पोलीस पाटील भरती सराव प्रश्नसंच - Police Patil Bharti Practice Question Set - 24
Police Patil Bharti Practice Question Set - 24
TCS व IBPS, MPSC राज्यसेवा, PSI-STI-ASO, Tax Assistant, Clerk, वनरक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरती, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती, आरोग्य भरती आणि इतर सर्व सरळसेवा स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त सराव प्रश्नसंच
🎯 खालील प्रश्न हे पोलीस पाटील भरती 2025 साठी उपयुक्त ठरणारे सराव प्रश्न आहेत. हे प्रश्न केवळ मार्गदर्शनासाठी असून, आगामी पोलीस पाटील भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये विचारले जाण्याची शक्यता असलेले संभाव्य प्रश्न आहेत .
प्रत्येकाने या प्रश्नांचा नियमित सराव करून स्वतःची तयारी अधिक भक्कम करावी. या सराव प्रश्नांमुळे परीक्षेतील आत्मविश्वास आणि वेळ व्यवस्थापनात निश्चितच सुधारणा होईल
🌐 आमच्या MPSC Battle या ब्लॉगवर दररोज नव्याने अपडेट होणारे Police Patil Bharti GK Questions वाचण्यासाठी आणि परीक्षेच्या सखोल सरावासाठी तुमच्या ब्राऊझर मध्ये 🔍 सर्च करा - Mpsc Battle Police Patil Bharti GK Questions
टीप :
सर्व प्रश्न सोडवल्यानंतर तुम्हाला मिळालेले मार्क्स तपासून पहा — त्यासाठी खाली दिलेल्या Check Your Score बटनावर क्लिक करा
Practice Questions
Practice Quiz
GK Question : 1
भारतीय घटना या तारखेपासून अमलात आली ?
▪️ 26 जानेवारी 1948
▪️ 26 जानेवारी 1950
▪️ 15 ऑगस्ट 1947
▪️ 26 नोव्हेंबर 1949
Correct Answer : 26 जानेवारी 1950
GK Question : 2
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला ?
▪️ गीता रहस्य
▪️ दासबोध
▪️ ग्रामगीता
▪️ ज्ञानेश्वरी
Correct Answer : ग्रामगीता
GK Question : 3
प्रसिद्ध बिहू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो ?
▪️ आसाम
▪️ ओडिशा
▪️ मणिपूर
▪️ मिझोराम
Correct Answer : आसाम
GK Question : 4
महात्मा फुले यांचा जन्म कोठे झाला ?
▪️ चिपळूण
▪️ पुणे
▪️ सातारा
▪️ कोल्हापूर
Correct Answer : पुणे
GK Question : 5
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे मूळ नाव काय होते ?
▪️ आबासाहेब
▪️ जयसिंगराव
▪️ दौलतराव
▪️ यशवंतराव
Correct Answer : यशवंतराव
GK Question : 6
पंजाब केसरी कोणाला संबोधले जाते ?
▪️ महाराज रणजीत सिंह
▪️ लाला लजपत राय
▪️ लाला हरदयाल
▪️ लाला जगत नारायण
Correct Answer : लाला लजपत राय
GK Question : 7
छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कधी झाला ?
▪️ 1652
▪️ 1648
▪️ 1657
▪️ 1685
Correct Answer : 1657
GK Question : 8
महाराष्ट्राला किती कि . मी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे ?
▪️ 600
▪️ 720
▪️ 620
▪️ 800
Correct Answer : 720
GK Question : 9
महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती ?
▪️ भीमा
▪️ कोयना
▪️ कृष्णा
▪️ गोदावरी
Correct Answer : गोदावरी
GK Question : 10
गावातील पोलीस पाटलाची नियुक्ती कोण करते ?
▪️ उपविभागीय अधिकारी
▪️ जिल्हाधिकारी
▪️ पोलीस अधीक्षक
▪️ उपविभागीय पोलीस अधिकारी
Correct Answer : उपविभागीय अधिकारी
GK Question : 11
खालीलपैकी कोणता भारतातील पहिला लोहमार्ग आहे ?
