डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रश्नमंजुषा | Dr. Babasaheb Ambedkar Question In Marathi - Mpsc battle

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित प्रश्न - उत्तर


Dr. Babasaheb Ambedkar General Knowledge MCQ Quiz In Marathi


Dr.Babasaheb Ambedkar Question In Marathi : या ब्लॉग पोस्टमध्ये, आम्ही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित बहु-निवडक प्रश्नांचा (MCQ) संच तयार केला आहे. हे प्रश्न विशेषत: तुम्हाला विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीत मदत करण्यासाठी तयार केले गेले आहेत, जिथे महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण समाजसुधारकांबद्दल माहिती असणे हे यशासाठी महत्त्वाचे आहे.

Dr. Babasaheb Ambedkar ( MCQ ) Question and Answer in Marathi या ब्लॉग पोस्ट मध्ये तयार केलेल्या प्रश्नांचा प्रयत्न करून, तुम्ही केवळ विषयाची तुमची समज वाढवू शकत नाही तर तुमची गंभीर विचार कौशल्ये आणि ऐतिहासिक व्यक्तींचे आणि त्यांच्या योगदानाचे विश्लेषण करण्याची क्षमता देखील मजबूत कराल

आमचा दृढ विश्वास आहे की हे प्रश्न तुमच्या परीक्षेच्या तयारीसाठी अमूल्य संसाधने म्हणून काम करतील, त्याचबरोबर तुम्हाला आवश्यक सराव आणि तुमच्या प्रयत्नांमध्ये उत्कृष्ट होण्याचा आत्मविश्वास प्रदान करतील.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा

