प्रा . पी . बी पाटील समिती बद्दल संपूर्ण माहिती - P B Patil Samiti ( in Marathi ) Mpsc battle

P.B Patil Samiti Information In Marathi

पी.बी पाटील समिती बद्दल संपूर्ण माहिती

महाराष्ट्रातील पंचायत राज्यव्यवस्थेचे मूल्यमापन करण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेली महत्त्वाची समिती म्हणजे प्राचार्य पी . बी पाटील समिती 

P. B.Patil Samiti : प्रा. पी बी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली  महाराष्ट्रातील पंचायत राज्यव्यवस्थेचे मूल्यमापन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 18 जून 1984 रोजी 9 सदस्यीय समितीची  स्थापना केली

❒ समिती : प्रा.पी.बी पाटील समिती 
❒ स्थापना : 18 जून 1948
❒ अध्यक्ष : प्रा.पी.बी पाटील

❒ सदस्य : 8 

पी.बी.पाटील समितीमध्ये खालील सदस्यांचा समावेश होता . 
पी बी पाटील समिती मधील सदस्यांची नावे :
  1. शहाजीराव पाटील
  2. रणजीत देशमुख
  3. दादासाहेब लिमये
  4. आनंद नाडकर्णी
  5. शामराव कदम
  6. सुब्रमण्यम एस
  7. वामनराव गड्डमवार
  8. प्रभाकर रुपवते

❒ प्रा. पी बी पाटील समीतिचा उद्देश : 

पंचायत राज व्यवस्थेचे पुनर्विलोकन करणे . म्हणून या समितीला पंचायत राज पुनर्विलोकन समिती असेही म्हणतात

❒ अहवाल सादर : जून 1986

समितीने जून १९८६ मध्ये राज्य सरकारला आपला अहवाल सादर केला . या अहवालात पंचायतराज व्यवस्था  मजबूत करणे त्यांना आर्थिक स्वायत्तता  तसेच बळकटी प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने राज्य सरकारला  महत्त्वपूर्ण शिफारशी केल्या . या शिफारशी कोणत्या या बद्दल सविस्तर माहिती या लेखात देण्यात आली आहे .

❒ समितीच्या शिफारशी

प्राचार्य पी . बी . पाटील समितीने केलेल्या  महत्वाच्या १५८ शिफारशी पुढीलप्रमाणे :

● पंचायतीच्या निवडणूका वेळेवर व नियमित होण्यासाठी राज्यस्तरावर स्वतंत्र निवडणूक यंत्रणा निर्माण करावी 

Note : १९९२ च्या ७३ व्या घटनादुरुस्ती नुसार कलम २४३ K  अंतर्गत स्वतंत्र निवडणूक यंत्रणेची म्हणजेच राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली आहे

● मुंबई ग्रामपंचायम अधिनियम 1958 जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 या दोन्हीही कायद्यांचे एकत्रीकरण करून स्वतंत्र असा एक महाराष्ट्र पंचायतराज अधिनियम तयार करावा

● लोकशाही विकेंद्रीकरणासोबतच जास्तीत जास्त आर्थिक विकेंद्रीकर भर द्यावा म्हणजेच कृषी व ग्रामीण लघुउद्योगांना चालना द्यावी 

● जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे नाव बदलून जिल्हा विकास  नियोजन व मूल्यमापन मंडळ करावे . 
जिल्हा परीषद अध्यक्ष हा मंडळाचा अध्यक्ष असेल तसेच मंडळामध्ये आमदार व खासदार यांना सदस्यत्व द्यावे

● ग्रामपंचायत व गट पातळी ( तालुका ) स्तरावर लोक न्यायपंचायतीची स्थापना करावी 

● जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण समिती ऐवजी शिक्षण मंडळ स्थापन करावे 

● राज्याने शिक्षण हा विषय पंचायतराजकडे सोपवावा 

● पंचायतराज व्यवस्थेसाठी स्वतंत्र नोकर यंत्रणा असावी म्हणजेच स्थानिक स्वशासन सेवा किंवा स्थानिक स्वराज्य सेवांची निर्मिती करावी 

● जिल्हा पातळीवर स्थानिक स्वराज्य परीषद संस्था स्थापन करावी 

● पंचायतराज प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संशोधन अभ्यास व प्रशिक्षण संस्था स्थापन करावी 

● जिल्हा विकास आयुक्त पद निर्माण  करून त्यावर IAS दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करावी 

● जिल्हाधिकाऱ्याचे जिल्हा दंडाधिकारी म्हणून असलेले अधिकार सोडून इतर सर्व अधिकार जिल्हा विकास आयुक्ताकडे द्यावे 

पी . बी . पाटील समितीने आपल्या अहवालात  ग्रामपंचायत  पंचायत समिती व जिल्हा परिषद बद्दल महत्त्वपूर्ण शिफारशी केलेल्या आहेत त्या शिफारशी खालीलप्रमाणे :

■ ग्रामपंचायत बद्दल शिफारशी

पी.बी.पाटील समितीने पंचायत समिती बद्दल केलेल्या शिफारशी खालीलप्रमाणे :

● ग्रामपंचायतीची  स्थापना - 2000 किंवा 2000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावात ग्रामपंचायतीची स्थापना करावी 

● लोकसंख्येच्या आधारावर ग्रामपंचायतीचे वर्गीकरण  करावे .

