कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विषयी प्रश्न उत्तर | Karmveer Bhaurao Patil Question Answer in Marathi | MCQ Quiz Question

 Karmaveer Bhaurao Patil Question Answer in Marathi, Karmaveer Bhaurao Patil MCQ, Karmaveer Bhaurao Patil Prashn Uttar, कर्मवीर भाऊराव पाटील प्रश्न उत्तर, Karmaveer Bhaurao Patil mahiti

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनावर आधारित
सराव प्रश्नसंच


Karmaveer Bhaurao Patil Question Answer In Marathi


शिक्षणाच्या क्षेत्रातील अपार कार्यामुळे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे . गरीब आणि वंचित मुलांसाठी शिक्षणाची दारे खुली केली

त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन करून ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार केला . “Earn and Learn” (कमवा आणि शिका) या त्यांच्या संकल्पनेमुळे हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आणि स्वावलंबी जीवन जगण्याचा मार्ग निवडला. त्यांचे कार्य समाजातील शैक्षणिक परिवर्तनाचे प्रतीक आहे

Karmaveer Bhaurao Patil Question In Marathi : या ब्लॉग पोस्टमध्ये आम्ही कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनावर आधारित 25+ बहु-निवडक प्रश्नांचा (MCQ) संच तयार केला आहे. हे प्रश्न स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी तसेच सामान्य ज्ञान वृद्धीसाठी उपयुक्त ठरतील.

Karmaveer Bhaurao Patil Question Answer in Marathi, Karmaveer Bhaurao Patil MCQ, Karmaveer Bhaurao Patil Prashn Uttar, कर्मवीर भाऊराव पाटील प्रश्न उत्तर, Karmaveer Bhaurao Patil mahiti

