लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रश्न उत्तर | Annabhau Sathe MCQ Questions Answer in Marathi | Annabhau Sathe Quiz

Annabhau Sathe MCQ Quiz | अण्णा भाऊ साठे प्रश्न उत्तर स्पर्धा परीक्षेसाठी

अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित प्रश्न - उत्तर


Annabhau Sathe Question Answer MCQ Quiz In Marathi


Annabhau Sathe Question In Marathi : या ब्लॉग पोस्टमध्ये, आम्ही अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित बहु-निवडक प्रश्नांचा (MCQ) संच तयार केला आहे. हे प्रश्न विशेषत: तुम्हाला विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारी करिता मदत करण्यासाठी तयार केले गेले आहेत, जिथे महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण समाजसुधारकांबद्दल माहिती असणे हे महत्त्वाचे आहे

अण्णा भाऊ साठे प्रश्न उत्तर, annabhau sathe prashn uttar,अण्णा भाऊ साठे प्रश्नमंजुषा , annabhau sathe question answer, annabhau sathe MCQ in marathi,annabhau sathe, Quiz On annabhau Sathe,अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा

Annabhau Sathe Quiz

Question : 1
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा जन्म कधी झाला ?
▪️ 1 ऑगस्ट 1920
▪️ 9 ऑगस्ट 1920
▪️ 14 ऑगस्ट 1920
▪️ 26 ऑगस्ट 1920
Correct Answer: 1 ऑगस्ट 1920
Question : 2
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे संपूर्ण नाव काय ?
▪️ मारूती बापू साठे
▪️ तुकाराम भाऊराव साठे
▪️ अण्णाभाऊ तुकाराम साठे
▪️ पांडुरंग सदाशिव साठे
Correct Answer: तुकाराम भाऊराव साठे
Question : 3
अण्णा भाऊ साठे यांच्या आईचे नाव काय होते ?
▪️ गंगाबाई
▪️ पुतळाबाई
▪️ चिमणाबाई
▪️ वालुबाई
Correct Answer: वालुबाई
Question : 4
मानवतावादी विचारवंत म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात कोणाला ओळखले जाते ?
▪️ अण्णा भाऊ साठे
▪️ डॉ बाबासाहेब आंबेडकर
▪️ महात्मा फुले
▪️ साने गुरुजी
Correct Answer: अण्णा भाऊ साठे
Question : 5
" पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती कामकऱ्याच्या , कष्टकऱ्यांच्या हातावर तरली आहे " असे स्पष्ट विचार कोणी व्यक्त केले ?
▪️ श्रीपाद अमृत डांगे
▪️ नारायण मल्हार जोशी
▪️ अण्णा भाऊ साठे
▪️ महात्मा गांधी
Correct Answer: अण्णा भाऊ साठे
Question : 6
अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेली ' अग्निदिव्य ' ही कादंबरी कोणाच्या जीवनावर आधारित आहे ?
▪️ तानाजी मालुसरे
▪️ प्रतापराव गुजर
▪️ हंबीरराव मोहिते
▪️ नेताजी पालकर
Correct Answer: प्रतापराव गुजर
अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेली अग्निदिव्य ही कादंबरी सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या जीवनावर आधारित आहे.
Question : 7
' माझा रशियातील प्रवास ' हे प्रवासवर्णन कोणाचे आहे ?
▪️ स्वातंत्र्यवीर सावरकर
▪️ सुभाष चंद्र बोस
▪️ स्वामी विवेकानंद
▪️ लोकशाहीर अण्णा भाऊ साठे
Correct Answer: लोकशाहीर अण्णा भाऊ साठे
Question : 8
अण्णा भाऊ साठे यांनी साम्यवादी विचाराचा प्रसार करण्यासाठी खालील कलाप्रकाराचा प्रभावीपणे वापर केला ?
▪️ नाटक
▪️ भाषण
▪️ लावणी
▪️ किर्तन
Correct Answer: नाटक
Question : 9
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची प्रसिद्ध कादंबरी कोणती ?
▪️ चित्रा
▪️ फकीरा
▪️ रानगंगा
▪️ अग्निदिव्य
Correct Answer: फकीरा
Question : 10
1944 मध्ये दत्ता गव्हाणकर आणि शाहीर अमर शेख या शाहिरांच्या सोबत आण्णा भाऊ साठे यांनी कोणते कलापथक स्थापन केले ?
