पोलीस पाटील भरती सराव प्रश्नसंच - Police Patil Bharti Practice Question Set - 23

पोलीस पाटील भरती सराव प्रश्नसंच

पोलीस पाटील भरती सराव प्रश्नसंच : 23

उमेदवारांसाठी सूचना :
खालील प्रश्न हे पोलीस पाटील भरती 2025 साठी उपयुक्त ठरणारे सराव प्रश्न आहेत. हे प्रश्न केवळ मार्गदर्शनासाठी असून, आगामी पोलीस पाटील भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये विचारले जाण्याची शक्यता असलेले संभाव्य प्रश्न आहेत.

प्रत्येक उमेदवाराने या प्रश्नांचा नियमित सराव करून स्वतःची तयारी अधिक भक्कम करावी. या सराव प्रश्नांमुळे परीक्षेतील आत्मविश्वास आणि वेळ व्यवस्थापनात निश्चितच सुधारणा होईल.

आमच्या MPSC Battle या ब्लॉगवर दररोज नव्याने अपडेट होणारे Police Patil Bharti GK Questions वाचण्यासाठी आणि परीक्षेच्या सखोल सरावासाठी रोज भेट देत राहा.

टीप :

सर्व प्रश्न सोडवल्यानंतर तुमचा स्कोर चेक करा — त्यासाठी खाली दिलेल्या Check Your Score बटनावर क्लिक करा.

Practice Questions
GK Question : 1

हँड सॅनिटायझर मध्ये मुख्यतः कोणता घटक असतो ?
▪️ आयसोप्रोपिल अल्कोहोल
▪️ सल्फर
▪️ ब्लिचिंग पावडर
▪️ लाईम सोडा
Correct Answer : आयसोप्रोपिल अल्कोहोल
GK Question : 2

महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता ?
▪️ अकोला
▪️ गडचिरोली
▪️ भंडारा
▪️ यवतमाळ
Correct Answer : गडचिरोली
GK Question : 3

ऑर्नीथॉलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास करतात ?
▪️ फुले
▪️ प्राणी
▪️ पक्षी
▪️ फळे
Correct Answer : पक्षी
GK Question : 4

सामाजिक न्याय दिवस महाराष्ट्र मध्ये कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो ?
▪️ यशवंतराव चव्हाण
▪️ सावित्रीबाई फुले
▪️ डॉ . बाबासाहेब आंबेडकर
▪️ शाहू महाराज
Correct Answer : शाहू महाराज
GK Question : 5

समृद्धी महामार्ग या प्रकल्पाची अंमलबजावणीची जबाबदारी कोणत्या विभागाची आहे ?
▪️ MSRTC
▪️ MSRDC
▪️ MMRDA
▪️ MMRC
Correct Answer : MSRDC
GK Question : 6

जगातील पहिली मोटार कार कोणी निर्माण केली ?
▪️ ईलान मस्क
▪️ हेन्री फोर्ड
▪️ कार्ल बेंज
▪️ रोल्स रॉयस
Correct Answer : कार्ल बेंज
GK Question : 7

महाराष्ट्रातील कोणता प्रदेश तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो ?
▪️ कोकण
▪️ मराठवाडा
▪️ पूर्व विदर्भ
▪️ दक्षिण महाराष्ट्र
Correct Answer : पूर्व विदर्भ
GK Question : 8

ईलॉन मस्क हे उद्योगपती खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित नाहीत ?
▪️ टेस्ला
▪️ ॲमेझॉन
▪️ स्टार लीक
▪️ स्पेस एक्स
Correct Answer : ॲमेझॉन
GK Question : 9

मारुती चितमपल्ली हे व्यक्तिमत्व कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे ?
▪️ पत्रकारिता
▪️ निसर्ग अभ्यासक
▪️ क्रीडा समालोचक
▪️ साहित्य समालोचक
Correct Answer : निसर्ग अभ्यासक
GK Question : 10

विकसनशील देशांमध्ये लोकसंख्या स्तूप कसा असतो ?
▪️ अरुंद पाया आणि रुंद माथा
▪️ अरुंद पाया आणि अरुंद माथा
▪️ रुंद पाया आणि अरुंद माथा
▪️ रुंद पाया आणि रुंद माथा
Correct Answer : रुंद पाया आणि अरुंद माथा
GK Question : 11

अतारांकित प्रश्नांची उत्तरे मागण्यासाठी किमान किती दिवसांचा नोटीस कालावधी आहे ?
▪️ 1 महिना
▪️ 7 दिवस
▪️ 3 महिने
▪️ 15 दिवस
Correct Answer : 15 दिवस
GK Question : 12

भारतीय राज्यघटनेतील नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याची तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली आहे ?
▪️ यु एस एस आर
▪️ जर्मनी
▪️ अमेरिका
▪️ फ्रान्स
Correct Answer : यु एस एस आर
GK Question : 13

पुढीलपैकी कोणत्या गुप्त राजाने महेंद्रादित्य ही पदवी घेतली ?
▪️ समुद्रगुप्त
▪️ कुमार गुप्त पहिला
▪️ स्कंन्धगुप्त
▪️ चंद्रगुप्त दुसरा
Correct Answer : कुमार गुप्त पहिला
GK Question : 14

लातूर मधील वळूची कोणती जात देशभर प्रसिद्ध आहे ?
▪️ देवणी
▪️ जळकोट
▪️ जानवळ
▪️ अहमदपूरी
Correct Answer : देवणी
GK Question : 15

8 सप्टेंबर 2016 रोजी अमलात आलेली 101 वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे ?
▪️ नोटबंदी
▪️ वस्तू व सेवा कर
▪️ काळ्या पैशास प्रतिबंध
▪️ जनधन खाते
Correct Answer : वस्तू व सेवा कर
GK Question : 16

श्रीवर्धन येथील ......... जातीची सुपारी महाराष्ट्रात सर्वदूर प्रसिद्ध आहे ?
▪️ चिकणी
▪️ गोटू
▪️ रोठा
▪️ मंगलम
Correct Answer : रोठा
GK Question : 17

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह कोणत्या महिन्यात साजरा केला जातो ?
▪️ ऑक्टोबर
▪️ जानेवारी
▪️ जून
▪️ मार्च
Correct Answer : जानेवारी
GK Question : 18

सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट ( CIRT ) ही संस्था कोणत्या शहरात आहे ?
▪️ मुंबई
▪️ औरंगाबाद
▪️ पुणे
▪️ नागपूर
Correct Answer : पुणे
GK Question : 19

माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सुरुवात कधी झाली ?
▪️ 29 सप्टेंबर 2015
▪️ 1 एप्रिल 2016
▪️ 12 मार्च 2016
▪️ 27 जानेवारी 2017
Correct Answer : 1 एप्रिल 2016
GK Question : 20

जगातील संपूर्ण सौरऊर्जेवर चालणारे विमानतळ कोणते ?
▪️ चेन्नई
▪️ कोचीन
▪️ जयपूर
▪️ गुवाहाटी
Correct Answer : कोचीन
GK Question : 21

खालीलपैकी कोणत्या तारखेस महिलांवरील हिंसाचार निर्मूलन दिन साजरा केला जातो ?
▪️ 5 नोव्हेंबर
▪️ 25 डिसेंबर
▪️ 25 नोव्हेंबर
▪️ 12 सप्टेंबर
Correct Answer : 25 नोव्हेंबर
GK Question : 22

महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला ?
▪️ 2011
▪️ 2005
▪️ 2000
▪️ 2010
Correct Answer : 2010
GK Question : 23

चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थ क्षेत्र कोठे आहे ?
▪️ पैठण
▪️ कचनेर
▪️ संगमपूर
▪️ गंगापूर
Correct Answer : कचनेर
GK Question : 24

UNICEF या संघटनेचे कार्य मुख्यत्वे कोणाशी संबंधित आहे ?
▪️ अपंग व्यक्ती
▪️ वृद्ध व्यक्ती
▪️ बालक
▪️ स्त्रिया / महिला
Correct Answer : बालक
GK Question : 25

नाबार्ड प्रत्यक्षपणे कोणाला पतपुरवठा करते ?
▪️ राज्य सहकारी बँक
▪️ प्राथमिक पतपुरवठा संस्था
▪️ व्यापारी बँक
▪️ कृषी बँक
Correct Answer : राज्य सहकारी बँक

Your Score

Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /

Post a Comment

Previous Post Next Post