कर्मवीर भाऊराव पाटील

Gk Question : 1
आधुनिक भागीरथ म्हणून ओळखले जाणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कधी झाला ?
▪️ 20 सप्टेंबर 1887
▪️ 21 सप्टेंबर 1887
▪️ 22 सप्टेंबर 1887
▪️ 23 सप्टेंबर 1887
Correct Answer: 22 सप्टेंबर 1887
GK Question : 2
कर्मवीर भाऊराव पाटील कोणत्या समाजाचे होते ?
▪️ जैन समाज
▪️ ब्राह्मण समाज
▪️ बहुजन समाज
▪️ मराठा समाज
Correct Answer: जैन समाज
Gk Question : 3
कर्मवीर भाऊराव पाटील यांचे मूळ गाव कोणते ?
▪️ ऐतवडे ( सांगली )
▪️ मुळबिंद्री ( विजापूर )
▪️ पावस ( रत्नागिरी )
▪️ निफाड ( नाशिक )
Correct Answer: ऐतवडे ( सांगली )
Gk Question : 4
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पत्नीचे नाव काय ?
▪️ यशोदाबाई
▪️ गंगाबाई
▪️ लक्ष्मीबाई
▪️ हिराबाई
Correct Answer: लक्ष्मीबाई ( लक्ष्मीबाई उर्फ आदाक्का , संपूर्ण नाव - लक्ष्मीबाई आण्णाराव पाटील )
लक्ष्मीबाई ( लक्ष्मीबाई उर्फ आदाक्का , संपूर्ण नाव - लक्ष्मीबाई आण्णाराव पाटील )
Gk Question : 5
कर्मवीर भाऊराव पाटील यांचे मूळ आडनाव काय होते ?
▪️ कदम
▪️ पवार
▪️ देसाई
▪️ देशमुख
Correct Answer: देसाई
Gk Question : 6
स्वावलंबन , स्वाभिमान , स्वाध्याय व स्वातंत्र्य ही खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाची शिक्षणाची चतुःसूत्री होती ?
▪️ महात्मा फुले
▪️ महर्षी कर्वे
▪️ दादाभाई नौरोजी
▪️ कर्मवीर भाऊराव पाटील
Correct Answer: कर्मवीर भाऊराव पाटील
Gk Question : 7
कर्मवीर भाऊराव पाटील यांचे पूर्ण नाव काय होते ?
▪️ भाऊराव देवगौंडा पाटील
▪️ भाऊराव आण्णासाहेब पाटील
▪️ भाऊराव माधवराव पाटील
▪️ भाऊराव पायगोंडा पाटील
Correct Answer: भाऊराव पायगोंडा पाटील
Gk Question : 8
कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कोठे झाला ?
▪️ उंब्रज ( सातारा )
▪️ दापोली ( रत्नागिरी )
▪️ वाळवा ( सांगली )
▪️ कुंभोज ( कोल्हापूर )
Correct Answer: कुंभोज ( कोल्हापूर )
Gk Question : 9
22 सप्टेंबर - ' श्रमप्रतिष्ठा दिवस ' हा कोणत्या महापुरुषाचा जन्मदिवस आहे ?
▪️ कर्मवीर भाऊराव पाटील
▪️ बाबासाहेब आंबेडकर
▪️ महात्मा गांधी
▪️ शाहू महाराज
Correct Answer: कर्मवीर भाऊराव पाटील
Gk Question : 10
कमवा व शिका या पद्धतीने शिक्षणाचा प्रसार करणारे समाज सुधारक कोण ?
▪️ महर्षी कर्वे
▪️ डॉ . कर्मवीर भाऊराव पाटील
▪️ राजर्षी शाहू महाराज
▪️ डॉ . बाबासाहेब आंबेडकर
Correct Answer: डॉ . कर्मवीर भाऊराव पाटील
Gk Question : 11
रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली ?
▪️ डॉ . पंजाबराव देशमुख
▪️ महर्षी कर्वे
▪️ डॉ . कर्मवीर भाऊराव पाटील
▪️ राजर्षी शाहू महाराज
Correct Answer: डॉ . कर्मवीर भाऊराव पाटील
Gk Question : 12
कर्मवीर भाऊराव पाटील यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते ?
▪️ दादा
▪️ आण्णा
▪️ नाना
▪️ आबा
Correct Answer: आण्णा
Gk Question : 13
कर्मवीर भाऊराव पाटील यांना कर्मवीर ही पदवी कोणी दिली ?
▪️ तुकडोजी महाराज
▪️ शाहू महाराज
▪️ महात्मा गांधी
▪️ गाडगे बाबा
Correct Answer: गाडगे बाबा
Gk Question : 14
स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे घोषवाक्य कोणत्या शिक्षण संस्थेचे आहे ?
▪️ स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था
▪️ रयत शिक्षण संस्था
▪️ शिवाजी शिक्षण संस्था
▪️ नव महाराष्ट्र शिक्षण संस्था
Correct Answer: रयत शिक्षण संस्था
Gk Question : 15
तुम्ही आम्हाला पडकी जमीन द्या आम्ही तेथे सोने उगवू - हे उद्गार कोणी काढले ?
▪️ कर्मवीर भाऊराव पाटील
▪️ आण्णा भाऊ साठे
▪️ डॉ पंजाबराव देशमुख
▪️ महर्षी कर्वे
Correct Answer: कर्मवीर भाऊराव पाटील
GK Question : 16