Practice Questions

Practice Quiz

Question : 1
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला ?
▪️ 6 डिसेंबर 1891
▪️ 13 एप्रिल 1891
▪️ 9 डिसेंबर 1891
▪️ 14 एप्रिल 1891
Correct Answer: 14 एप्रिल 1891
Question : 2
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थळ कोणते ?
▪️ महू
▪️ रत्नागिरी
▪️ कोल्हापूर
▪️ महाड
Correct Answer: महू
Question : 3
बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्म ठिकाण (महू) कोणत्या राज्यात आहे ?
▪️ महाराष्ट्र
▪️ छत्तीसगड
▪️ मध्य प्रदेश
▪️ पश्चिम बंगाल
Correct Answer: मध्य प्रदेश
Question : 4
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू कधी झाला ?
▪️ 6 डिसेंबर 1891
▪️ 6 डिसेंबर 1927
▪️ 6 डिसेंबर 1956
▪️ 6 डिसेंबर 1891
Correct Answer: 6 डिसेंबर 1956
Question : 5
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू कोठे झाला ?
▪️ दिल्ली
▪️ मुंबई
▪️ पुणे
▪️ नागपूर
Correct Answer: दिल्ली
Question : 6
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव कोणते ?
▪️ मुरुड
▪️ शेरावली
▪️ महू
▪️ आंबावडे
Correct Answer: आंबावडे
Question : 7
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव काय ?
▪️ भीमराव रामचंद्र आंबेडकर
▪️ बाबासाहेब रामजी आंबेडकर
▪️ भीमराव रामजी आंबेडकर
▪️ बाबासाहेब रामचंद्र आंबेडकर
Correct Answer: भीमराव रामजी आंबेडकर
Question : 8
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ आडनाव काय होते ?
▪️ अंबावडेकर
▪️ आंबेडकर
▪️ सपकाळ
▪️ कांबळे
Correct Answer: अंबावडेकर
Question : 9
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव काय होते ?
▪️ रामचंद्र
▪️ भिमाजी
▪️ रामजी
▪️ कृष्णाजी
Correct Answer: रामजी
Question : 10
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे नाव काय होते ?
▪️ भिमाबाई
▪️ रमाबाई
▪️ सगुनाबाई
▪️ गयाबाई
Correct Answer: भीमाबाई
Question : 11
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नीचे नाव काय होते ?
▪️ यशोदाबाई
▪️ लक्ष्मीबाई
▪️ रमाबाई
▪️ यशोदाबाई
Correct Answer: रमाबाई
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रामाबाईंच्या निधनानंतर 1948 मध्ये शारदा कबीर यांच्याशी नोंदणी पद्धतीने विवाह केला आणि त्या नंतर सविता आंबेडकर म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या . लक्षात ठेवा - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पहिला विवाह रामाबाईंबरोबर, आणि दुसरा विवाह सविता आंबेडकर (शारदा कबीर) यांच्याबरोबर झाला होता
Question : 12
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचा प्रभाव होता ?
▪️ गौतम बुद्ध
▪️ संत कबीर
▪️ महात्मा फुले
▪️ वरील सर्व
Correct Answer: वरील सर्व
Question : 13
शिका, संघटित व्हा, संघर्ष करा अशी घोषणा कोणी केली ?
▪️ महात्मा गांधी
▪️ नेताजी सुभाषचंद्र बोस
▪️ महात्मा फुले
▪️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Correct Answer: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Question : 14
महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे करार कधी झाला ?
▪️ 29 ऑगस्ट 1929
▪️ 26 जानेवारी 1930
▪️ 15 ऑगस्ट 1933
▪️ 24 सप्टेंबर 1932
Correct Answer: 24 सप्टेंबर 1932
Question : 15
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी परदेशी जाण्यास कोणी मदत केली ?
▪️ राजर्षी शाहू महाराज
▪️ सयाजीराव गायकवाड
▪️ रावबहादुर वड्डीयार
▪️ कृष्णाजी केळूसकर
Correct Answer: सयाजीराव गायकवाड
Question : 16
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हजारो अनुयायांसह बौद्ध धर्माचा अंगीकार / स्विकार केव्हा केला ?
▪️ 14 ऑक्टोबर 1956
▪️ 6 डिसेंबर 1956
▪️ 14 एप्रिल 1945
▪️ 13 ऑक्टोबर 1929
Correct Answer: 14 ऑक्टोबर 1956
Question : 17
भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली ?
▪️ कर्मवीर भाऊराव पाटील
▪️ धोंडो केशव कर्वे
▪️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
▪️ महात्मा ज्योतिबा फुले
Correct Answer: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Question : 18
खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली ?
▪️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
▪️ महात्मा फुले
▪️ जगन्नाथ शंकर शेठ
▪️ महर्षी कर्वे
Correct Answer: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Question : 19
पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉ. आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी केली ?
▪️ मुंबई
▪️ नागपूर
▪️ औरंगाबाद
▪️ पुणे
Correct Answer: औरंगाबाद
Question : 20
शेड्युल कास्ट फेडरेशन या राजकीय पक्षाची स्थापना कोणी केली ?
▪️ महात्मा गांधी
▪️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
▪️ महात्मा फुले
▪️ राजश्री शाहू महाराज
Correct Answer: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Question : 21
चवदार तळे सत्याग्रह कोणी केला ?