▪️ लालबावटा कलापथक
▪️ छत्रपती मेळा कलापथक
▪️ प्रबोधनकार कलापथक
▪️ शाहिरी कलापथक
Correct Answer: लालबावटा कलापथक
Question : 11
मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील वर्णन करताना ' जसे गरुडाला पंख असतात आणि वाघाला नखं ' असे वर्णन कोणत्या कवीने केले ?
▪️ शाहीर अमर शेख
▪️ प्रल्हाद केशव अत्रे
▪️ अण्णा भाऊ साठे
▪️ दत्ता गव्हाणकर
Correct Answer: अण्णा भाऊ साठे
Question : 12
अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेली ------------- ही लावणी ( छक्कड ) संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे प्रेरणागीत ठरली ?
▪️ अहो काय बोलायचं
▪️ जग हे गंमत
▪️ सुंदर मी होणार
▪️ माझी मैना
Correct Answer: माझी मैना
Question : 13
पुढीलपैकी कोणती कादंबरी अण्णा भाऊ साठे यांनी लिहिली नाही ?
▪️ वैर
▪️ बारी
▪️ फुलपाखरू
▪️ अहंकार
Correct Answer: बारी
Question : 14
मॅक्झीम गार्की या साम्यवादी लेखकाच्या लेखनीने प्रभावित झालेल्या समाज सुधारकाचे नाव काय ?
▪️ अण्णा भाऊ साठे
▪️ महात्मा फुले
▪️ स्वातंत्र्यवीर सावरकर
▪️ सेनापती बापट
Correct Answer: अण्णा भाऊ साठे
Question : 15
अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेली पहिली कादंबरी कोणती ?
▪️ अग्निदिव्य
▪️ फकीरा
▪️ वारणेच्या खोऱ्यात
▪️ चित्रा
Correct Answer: वारणेच्या खोऱ्यात
लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांनी एकूण 14 लोकनाट्य, 12 पोवाडे, 5 लावण्या, 18 कथासंग्रह, 33 कादंबऱ्या, 3 नाटके व 1 प्रवासवर्णन लिहिली आहेत. 'वारणेच्या खोऱ्यात' (1948) ही त्यांची पहिली कादंबरी आहे.
Question : 16
अण्णा भाऊ साठे यांच्या संदर्भात काय खरे आहे ?
1) त्यांनी लाल - बावटा कलापथक स्थापन केले
2) त्यांच्यावर साम्यवादी विचारसरणीचा प्रभाव होता
3) त्यांना दलित साहित्याचे संस्थापक म्हणून ओळखले जाते
▪️ फक्त 2
▪️ 1 आणि 3
▪️ फक्त 3
▪️ वरील सर्व
Correct Answer: वरील सर्व
Question : 17
आण्णा भाऊ साठे यांचा मृत्यू कधी झाला ?
▪️ 15 जुलै 1969
▪️ 18 जुलै 1969
▪️ 21 जुलै 1969
▪️ 24 जुलै 1969
Correct Answer: 18 जुलै 1969
Question : 18
लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांचा जन्म कोठे झाला ?
▪️ वाटेगाव ( वाळवा )
▪️ बामणी ( खानापूर )
▪️ फकीरवाडी ( शिराळा )
▪️ बोरगाव ( तासगाव )
Correct Answer: 1 ऑगस्ट 1920 , वाटेगाव ( ता.वाळवा , जि.सांगली )
1 ऑगस्ट 1920 , वाटेगाव ( ता.वाळवा , जि.सांगली )
Question : 19
पुढीलपैकी कोणती कादंबरी अण्णा भाऊ साठे यांनी लिहिली नाही ?
▪️ अग्निदिव्य
▪️ अलगुज
▪️ मथुरा
▪️ मृत्युंजय
Correct Answer: मृत्युंजय
"मृत्युंजय" ही प्रसिद्ध मराठी कादंबरी शिवाजी सावंत यांनी लिहिली आहे. ही कादंबरी महाभारतातील कर्णाच्या जीवनावर आधारित आहे . त्याचबरोबर 'छावा' आणि 'युगंधर' ह्या शिवाजी सावंत यांच्या प्रमुख कादंबऱ्या आहेत
GK Question : 20
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार कोणत्या समाजातील कलावंत, साहित्यिक व समाजसेवक यांना दिला जातो ?
▪️ मातंग समाज
▪️ भिल्ल समाज
▪️ धनगर समाज
▪️ वरील सर्व
Correct Answer: मातंग समाज
GK Question : 21
महाराष्ट्र सरकार तर्फे दिला जाणारा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार ही योजना कोणत्या तारखेपासून कार्यान्वित आहे ?
▪️ 19 जुलै 1973
▪️ 19 जुलै 1997
▪️ 19 जुलै 2002
▪️ 19 जुलै 2005
Correct Answer: 19 जुलै 1997

Your Score

Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /

Post a Comment

Previous Post Next Post