणि तिचा भारताच्या इतिहासावर झालेला परिणाम याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत .


देवबंद चळवळ स्थापना (Deoband Chalval Marathi Mahiti)

देवबंद चळवळ ही इस्लाम धर्माच्या धार्मिक व शैक्षणिक सुधारणांसाठी सुरू झालेली चळवळ होती . 1866 मध्ये उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील देवबंद येथे "दारुल उलूम देवबंद" ह्या इस्लामी शिक्षणसंस्थेची स्थापना मुहम्मद कासिम नानौतवी आणि रशीद अहमद गंगोही या दोन प्रमुख व्यक्तींनी केली . या संस्थेच्या माध्यमातून मुस्लिम समाजात धार्मिक शिक्षण, परंपरांचे जतन आणि ब्रिटिश सत्तेविरोधात राजकीय जागृती निर्माण करण्याचे कार्य झाले


देवबंद चळवळी विषयी थोडक्यात माहिती

  • ठिकाण : देवबंद, सहारनपूर जिल्हा, उत्तर प्रदेश
  • स्थापना : 1866
  • मुख्य संस्था : दारुल उलूम देवबंद
  • संस्थापक : मौलाना मुहम्मद कासिम नानौतवी व मौलाना रशीद अहमद गंगोही
  • मुख्य ध्येय : भारतातील मुस्लिमांमध्ये इस्लामी शिक्षणाचे पुनरुज्जीवन करणे , पाश्चात्त्य संस्कृतीचा प्रभाव कमी करणे , ब्रिटिश सत्तेविरोधात राजकीय जागृती निर्माण करणे


देवबंद चळवळीची प्रमुख उद्दिष्ट्ये

  • इस्लामी शिक्षणाचे पुनरुज्जीवन : कुराण व हदीस आधारित पारंपरिक शिक्षण देणे. यासाठी दारुल उलूम देवबंद या शिक्षण संस्थेची स्थापना
  • पाश्चात्त्य संस्कृतीचा विरोध : पाश्चात्त्य शिक्षण, संस्कृती व विचारांचा प्रभाव कमी करून पारंपरिक धार्मिक मूल्यांचे पालन
  • ब्रिटिश सत्तेला विरोध : भारतीय स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा देणे व मुस्लिम समाजाला एकत्र आणणे
  • सामाजिक व धार्मिक सुधारणा : मुस्लीम समाजातील अंधश्रद्धा व वाईट प्रथांचा विरोध


देवबंद चळवळीचे योगदान

  • शैक्षणिक योगदान : दारुल उलूम देवबंद आजही एक महत्त्वाची इस्लामी शिक्षण संस्था असून हजारो विद्यार्थ्यांना धार्मिक शिक्षण देण्यात पुढाकार.
  • राजकीय योगदान : देवबंद चळवळीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला समर्थन दिले. मौलाना हुसैन अहमद मदनी यांनी द्विराष्ट्र सिद्धांताला विरोध करून अखंड भारताची बाजू मजबूत केली . ( 👉 लक्षात ठेवा - महमूद उल हसन यांनी नेतृत्व स्वीकारल्यापासून या चळवळीला राजकीय स्वरूप प्राप्त झाले )
  • सांस्कृतिक योगदान : मुस्लीम समाजात धार्मिक ओळख, परंपरा व मूल्ये जपण्यास मदत.


देवबंद चळवळीचे परीणाम

१. धार्मिक आणि शैक्षणिक परिणाम

  • इस्लामिक शिक्षणाचा प्रसार : देवबंद चळवळीने दारुल उलूम देवबंद या संस्थेची स्थापना केली, जी आज जगातील सर्वात मोठ्या इस्लामी शिक्षण संस्थांपैकी एक आहे. या संस्थेने पारंपरिक इस्लामी शिक्षण पद्धतीवर भर दिला.
  • गैर-इस्लामिक प्रथांचा विरोध : या चळवळीने मुस्लीम समाजात प्रचलित असलेल्या अनेक रूढी, गैरसमज आणि हिंदू धर्माच्या प्रभावामुळे आलेल्या प्रथांना विरोध केला.
  • शुद्ध इस्लामचे पुनरुज्जीवन : १८५७ च्या उठावानंतर मुस्लिमांच्या धार्मिक आणि नैतिक अधोगतीला तोंड देण्यासाठी, या चळवळीने कुराण आणि हदीस यांवर आधारित शुद्ध इस्लामच्या शिकवणीवर भर दिला.