▪️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
▪️ महात्मा गांधी
▪️ महात्मा फुले
▪️ राजश्री शाहू महाराज
Correct Answer: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Question : 22
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पहिल्या गोलमेज परिषदेला -------- म्हणून उपस्थित होते
▪️ रिपब्लिकन पक्षाचे प्रतिनिधी
▪️ काँग्रेसचे प्रतिनिधी
▪️ भारत सरकारचे प्रतिनिधी
▪️ अस्पृश्यांचे प्रतिनिधी
Correct Answer: अस्पृश्यांचे प्रतिनिधी
Question : 23
बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणते पाक्षिक सुरू केले ?
▪️ मूकनायक
▪️ दर्पण
▪️ हरिजन
▪️ बॉम्बे समाचार
Correct Answer: मूकनायक
Question : 24
बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या वर्षी मूकनायक सुरू केले ?
▪️ 1920
▪️ 1922
▪️ 1923
▪️ 1921
Correct Answer: 1920
Question : 25
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी केली ?
▪️ 1946
▪️ 1962
▪️ 1921
▪️ 1937
Correct Answer: 1946
Question : 26
इतिहास प्रसिद्ध पुणेकरार खालीलपैकी कोणामध्ये घडून आला ?
▪️ पंडित नेहरू व सरदार वल्लभभाई पटेल
▪️ लालबहादूर शास्त्री व डॉ. बाबासाहेब आंबेडकर
▪️ महात्मा गांधी व पंडित नेहरू
▪️ डॉ. आंबेडकर व महात्मा गांधी
Correct Answer: डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी
Question : 27
पुणे करारावर कोणी सह्या स्वाक्षऱ्या केल्या ?
▪️ महात्मा गांधीजी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर
▪️ राजेंद्र प्रसाद व लोकमान्य टिळक
▪️ महात्मा फुले व पंडित नेहरू
▪️ सरदार पटेल व महात्मा गांधी
Correct Answer: महात्मा गांधीजी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Question : 28
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा --------- येथे केली ?
▪️ येवला - नाशिक
▪️ महाड - रायगड
▪️ कामठी - नागपूर
▪️ चिपळूण - रत्नागिरी
Correct Answer: येवला नाशिक
Question : 29
बहिष्कृत भारत व मूकनायक ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली ?
▪️ महात्मा फुले
▪️ लोकमान्य टिळक
▪️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
▪️ महात्मा गांधी
Correct Answer: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Question : 30
चवदार तळे सत्याग्रह कोणी केला ?
▪️ महात्मा फुले
▪️ महात्मा गांधी
▪️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
▪️ लोकमान्य टिळक
Correct Answer: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Question : 31
'शिका, संघटित व्हा व संघर्ष करा' ही घोषणा कोणी दिली ?
▪️ स्वामी विवेकानंद
▪️ महात्मा फुले
▪️ राजर्षी शाहू महाराज
▪️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Correct Answer: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Question : 32
बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कोणी केली ?
▪️ महात्मा फुले
▪️ महात्मा गांधी
▪️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
▪️ वि. रा. शिंदे
Correct Answer: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Question : 33
भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली ?
▪️ महात्मा फुले
▪️ महात्मा गांधी
▪️ महर्षी धोंडो केशव कर्वे
▪️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Correct Answer: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Question : 34
खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली ?
▪️ पंजाबराव देशमुख
▪️ कर्मवीर भाऊराव पाटील
▪️ भाऊसाहेब हिरे
▪️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Correct Answer: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Question : 35
समाज समता संघाची स्थापना कोणी केली ?
▪️ महात्मा फुले
▪️ महात्मा गांधी
▪️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
▪️ वि. रा. शिंदे
Correct Answer: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Question : 36
दलितांच्या हक्कासाठी भारतीय मजूर पक्ष, शेड्युल कास्ट फेडरेशन व रिपब्लिकन पक्ष या संस्थांची स्थापना कोणी केली ?
▪️ महात्मा फुले
▪️ नारायण मेघाजी लोखंडे
▪️ विठ्ठल रामजी शिंदे
▪️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Correct Answer: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Question : 37
दलितांच्या उद्धारासाठी धर्मांतराचा मार्ग कोणी स्वीकारला ?
▪️ महात्मा फुले
▪️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
▪️ महर्षी कर्वे
▪️ महात्मा गांधी
Correct Answer: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Question : 38
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मशताब्दी वर्ष खालीलपैकी कोणते वर्ष म्हणून साजरे केले जाते ?
▪️ सांस्कृतिक वर्ष
▪️ समता वर्ष
▪️ ग्रंथ वर्ष
▪️ सामाजिक न्याय वर्ष
Correct Answer: सामाजिक न्याय वर्ष
Question : 39
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत पुढील 3 विधानांचा विचार करा व योग्य विधान/ने ओळखा ?