▪️ कलकत्ता ते खडकपूर
▪️ दिल्ली ते आग्रा
▪️ मुंबई ते ठाणे
▪️ तिरुपती ते रेनीगुंठा
Correct Answer : मुंबई ते ठाणे
GK Question : 12
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे ?
▪️ जगबुडी
▪️ मिठी
▪️ दहिसर
▪️ वशिष्ठी
Correct Answer : दहिसर
GK Question : 13
अमरावती विभागात समाविष्ट नसलेला जिल्हा कोणता ?
▪️ वर्धा
▪️ वाशिम
▪️ अमरावती
▪️ यवतमाळ
Correct Answer : वर्धा
GK Question : 14
मराठवाडा मुक्ती दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो ?
▪️ 17 सप्टेंबर
▪️ 15 ऑगस्ट
▪️ 26 मार्च
▪️ 29 नोव्हेंबर
Correct Answer : 17 सप्टेंबर
GK Question : 15
जालना शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे ?
▪️ गोदावरी
▪️ कुंडलिका
▪️ दुधना
▪️ पूर्णा
Correct Answer : कुंडलिका
GK Question : 16
भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
▪️ 1993
▪️ 1992
▪️ 1995
▪️ 1994
Correct Answer : 1993
GK Question : 17
डांबराच्या गोळ्याचा आकार काही दिवसांनी कमी होतो कारण त्याचे ...........
▪️ संघटन होते
▪️ बाष्पीभवन होते
▪️ संप्लवन होते
▪️ वरीलपैकी नाही
Correct Answer : संप्लवन होते
GK Question : 18
हायग्रोमीटर काय मोजते ?
▪️ द्रव्याची सापेक्ष घनता
▪️ सापेक्ष आद्रता
▪️ नदीच्या पात्रातील प्रवाह
▪️ यापैकी नाही
Correct Answer : सापेक्ष आद्रता
GK Question : 19
कथ्थक हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
▪️ तमिळनाडू
▪️ उत्तर प्रदेश
▪️ राजस्थान
▪️ झारखंड
Correct Answer : उत्तर प्रदेश
GK Question : 20
खालीलपैकी कोणती नदी तापी नदीची उपनदी आहे ?
▪️ पूर्णा
▪️ मुळा
▪️ इंद्रायणी
▪️ गिरणा
Correct Answer : पूर्णा
GK Question : 21
संसदेने केलेला कायदा घटनाबाह्य अथवा निरर्थक ठरविण्याचा अधिकार भारतीय न्याय संस्थेस आहे हे विधान ....
▪️ पूर्णतः चुकीचे आहे
▪️ विपर्यस्त आहे
▪️ पूर्णतः बरोबर आहे
▪️ यापैकी नाही
Correct Answer : पूर्णतः बरोबर आहे
GK Question : 22
केंद्रासंबंधीचे धनविधेयक सर्वप्रथम .......... मध्ये प्रस्तुत केले जाते ?
▪️ राज्यसभा
▪️ विधान परिषद
▪️ लोकसभा
▪️ विधानसभा
Correct Answer : लोकसभा
GK Question : 23
वारंवारतेचे ( Frequency ) SI एकक काय आहे ?
▪️ हर्ट्स
▪️ ज्यूल
▪️ ॲम्पियर
▪️ न्यूटन
Correct Answer : हर्ट्स
GK Question : 24
मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे ?
▪️ पुणे
▪️ नाशिक
▪️ नागपूर
▪️ अमरावती
Correct Answer : नागपूर
GK Question : 25
महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल कोण ?
🏷️ महत्त्वाची सुचना : जर तुम्हाला या सराव प्रश्नसंचामध्ये काही त्रुटी आढळल्या असतील किंवा सराव प्रश्नसंच सुधारण्यासंबंधी सूचना असल्यास कमेंट करा . जेणेकरून आपण दिलेल्या सूचनांची शहानिशा करून आम्हाला प्रश्नसंचामध्ये योग्य तो बदल करता येईल
🔂 तुम्हाला हा प्रश्नसंच उपयुक्त वाटल्यास स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या आपल्या
मित्रांसोबत शेअर करा