२. राजकीय परिणाम

  • ब्रिटिशविरोधी भूमिका: देवबंद चळवळ ही सुरुवातीपासूनच ब्रिटिश राजवटीच्या विरोधात होती. त्यांनी १८५७ च्या उठावातील पराभवाला ब्रिटिशांची सत्ता जबाबदार मानले.
  • भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला पाठिंबा : देवबंदच्या काही नेत्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला पाठिंबा दिला. १९१९ मध्ये देवबंदी विद्वानांनी जमियत उलमा-ए-हिंद या राजकीय पक्षाची स्थापना केली, ज्याने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
  • अलिगढ चळवळीला विरोध : सर सय्यद अहमद खान यांच्या नेतृत्वाखालील अलिगढ चळवळ पाश्चात्त्य शिक्षण आणि ब्रिटिश सरकारशी सहकार्यावर भर देत होती. देवबंद चळवळीने या विचाराला विरोध केला, कारण त्यांना वाटत होते की यामुळे मुस्लिमांची धार्मिक ओळख धोक्यात येईल.
  • द्वि-राष्ट्र सिद्धांताला विरोध : देवबंद चळवळीने फाळणीच्या वेळी पाकिस्तान निर्मितीच्या मागणीला आणि द्वि-राष्ट्र सिद्धांताला विरोध केला. ते एकसंध भारताचे पुरस्कर्ते होते.

३. सामाजिक परिणाम

  • सामाजिक ऐक्य : या चळवळीने मुस्लिमांना त्यांच्या धार्मिक आणि सामाजिक कर्तव्यांची जाणीव करून दिली, ज्यामुळे समाजात एकसंधता वाढली.
  • सामाजिक सुधारणा : त्यांनी मुस्लीम समाजात सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा भर प्रामुख्याने धार्मिक शिक्षणावर असल्याने आधुनिक सामाजिक सुधारणांना फारसे महत्त्व दिले नाही.

एकूणच, देवबंद चळवळीने भारतीय मुस्लिमांमध्ये धार्मिक आणि राजकीय जागृती निर्माण केली. त्यांनी ब्रिटिश सत्तेला विरोध करत पारंपरिक इस्लामी शिक्षणावर भर दिला, तर दुसरीकडे अलिगढ चळवळीने आधुनिक शिक्षणाचे समर्थन केले.

👉 लक्षात ठेवा - 1888 मध्ये या चळवळीच्या प्रभावातूनच भारतीय राजभक्त सभा व मुस्लिम अँग्लो ओरिएंटल सभा स्थापन झाली . संस्थापक - सर सय्यद अहमद खान


MPSC व इतर स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे मुद्दे

  • देवबंद चळवळीची स्थापना कोणी केली ? – मुहम्मद कासिम नानौतवी आणि रशीद अहमद गंगोही
  • देवबंद चळवळ कधी सुरू झाली ? – 1866 मध्ये
  • देवबंद चळवळीची मुख्य संस्था कोणती ? – दारुल उलूम देवबंद
  • देवबंद चळवळीचा मुख्य उद्देश काय ? – धार्मिक शिक्षणाचे पुनरुज्जीवन आणि ब्रिटिशविरोधी भूमिका


देवबंद चळवळ ही केवळ धार्मिक चळवळ नव्हती, तर तिने भारतीय मुस्लिमांना धार्मिक तसेच राजकीयदृष्ट्या जागृत केले. या चळवळीने भारतीय स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली आणि आजही तिचा प्रभाव दिसून येतो. MPSC च्या तयारीसाठी, या विषयातील स्थापना, उद्दिष्ट्ये, प्रमुख व्यक्ती आणि योगदान हे मुद्दे नक्की लक्षात ठेवा . या घटकावर हमखास प्रश्न विचारले जातात .‌...

Post a Comment

Previous Post Next Post