1. दलितांच्या राजकीय हक्कासाठी त्यांनी सन 1936 मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली

2. त्यांनी म्हटले होते, जरी मी जन्माने हिंदू असलो तरी मरताना हिंदू राहणार नाही

3. ते त्याच वर्षी निवर्तले, ज्या वर्षी त्यांनी बुद्ध धर्म स्वीकारला
▪️ फक्त 2
▪️ फक्त 1 आणि 3
▪️ वरीलपैकी एकही नाही
▪️ वरील सर्व
Correct Answer: वरील सर्व
Question : 40
शेड्युल्ड कास्ट फेडरेशन ची स्थापना कोणी केली ?
▪️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
▪️ राजा राम मोहन रॉय
▪️ महात्मा फुले
▪️ शाहू महाराज
Correct Answer: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Question : 41
बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी परदेशी जाण्यास सर्वप्रथम कोणी मदत केली ?
▪️ राजर्षी शाहू महाराज
▪️ रघुनाथराव भोसले
▪️ महात्मा गांधी
▪️ महाराजा सयाजीराव गायकवाड
Correct Answer: महाराजा सयाजीराव गायकवाड
Question : 42
भारतीय राज्यघटनेचे संविधानाचे शिल्पकार असे कोणास म्हटले जाते ?
▪️ महात्मा गांधी
▪️ राजेंद्र प्रसाद
▪️ बी. आर. आंबेडकर
▪️ सरदार पटेल
Correct Answer: बी. आर. आंबेडकर
Question : 43
बाबासाहेब आंबेडकर पहिल्या गोलमेज परिषदेला कोणाचे प्रतिनिधी म्हणून हजर होते ?
▪️ काँग्रेसचे
▪️ रिपब्लिकन पक्षाचे
▪️ अस्पृश्यांचे
▪️ भारत सरकारचे
Correct Answer: अस्पृश्यांचे
Question : 44
काळाराम मंदिर सत्याग्रह कोठे झाला ?
▪️ नाशिक
▪️ नागपूर
▪️ पुणे
▪️ महाड
Correct Answer: नाशिक
Question : 45
नाशिक येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा यासाठी सत्याग्रह कधी झाला ?
▪️ 4 मार्च 1930
▪️ 2 मार्च 1930
▪️ 6 मार्च 1930
▪️ 8 मार्च 1930
Correct Answer: 2 मार्च 1930
Question : 46
डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले , कारण -
▪️ स्त्रियांवरील अन्यायाचे समर्थन केले होते
▪️ स्पृश्य अस्पृश्य वाद होता
▪️ त्यात जाती व्यवस्थेचे समर्थन केले होते
▪️ यापैकी नाही
Correct Answer: त्यात जाती व्यवस्थेचे समर्थन केले होते
Question : 47
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मते राष्ट्र ऐक्याच्या वाटेमधील पहिला अडथळा कोणता ?
▪️ जातीयता
▪️ मनाचा संकुचितपणा
▪️ धर्म
▪️ समाजविघातक प्रवृत्ती
Correct Answer: जातीयता
Question : 48
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या साली मूकनायक सुरू केले ?
▪️ 1920
▪️ 1921
▪️ 1922
▪️ 1923
Correct Answer: 1920
Question : 49
व्हाइसरॉयच्या मंत्रिमंडळात डॉ. आंबेडकरांनी कोणते पद भूषविले होते ?
▪️ कृषी मंत्री
▪️ कायदामंत्री
▪️ मजूर मंत्री
▪️ अर्थमंत्री
Correct Answer: मजूर मंत्री
Question : 50
बाबासाहेब आंबेडकरांना 1923 साली लंडन विद्यापीठाने अर्थशास्त्रातील कोणत्या प्रबंधाबद्दल डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी दिली ?
▪️ ॲडमिनिस्ट्रेशन ॲण्ड फायनान्स ॲट द ईस्ट इंडिया कंपनी
▪️ द प्रॉब्लेम्स ऑफ रुपी
▪️ द प्रॉब्लेम्स ऑफ मनी
▪️ द इव्होल्यूशन ॲट प्रिन्सिपल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया
Correct Answer: द प्रॉब्लेम्स ऑफ रुपी
Question : 51
डॉ. आंबेडकरांचे अग्रलेख म्हणजे शैलीच्या सौंदर्याने सजलेले वैचारिक गद्य होय. हे अग्रलेख कोणत्या मासिकात प्रकाशित होत असत ?
▪️ बहिष्कृत भारत
▪️ मूकनायक
▪️ समता पत्र
▪️ प्रबुद्ध भारत
Correct Answer: बहिष्कृत भारत
Question : 52
बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कोणी केली ?
▪️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
▪️ विठ्ठल रामजी शिंदे
▪️ महात्मा ज्योतिबा फुले
▪️ महर्षी कर्वे
Correct Answer: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Question : 53
इस 1927 या वर्षी महाड येथे चवदार तळे सत्याग्रह कोणी केला ?
▪️ डॉ. आंबेडकर
▪️ महात्मा गांधी
▪️ साने गुरुजी
▪️ सेनापती बापट
Correct Answer: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Question : 54
थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक कोण ?
▪️ पंडित नेहरू
▪️ महात्मा गांधी
▪️ राजेंद्र प्रसाद
▪️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Correct Answer: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Question : 55
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांकरिता गोलमेज परिषदेत कशाची मागणी केली ?
▪️ स्वतंत्र मतदारसंघ
▪️ आरक्षण
▪️ स्त्री शिक्षण
▪️ मंदिर प्रवेश
Correct Answer: स्वतंत्र मतदारसंघ
Question : 56
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी जनता पत्र व खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचा वापर केला ?
▪️ सुधारक
