पोलीस पाटील भरती सराव प्रश्न - Police Patil Bharti Practice Question Set - 21


Police Patil Bharti Gk Question


उमेदवारांसाठी सूचना : हे केवळ सराव प्रश्न आहेत जे आगामी पोलीस पाटील भरती लेखी परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात . हे प्रश्न सोडवण्याकरीता कोणत्याही प्रकारची गुणदान पद्धत व वेळेची मर्यादा नाही ; उमेदवाराने हे प्रश्न केवळ पोलीस पाटील भरतीच्या लेखी परीक्षेचा जास्तीत जास्त सराव व्हावा या उद्धेशाने सोडवणे आवश्यक आहे .

आम्ही पोलीस पाटील भरती सराव प्रश्नसंच या पेजवर दररोज नवनवीन  Police Patil Bharti Gk Question सामाविष्ट करत असतो ; त्यामुळे पोलीस पाटील भरती लेखी परीक्षेचा जास्तीत जास्त सराव करण्यासाठी आमच्या Mpsc Battle या ब्लॉग ला दररोज आवश्य भेट द्या

सराव प्रश्नसंच 21

1 ) राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोण घेते ? 
  1. केंद्रीय निवडणूक आयोग
  2. राज्य लोकसेवा आयोग
  3. राज्य निवडणूक आयोग
  4. नीती आयोग

राज्य निवडणूक आयोग

2 ) सिंधू नदीचा उगम कोठे होतो ? 
  1. यमुनोत्री
  2. कैलास - मानसरोवर
  3. रोहतांग सरोवर
  4. राकस सरोवर

कैलास ( मानसरोवर )

3 ) मोहम्मद बिन तुघलकाने देवगिरीचे नामकरण काय केले ? 
  1. महमदाबाद
  2. दौलताबाद
  3. फिरोजाबाद
  4. खुलताबाद

दौलताबाद

4 ) सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ? 
  1. कृष्णा
  2. कोयना
  3. इंद्रायणी
  4. गोदावरी

कृष्णा

5 ) 1857 च्या उठावाची सुरुवात कोठे झाली ? 
  1. झाशी
  2. कानपूर
  3. मिरत
  4. दिल्ली

मिरत

6 ) महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे ? 
  1. यवतमाळ
  2. भंडारा
  3. चंद्रपूर
  4. गडचिरोली

चंद्रपूर

7 ) जालियनवाला बाग हत्याकांडाशी संबंधित इंग्रज अधिकारी कोण ? 
  1. जनरल डायर
  2. लॉर्ड कर्झन
  3. मायकल ओडवायर
  4. कर्नल डिझायरली

जनरल डायर ( रेजिनाल्ड एडवर्ड डायर )

8 ) पोलीस विभाग कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो ? 
  1. महसूल विभाग
  2. सामान्य प्रशासन विभाग
  3. कृषी विभाग
  4. गृह विभाग

गृह विभाग

9 ) महाराष्ट्र पोलीस दलात खालीलपैकी कोणते पद नाही ? 
  1. लान्स नाईक
  2. हवालदार
  3. पोलीस शिपाई
  4. पोलीस नाईक

लान्स नाईक

10) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ? 
  1. महाबळेश्वर
  2. बोरिवली
  3. पंचवटी
  4. चिखलदरा

बोरिवली

11 ) सर्व योग्य दाता कोणत्या रक्तगटास म्हणतात ? 
  1. A
  2. AB
  3. B
  4. O

O

12 ) महाराष्ट्राची उपराजधानी कोणती ? 
  1. अमरावती
  2. नागपूर
  3. पुणे
  4. औरंगाबाद

नागपूर

13 ) डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह कोठे केला ? 
  1. महाड
  2. दापोली
  3. शिरगाव
  4. माणगाव

महाड

14 ) पहिल्या भारतीय अंतराळवीराचे नाव काय ? 
  1. कल्पना चावला
  2. सुनीता विल्यम्स
  3. राकेश शर्मा
  4. नील आर्मस्ट्रॉंग

राकेश शर्मा

15 ) महात्मा गांधीजींचा जन्म कोणत्या राज्यात झाला ? 
  1. मध्यप्रदेश
  2. महाराष्ट्र
  3. गुजरात
  4. झारखंड

गुजरात

16 ) बंगालची फाळणी कोणत्या साली झाली ? 
  1. 1857
  2. 1947
  3. 1872
  4. 1905

1905

17 ) खालीलपैकी कोणता प्राणी हडप्पा संस्कृतीतील मुद्रांवर आढळत नाही ? 
  1. घोडा
  2. गाय
  3. हत्ती
  4. सिंह

गाय

18 ) वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधले आहे ? 
  1. कृष्ण पहिला
  2. ध्रुव
  3. दंतिदुर्ग
  4. गोविंद तिसरा

कृष्ण पहिला

19 ) भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते ? 
  1. महेश कोठारे
  2. व्ही शांताराम
  3. दादासाहेब फाळके
  4. दादा कोंडके

दादासाहेब फाळके

20 ) खालीलपैकी कोणता देश भारताचा शेजारी नाही ? 
  1. फ्रान्स
  2. चीन
  3. नेपाळ
  4. भूटान

फ्रान्स

21 ) महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत ? 
  1. कोकण
  2. औरंगाबाद
  3. पुणे
  4. नागपूर

औरंगाबाद

22 ) 2011 च्या जनगणनेनुसार जगात सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता ? 
  1. चीन
  2. भारत
  3. ब्राझील

चीन

23 ) महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते ? 
  1. औरंगाबाद
  2. अमरावती
  3. नागपूर
  4. नाशिक

नागपूर

24 ) कोणत्या शहरास महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून घोषित करण्यात आले आहे ? 
  1. नाशिक
  2. पुणे
  3. सिंधुदुर्ग
  4. औरंगाबाद

औरंगाबाद

25 ) नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळा दर किती वर्षाने भरतो ? 
  1. 10
  2. 12
  3. 5
  4. 3

12

Post a Comment

Previous Post Next Post