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या मुलाचे नाव काय होते ?
▪️ आप्पासाहेब
▪️ मोहनचंद
▪️ गोविंद
▪️ यशवंत
Correct Answer: आप्पासाहेब
Gk Question : 17
वटवृक्ष हे पुढीलपैकी कोणत्या शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह आहे ?
▪️ शिवछत्रपती शिक्षण संस्था
▪️ संत गाडगेबाबा शिक्षण संस्था
▪️ मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्था
▪️ रयत शिक्षण संस्था
Correct Answer: रयत शिक्षण संस्था
Gk Question : 18
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या वडिलांचे नाव काय ?
▪️ पायगौंडा
▪️ देवगौंडा
▪️ नालगौंडा
▪️ बालगौंडा
Correct Answer: पायगौंडा ( पायगौंडा देवगौंडा पाटील )
Gk Question : 19
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना बिनव्याजी कर्जाऊ पैसा देण्यासाठी कोणता फंड सुरू केला ?
▪️ दक्षिणा प्राइज फंड
▪️ लक्ष्मीबाई पाटील मेमोरियल एज्युकेशन फंड
▪️ कमवा व शिका फंड
▪️ मुष्ठी फंड
Correct Answer: लक्ष्मीबाई पाटील मेमोरियल एज्युकेशन फंड
Gk Question : 20
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना कधी केली ?
▪️ 4 ऑक्टोबर 1907
▪️ 4 ऑक्टोबर 1910
▪️ 4 ऑक्टोबर 1919
▪️ 4 ऑक्टोबर 1921
Correct Answer: 4 ऑक्टोबर 1919
Gk Question : 21
भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या संस्था व स्थापना वर्ष यांची अचूक जोडी/ड्या असणारा योग्य पर्याय निवडा ?
1) रयत शिक्षण संस्था - 1919
2) छत्रपती शिवाजी कॉलेज - 1947
3) दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळ - 1910
4) सिल्वर ज्युबिली रुरल ट्रेनिंग कॉलेज - 1935
▪️ 1 आणि 4
▪️ फक्त 3
▪️ 1 , 2 आणि 3
▪️ वरील सर्व
Correct Answer: वरील सर्व
Gk Question : 22
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आईचे नाव काय होते ?
▪️ माकूबाई
▪️ जिजाबाई
▪️ हौसाबाई
▪️ गंगामाई
Correct Answer: गंगामाई
Gk Question : 23
दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन करण्यास कर्मवीर भाऊराव पाटील यांना कोणी सहकार्य केले ?
▪️ भाऊसाहेब कुदळे
▪️ मद्वाण्णा मास्तर
▪️ नानासाहेब खेडेकर
▪️ वरील सर्व
Correct Answer: वरील सर्व
Gk Question : 24
20 जानेवारी 1959 रोजी राष्ट्रपतींचे हस्ते कोणत्या पुरस्काराने कर्मवीर भाऊराव पाटील यांना सन्मानित करण्यात आले ?
▪️ पद्मभूषण
▪️ पद्मश्री
▪️ पद्मविभूषण
▪️ भारतरत्न
Correct Answer: पद्मभूषण
Gk Question : 25
खालीलपैकी कोणते विधान कर्मवीर भाऊराव पाटीलांशी संबंधित नाही ?
▪️ भाऊराव पाटलांना पुणे विद्यापीठाने गुरु म्हणून संबोधले
▪️ साताऱ्यातील दुधगाव येथे शाळा काढून त्यांनी त्यांच्या शैक्षणिक कार्याची सुरुवात केली
▪️ त्यांनी विजयी मराठा या वृत्तपत्राचे संपादक पद भूषविले
▪️ महात्मा गांधी ग्रामीण विद्यापीठ हे भाऊराव पाटलांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न आहे
Correct Answer: साताऱ्यातील दुधगाव येथे शाळा काढून त्यांनी त्यांच्या शैक्षणिक कार्याची सुरुवात केली
हे विधान चुकीचे आहे कारण दुधगाव हे ठिकाण सातारा जिल्ह्यात नसून सांगली जिल्ह्यात आहे.
Gk Question : 26
कर्मवीर भाऊराव पाटील यांचे निधन कधी झाले ?
▪️ 9 मे 1961
▪️ 9 मे 1960
▪️ 9 मे 1959
▪️ 9 मे 1958
Correct Answer: 9 मे 1959
Gk Question : 27
कर्मवीर भाऊराव पाटील यांचे निधन कोठे झाले ?
▪️ मुंबई
▪️ पुणे
▪️ कोल्हापूर
▪️ सातारा
Correct Answer: पुणे
कर्मवीर भाऊराव पाटील यांचे वयाच्या 71 व्या वर्षी पुणे येथील ससून रुग्णालयात हृदयविकाराने निधन झाले.

Your Score

Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /

Post a Comment

Previous Post Next Post