
सयाजीराव गायकवाड यांच्या जीवनावर आधारित प्रश्न - उत्तर
Sayajirao Gaikwad Question Answer MCQ Quiz In Marathi
Sayajirao Gaikwad Question Answer In Marathi : या ब्लॉग पोस्टमध्ये, आम्ही सयाजीराव गायकवाड यांच्या जीवनावर आधारित बहु-निवडक प्रश्नांचा (MCQ) संच तयार केला आहे .
हे प्रश्न विशेषत: तुम्हाला विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारी करिता मदत करण्यासाठी तयार केले गेले आहेत, जिथे महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण समाजसुधारकांबद्दल माहिती असणे हे महत्त्वाचे आहे
हे प्रश्न विशेषत: तुम्हाला विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारी करिता मदत करण्यासाठी तयार केले गेले आहेत, जिथे महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण समाजसुधारकांबद्दल माहिती असणे हे महत्त्वाचे आहे
Sayajirao Gaikwad Quiz
GK Question : 1
महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा जन्म कधी व कोठे झाला ?
Correct Answer: 11 मार्च 1863, कवळाणे (नाशिक)
GK Question : 2
महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे मूळ नाव काय ?
Correct Answer: गोपाळराव
27 मे 1875 रोजी बडोदा संस्थानाचे राजे खंडेराव गायकवाड यांच्या निधनानंतर त्यांची विधवा पत्नी जमनाबाई यांनी काशिराव गायकवाड यांचा मुलगा गोपाळराव यांना दत्तक घेऊन त्यांचे नाव 'सयाजीराव' असे ठेवले.
GK Question : 3
महाराजा सयाजीराव गायकवाड हे कोणत्या संस्थानाचे अधिपती होते ?
Correct Answer: बडोदा
GK Question : 4
महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या हाती बडोदा संस्थानाच्या प्रशासनाची सूत्रे केव्हा आली ?
Correct Answer: 20 डिसेंबर 1881
GK Question : 5
'हिंदुस्थानातील शेवटचा आदर्श राजा' या शब्दात महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा गौरव कोणी केला?
Correct Answer: पंडित मदनमोहन मालवीय
GK Question : 6
खालीलपैकी कोणी सयाजीराव गायकवाड यांच्या प्रेरणेने 'श्री सयाजी विजय' या नावाचे वृत्तपत्र सुरू केले ?
Correct Answer: दामोदर यंदे
GK Question : 7
इ.स. 1918 च्या मुंबई येथील अस्पृश्यता निवारण परिषदेचे अध्यक्ष कोण होते ?
Correct Answer: महाराजा सयाजीराव गायकवाड
GK Question : 8
महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी 'दलितांचा मुक्तिदाता' या शब्दात कोणाचा यथार्थ गौरव केला ?
Correct Answer: डॉ बाबासाहेब आंबेडकर
GK Question : 9
प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे भारतातील पहिले संस्थान म्हणून कोणत्या संस्थानास ओळखले जाते ?
Correct Answer: बडोदा संस्थान
GK Question : 10
महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी संस्थानात लागू केलेले कायदे यांचा योग्य कालानुक्रम लावा ? अ) विधवा विवाह व धर्म स्वातंत्र्य कायदा ब) विवाह नोंदणी कायदा क) बालविवाह प्रतिबंध कायदा ड) पुरोहित कायदा
Correct Answer: अ, क, ब, ड
विधवा विवाह व धर्म स्वातंत्र्य कायदा - 1901-02, विवाह नोंदणी कायदा - 1904, बालविवाह प्रतिबंध कायदा - 1908, पुरोहित कायदा - 1915
GK Question : 11
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी परदेशी जाण्यास कोणी मदत केली ?
Correct Answer: सयाजीराव गायकवाड
GK Question : 12
पुढीलपैकी कोणत्या संस्थानात महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी 'धारासभा' या नावाने कायदेमंडळ स्थापन केले व त्यात सर्व घटकातील लोकांचा समावेश करून लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवली ?
Correct Answer: बडोदा संस्थान
GK Question : 13
सन 1933 मध्ये शिकागो येथे भरलेल्या सर्व-धर्म-समभाव या परिषदेचे अध्यक्षस्थान कोणी भूषविले होते ?
Correct Answer: महाराजा सयाजीराव गायकवाड
GK Question : 14
आपल्या संपूर्ण संस्थानात सन 1919 मध्ये 'बालवीर-विरबाला चळवळ' सुरू करणारे संस्थानिक राजे कोण ?
Correct Answer: सयाजीराव गायकवाड
GK Question : 15
खालीलपैकी कोणता/ते कायदा/दे करणारे व अमलात आणणारे सयाजीराव गायकवाड यांचे बडोदा संस्थान हे भारतातील पहिलेच राज्य ठरले ?
Correct Answer: सक्तीचे प्राथमिक शिक्षण व घटस्फोट कायदा
GK Question : 16
महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी बडोदा संस्थांमध्ये कोणते शिक्षण मोफत आणि सक्तीचे केले ?
Correct Answer: प्राथमिक शिक्षण
GK Question : 17
सयाजीराव गायकवाड यांनी सुरू केलेल्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठीच्या शिष्यवृत्तीचा लाभ महाराष्ट्रातील कोणत्या विद्यार्थ्यांना झाला ?
Correct Answer: बाबासाहेब आंबेडकर व महर्षी शिंदे
GK Question : 18
बडोदाधिपती सयाजीराव गायकवाड यांनी केलेल्या कार्यासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
Correct Answer: इ.स 1942 च्या छोडो भारत चळवळीत त्यांनी संस्थानातील प्रजेचे नेतृत्व केले
GK Question : 19
महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा मृत्यू केव्हा झाला ?
Correct Answer: 6 फेब्रुवारी 1939
Your Score
Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /