Takhatmal Jain Samiti Information In Marathi
तखतमल जैन समिती बद्दल संपूर्ण माहिती
स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात महत्त्वाच्या समित्या आणि आयोगांचे ज्ञान अपरिहार्य आहे . भारताच्या प्रशासकीय भूभागावर अमिट छाप सोडलेली अशीच एक उल्लेखनीय समिती म्हणजे तखतमल जैन समिती . या समितीच्या अंतर्दृष्टी आणि शिफारशींचे विविध क्षेत्रांमध्ये दूरगामी परिणाम आहेत
या लेखात, आपण तखतमल जैन समिती बद्दल जाणून घेणार आहोत . तखतमल जैन यांच्या सक्षम नेतृत्वाखाली 1966 मध्ये स्थापन झालेल्या या समितीवर केंद्र आणि राज्य पातळीवर प्रशासकीय सुधारणांसाठी शिफारशी तयार करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सोपविण्यात आले होते
Takhatmal jain samiti in marathi : केंद्र तसेच राज्यातील प्रशासकीय सुधारणा संबंधित शिफारशी करण्याच्या उद्देशाने 17 जुलै 1966 रोजी तखतमल जैन यांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली . समितीने 28 फेब्रुवारी 1967 मध्ये केंद्र सरकारला आपला अहवाल सादर केला . अहवालामध्ये समितीने खालील महत्त्वाच्या शिफारशी केल्या आहेत .
❒ तखतमल जैन समितीच्या शिफारशी
● त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था पद्धतीचा अवलंब करावा
● 20 हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या क्षेत्रात ग्रामपंचायतीची स्थापना करू नये
● तीन हजार ते पाच हजार लोकसंख्येसाठी एक ग्रामपंचायत स्थापन करावी
● ग्रामपंचायत मध्ये किमान 9 व कमाल 19 सदस्य असावेत
● सरपंचाची निवड प्रत्यक्ष प्रौढ मताधिकार पद्धतीने म्हणजे जनतेकडून व्हावी
● ग्रामपंचायत सदस्यांचा कार्यकाळ पाच वर्षापर्यंत असावा
● सर्व राज्यांनी राज्यात कायद्यानुसार ग्रामसभेची स्थापना करावी
● स्थानिक स्वराज्य संस्था संचालनालय ही संस्था स्थापन करावी
● पंचायत समितीमध्ये मध्ये किमान 40 व कमाल 60 सदस्य असावेत
● पंचायत समितीचे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सभासद असावेत
● पंचायतराज व्यवस्थेमध्ये महिला अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांना आरक्षीत जागा असाव्यात
● केंद्रीय वित्त आयोगाच्या धर्तीवर राज्यात राज्य वित्त आयोगाची स्थापना करावी
हे पण वाचा
● महान्यायवादी बद्दल संपूर्ण माहिती
छान माहिती
ReplyDelete