▪️ वर्तमान दीपिका
▪️ विचार लहरी
▪️ मूकनायक
Correct Answer: मूकनायक
Question : 57
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यात झालेल्या पुणे करारावर कोणी स्वाक्षऱ्या केल्या ?
▪️ टिळक व आंबेडकर
▪️ आगरकर व महात्मा गांधी
▪️ महात्मा गांधी व आंबेडकर
▪️ रानडे व आगरकर
Correct Answer: महात्मा गांधी व आंबेडकर
Question : 58
1946 साली पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली ?
▪️ महर्षी धोंडो केशव कर्वे
▪️ कर्मवीर भाऊराव पाटील
▪️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
▪️ महात्मा गांधी
Correct Answer: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Question : 59
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा कोणत्या ठिकाणी घेतली ?
▪️ दिल्ली
▪️ मुंबई
▪️ नागपूर
▪️ अमरावती
Correct Answer: नागपूर
Question : 60
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मरणोत्तर प्रकाशित झालेला ग्रंथ कोणता ?
▪️ बुद्ध ॲन्ड हिज धम्म
▪️ थॉट्स ऑन पाकिस्तान
▪️ व्ह वेअर द शूद्राज
▪️ कास्ट इन इंडिया
Correct Answer: बुद्ध ॲन्ड हिज धम्म
Question : 61
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक हे वृत्तपत्र कोणाच्या मदतीने सुरू केले ?
▪️ राजर्षी शाहू महाराज
▪️ महात्मा फुले
▪️ गोपाळ गणेश आगरकर
▪️ सयाजीराव गायकवाड
Correct Answer: राजर्षी शाहू महाराज
Question : 62
दि अनटचेबल या ग्रंथाचे लेखक कोण आहेत ?
▪️ सुभाष चंद्र बोस
▪️ स्वातंत्र्यवीर सावरकर
▪️ डॉ. भीमराव आंबेडकर
▪️ महात्मा गांधी
Correct Answer: डॉ. भीमराव आंबेडकर
Question : 63
बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करण्यासाठी कोणता पक्ष स्थापन केला ?
▪️ शेड्युल्ड कास्ट फेडरेशन
▪️ स्वतंत्र मजूर पक्ष
▪️ समतापक्ष
▪️ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया
Correct Answer: शेड्युल कास्ट फेडरेशन
Question : 64
महात्मा गांधी व आंबेडकर यांच्यात पुणे करार होऊन ...........
▪️ दलितांचे स्वतंत्र मतदार संघ देण्यात आले.
▪️ दलितांना राखीव मतदारसंघ देण्यात आले.
▪️ केंद्रीय कायदेमंडळात दलितांना राखीव जागा देण्यात आल्या नाहीत.
▪️ प्रांतिक कायदेमंडळात दलितांना स्वतंत्र जागा देण्यात आल्या.
Correct Answer: दलितांना राखीव मतदारसंघ देण्यात आले
Question : 65
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले ?
▪️ येवला - नाशिक
▪️ कामठी - नागपूर
▪️ महाड - रायगड
▪️ पातुर्डा - बुलढाणा
Correct Answer: महाड-रायगड
Question : 66
बंदिस्त वर्ग म्हणजे जात होय ही व्याख्या कोणी केली ?
▪️ महात्मा ज्योतिबा फुले
▪️ कर्मवीर भाऊराव पाटील
▪️ महात्मा गांधी
▪️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Correct Answer: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Question : 67
पैकी कोणता ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिला नाही ?
▪️ पाली ग्रामर
▪️ फिलॉसॉफी ऑफ हिंन्दुइझम
▪️ बुद्ध ॲण्ड कार्ल मार्क्स
▪️ गुलामगिरी
Correct Answer: गुलामगिरी
Question : 68
महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या आर्थिक मदतीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणते वर्तमानपत्र सुरू केले ?
▪️ बहिष्कृत भारत
▪️ मूकनायक
▪️ प्रबुद्ध भारत
▪️ जनता
Correct Answer: बहिष्कृत भारत
Question : 69
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी यशस्वीरित्या चालवलेल्या पाक्षिकाचे नाव काय ?
▪️ भारतीय अस्पृश्यता
▪️ प्रभाकर
▪️ साधना
▪️ बहिष्कृत भारत
Correct Answer: बहिष्कृत भारत
Question : 70
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली ते स्थळ कोणते ?
▪️ नागपूर
▪️ महाड
▪️ नाशिक
▪️ पुणे
Correct Answer: नागपूर
Question : 71
25 डिसेंबर 1927 रोजी डॉक्टर आंबेडकर यांनी --------- या ग्रंथाचे दहन केले ?
▪️ मनुस्मृति
▪️ महाभारत
▪️ बायबल
▪️ अवेस्ता
Correct Answer: मनुस्मृति
Question : 72
राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे असे म्हणणारे कर्ते समाजसुधारक कोण ?
▪️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
▪️ गोपाळ गणेश आगरकर
▪️ महात्मा गांधी
▪️ महर्षी शिंदे
Correct Answer: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Question : 73
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अंबावडेकर हे आडनाव बदलून आंबेडकर हे नाव कोणी दिले ?
▪️ केशव गोविंद आडरेकर
▪️ कृष्णाजी अर्जुन केळुसकर
▪️ कृष्णाजी केशव आंबेडकर
▪️ शंकरदास नारायणदास बर्वे
Correct Answer: कृष्णाजी केशव आंबेडकर

Your Score

Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /

4 Comments

Previous Post Next Post