बाबा पद्मनजी यांच्या जीवन कार्यावर आधारित प्रश्न उत्तर | Baba Padmanji Question Answer in Marathi

Baba Padmanji Question Answer in Marathi, Baba Padmanji MCQ, Baba Padmanji Prashn Uttar, बाबा पद्मनजी प्रश्न उत्तर, Baba Padmanji mahiti


Baba Padmanji Question Answer MCQ Quiz In Marathi


मराठी साहित्य आणि समाजसुधारणाच्या इतिहासात बाबा पद्मनजी यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे . त्यांच्या लेखणीतून त्या काळातील अंधश्रद्धा, अपमानजनक रूढी आणि समाजातील अन्याय यांचा विरोध दृष्टिगोचर होतो. त्यांच्या कार्यामुळे मराठी समाजातील चेतना जागृत झाली आणि स्त्री-पुरुष समानतेच्या स्वरूपाला बळ मिळाले

Baba Padmanji Question In Marathi : या ब्लॉग पोस्टमध्ये आम्ही बाबा पद्मनजी यांच्या जीवनावर आधारित 10+ बहु-निवडक प्रश्नांचा (MCQ) संच तयार केला आहे. हे प्रश्न स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी तसेच सामान्य ज्ञान सुधारण्यासाठी उपयुक्त ठरतील

Baba Padmanji Question Answer in Marathi, Baba Padmanji MCQ, Baba Padmanji Prashn Uttar, बाबा पद्मनजी प्रश्न उत्तर, Baba Padmanji mahiti

बाबा पद्मनजी

Gk Question : 1
बाबा पद्मनजी यांचा जन्म कधी झाला ?
▪️ 1857
▪️ 1826
▪️ 1831
▪️ 1836
Correct Answer: 1831
Gk Question : 2
बाबा पद्मनजी यांचे संपूर्ण नाव काय होते ?
▪️ हरिपंत गोपाळ सुरतकर
▪️ रामचंद्र विठ्ठल पार्सेकर
▪️ पद्मनजी माणिकजी मुळे
▪️ बाबा पद्मनजी मुळे
Correct Answer: बाबा पद्मनजी मुळे
Gk Question : 3
बाबा पद्मनजी यांनी खालीलपैकी काय केले नाही , असे सांगता येईल
अ ) त्यांनी 1884 मध्ये अरुणोदय हे आत्मचरित्र लिहिले
ब ) दादोबा पांडुरंग तर्खडकर यांच्या परमहंस सभेमध्ये त्यांचा सहभाग होता
क ) त्यांनी महात्मा फुले यांच्या सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथास प्रस्तावना दिली
ड ) स्त्री शिक्षणाचे महत्त्व समाजाला पटवून देण्यासाठी 1857 मध्ये यमुना पर्यटन ही कादंबरी लिहिली
▪️ फक्त ब
▪️ अ , क आणि ड
▪️ क आणि ड
▪️ वरील सर्व
Correct Answer: क आणि ड
Gk Question : 4
विधवा स्त्रियांच्या दुःख स्थितीचे विदारक दर्शन समाजाला घडविण्यासाठी ' यमुना पर्यटन ' ही कादंबरी कोणी लिहिली ?
▪️ महात्मा फुले
▪️ महर्षी कर्वे
▪️ बाबा पद्मनजी
▪️ विष्णुबुवा ब्रह्मचारी
Correct Answer: बाबा पद्मनजी
Gk Question : 5
बाबा पद्मनजी यांचे आत्मचरित्र कोणते ?
▪️ आत्मवृत्त
▪️ ना खंत - ना खेद
▪️ यमुना पर्यटन
▪️ अरुणोदय
Correct Answer: अरुणोदय
Gk Question : 6
बाबा पद्मनजी यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार कधी केला ?
▪️ 23 जून 1861
▪️ 21 ऑक्टोबर 1857
▪️ 26 सप्टेंबर 1840
▪️ 13 ऑगस्ट 1854
Correct Answer: 13 ऑगस्ट 1854
Gk Question : 7
महात्मा फुलेंच्या कोणत्या ग्रंथास बाबा पद्मनजी यांनी प्रस्तावना दिली आहे?
▪️ ब्राह्मणांचे कसब
▪️ सार्वजनिक सत्यधर्म
▪️ गुलामगिरी
▪️ शेतकऱ्यांचा आसूड
Correct Answer: ब्राह्मणांचे कसब
Gk Question : 8
बाबा पद्मनची यांच्या संदर्भात चुकीचे विधान/ने असलेला पर्याय निवडा
1 ) ते काही काळ परमहंस सभेचे सभासद होते
2 ) मूर्तीपूजा व जातीभेद या गोष्टींना त्यांचा विरोध होता
3 ) त्यांनी काही काळाकरिता सत्यदीपिका हे नियतकालिक चालविले
4 ) त्यांनी आत्मवृत्त हे आत्मचरित्र लिहिले
▪️ फक्त 2
▪️ फक्त 4
▪️ 1 , 3 आणि 4
▪️ वरीलपैकी एकही नाही
Correct Answer: फक्त 4
Gk Question : 9
बाबा पद्मनजी यांचे मूळ आडनाव काय होते ?
▪️ मुळे
▪️ कासार
▪️ सुरतकर
▪️ कदम
Correct Answer: मुळे
लक्षात ठेवा : बाबा पद्मनजी यांचे मूळ आडनाव मुळे होते , परंतु त्यांचे पूर्वज सुरत येथे व्यापारानिमित्त आले होते , यामुळे त्यांना सुरतकर हे आडनाव मिळाले
Gk Question : 10
बाबा पद्मनजी यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटनांचा योग्य चढता क्रम लावा
1 ) फ्री चर्च मिशनचे पालक म्हणून दीक्षा घेतली
2 ) ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला
3 ) अरुणोदय हे आत्मचरित्र लिहिले
4 ) यमुना पर्यटन ही कादंबरी लिहिली
▪️ 4 , 3 , 2 , 1
▪️ 3 , 4 , 1 , 2
▪️ 2 , 1 , 4 , 3
▪️ 1 , 2 , 3 , 4
Correct Answer: 2 , 1 , 4 , 3
Gk Question : 11
मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी यमुना पर्यटन चे लेखक कोण
▪️ बाळशास्त्री जांभेकर
▪️ अण्णाभाऊ साठे
▪️ बाबा पद्मनजी
▪️ वि वा शिरवाडकर
Correct Answer: बाबा पद्मनजी
Gk Question : 12
बाबा पद्मनजी यांचा जन्म कोठे झाला ?
▪️ सुरत
▪️ रत्नागिरी
▪️ बेळगाव
▪️ मुंबई
Correct Answer: बेळगाव

Your Score

Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /

Post a Comment

Previous Post Next Post