● 2000 लोकसंख्या असलेल्या गावातील नगरपरिषदेचे रुपांतर अ किंवा ब वर्ग ग्रामपंचायतीमध्ये करावे

● ग्रामपंचायतीचे सदस्य संख्या किमान ७ व कमाल २१ इतकी असावी

● सरपंचाची निवड थेट मतदारांकडून करावी

● प्रत्येक महसूल गावात स्वतंत्र ग्रामसभा असावी

● ग्रामपंचायत व ग्रामसभा यांना जास्तीचे अधिकार द्यावेत . ग्रामसभेची बैठक वर्षातून एकदा घ्यावी

● सरपंचाला मानधनाऐवजी वार्षिक आतिथ्य भत्ता द्यावा 

● ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या 30 हजारापेक्षा जास्त आहे अशा ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपालिका मध्ये करावे

● ग्रामसभा व ग्रामपंचायत यांच्यामध्ये लोकनियुक्त पंचसभा असावी  

यामध्ये किमान २० व कमाल  पंच असावेत . याची निवड प्रत्यक्ष जनतेकडून केली जावी  

● पंचसभेचा कार्यकाल ५ वर्षाचा असावा सभेची बैठक ३ महिण्यातून एकदा घ्यावी

■ पंचायत समिती बद्दल शिफारशी

पी.बी.पाटील समितीने पंचायत समिती बद्दल केलेल्या शिफारशी खालीलप्रमाणे :

● १ लाख लोकसंख्या असलेल्या क्षेत्रात पंचायतीची स्थापना करावी

● दुर्गम डोंगराळ - विरळ लोकसंख्या असेलेल्या भागात लोकसंख्येची मर्यादा किमान ५० हजार असावी

● सरपंचांना पंचायत समितीमध्ये प्रत्यक्ष सहभाग द्यावा

● पंचायत समिती क्षेत्रातील जिल्हा परिषद सदस्य व  अ , ब , क वर्ग नगरपालिका अध्यक्ष यांचा समावेश पंचायत समितीत करावा 

● पंचायत समितीचे सभापती हे जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असावेत

● पंचायतीला निगम निकाय दर्जा देण्याची गरज नाही

● पंचायत समितीच्या निवडणूका अप्रत्यक्ष घेण्यात याव्यात

■ जिल्हा परिषद बद्दल शिफारशी

पी . बी . पाटील समितीने जिल्हा परिषद बद्दल केलेल्या शिफारशी खालील प्रमाणे :

● १५ - २० लाख लोकसंख्येसाठी जिल्हा परीषदेची स्थापना करावी

● जिल्हा परिषदेतील निर्वाचित सदस्यांची संख्या किमान ४० व कमाल ७५ इतकी असावी 

● जिल्हा परिषद एकूण निर्वाचीत जागांपैकी किमान २५ % ( १/४ जागा ) जागा महिलांसाठी राखीव असाव्यात

● अनुसूचित जाती-जमातींना राखीव जागा त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात असाव्यात

● आमदार - खासदार यांना जिल्हा परिषदेमध्ये  प्रतिनिधित्व देऊ नये 

● पंचायत समितीचे सभापती हे जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असावेत

● जिल्हा परिषद सदस्यांना शिक्षणाची अट नसावी

● जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांनी १० वर्षांपेक्षा अधिक काळ पदावर राहू नये अशी तरतुद करावी 

● अविश्वासाचा ठाव निर्वाचित सदस्यांच्या एकूण संख्येच्या किमान १/३ सदस्यांनी मांडावा आणि निर्वाच सदस्यांच्या बहुमताने अविश्वास ठराव संमत करावा  

● अविश्वास ठराव एकदा फेटाळल्यास पुन्हा १ वर्ष मांडता येणार नाही अशी तरतूद करावी

● जिल्हा परिषदेमध्ये एकूण ८ विषय समित्या असाव्यात 👇
  1. सामान्य प्रशासन व वित्त समिती
  2. कृषी समिती 
  3. उद्योग समिती  
  4. बांधकाम समिती 
  5. कार्यकारी समिती 
  6. कृषी मंडळ 
  7. आरोग्य समिती 
  8. समाजकल्याण व आदिवासी कल्याण समिती

● जिल्ह्यातील अ , ब , क वर्ग नगरपालिका अध्यक्ष यांना जिल्हा परिषदेमध्ये पदसिद्ध सहयोगी सभासदत्व द्यावे

अश्या प्रकारच्या महत्वपूर्ण शिफारशी पी बी पाटील समितीने आपल्या अहवालात नमूद केलेल्या आहेत  

❒ पी.बी.पाटील समितीचा अहवाल

पी . बी . पाटील समितीने जून १९८६ रोजी आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला समितीने केलेल्या काही शिफारशी राज्य सरकारने स्विकारल्या  त्यानुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायती समिती अधिनियमात आवश्यक ते बदल घडवून आणण्यात आले

हे पण वाचा 

● पंचायतराज बद्दल माहिती

● 73 वी घटनादुरुस्ती

● वसंतराव नाईक समिती

● बलवंतराय मेहता समिती

● ग्रामसेवक माहिती

● महान्यायवादी बद्दल संपूर्ण माहिती

● महाधिवक्ता माहिती

● महानगरपालिका आयुक्त माहिती

● GVK Rao समिती

● पी . बी पाटील समिती

● पोलीस पाटील माहिती

● 74 वी घटनादुरुस्ती

● नगरपरिषद माहिती

● औद्योगिक वसाहत नगर प्राधिकरण

● कोतवाल माहिती

Post a Comment

Previous Post Next Post