महानगरपालिका आयुक्त बद्दल संपूर्ण माहिती
महानगरपालिकेच्या प्रशासन व्यवस्थेमध्ये अत्यंत महत्वाचे स्थान असलेला अधिकारी म्हणजे आयुक्त . आयुक्त हा महानगर पालिकेचा सर्वोच्च प्रशासकीय प्रमुख असतो . तो महानगर पालिकेचा मुख्य प्रशासकीय किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो त्याला महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकारी अधिकार देण्यात आलेले असतात .
महानगरपालिकेचा प्रशासकीय कारभार आयुक्ता मार्फत चालवला जातो. तो महानगरपालिकेचा पदसिद्ध सचिव असतो ; त्यामुळे महानगर पालिकेच्या कार्यकारी सत्तेची सर्व सूत्रे त्याच्या हाती एकवटलेली असतात .
❒ आयुक्त पदाची निर्मिती
भारतामध्ये महानगरपालिका आयुक्त हे पद 1865 साली निर्माण करण्यात आले . ब्रिटीश कालखंडात निर्माण करण्यात आलेले महानगरपालिका आयुक्त हे पद आजही अस्तित्वात आहे
❒ आयुक्तांची निवड
महानगरपालिका आयुक्तांची निवड कोण करते ?
महानगरपालिका आयुक्त हा भारतीय प्रशासकीय सेवेतील ( IAS ) वरिष्ठ सनदी अधिकारी असतो . त्यांची IAS अधिकारी म्हणून निवड केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून केली जाते .
❒ आयुक्तांची नेमणूक
महानगरपालिका आयुक्तांची नेमणूक किंवा नियुक्ती कोण करते ?
भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ सनदी अधिकाऱ्याची आयुक्तपदी नेमणूक किंवा नियुक्ती संबंधित राज्यशासनाकडून केली जाते .
केंद्रशासित प्रदेशांमध्ये असलेल्या महानगर पालिकेच्या आयुक्तांची नेमणूक संसद करते .
❒ आयुक्तांचा कार्यकाल
महानगरपालिका आयुक्तांचा कार्यकाल किती ?
राज्यशासन आयुक्ताची नियुक्ती एकावेळी तीन वर्षासाठी करते ; परंतु तीन वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर सुद्धा राज्यशासन त्याला मुदत वाढ देऊ शकते . किंवा कालावधी संपण्यापूर्वी पदावरून दूर करु शकते
❒ आयुक्तांना पदच्युत
महानगरपालिका आयुक्तांना पदच्युत कोण करते ?
आयुक्तांना पदच्युत करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे ; त्याकरिता महानगरपालिकेच्या सदस्यांनी आयुक्तांना पदावरून दूर करण्यासाठी महानगरपालिकामध्ये ठराव मांडावा लागतो
● पदच्युत ठराव : महानगरपालिकेच्या एकूण सदस्यांपैकी 5/8 सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले की राज्यसरकार आयुक्तांना पदावरून दूर करते .
● आयुक्तांना पदच्युत करण्याची कारणे
1 ) असमर्थता : जर आयुक्त त्याच्या किंवा तिच्या पदाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात असमर्थ असल्याचे दिसून आले, तर त्याला किंवा तिला पदच्युत केले जाऊ शकते
2 ) नागरिकांकडून निषेध : जर महानगरपालिकेच्या नागरिकांनी आयुक्तांच्या कारभारावर निषेध केला तर त्यांना पदच्युत केले जाऊ शकते. उदाहरणार्थ, जर नागरिकांना आयुक्तांची नियुक्ती निवडणुकीद्वारे निवडून आलेल्या नगरसेवकांच्या इच्छेविरूद्ध असल्याचे वाटत असेल, तर ते आयुक्तांच्या पदच्युतीची मागणी करू शकतात
3 ) कायदेशीर कारवाई : आयुक्तांवर कायदेशीर कारवाई झाल्यास, त्यांना पदच्युत केले जाऊ शकते. उदाहरणार्थ, जर आयुक्तांना भ्रष्टाचार किंवा आर्थिक गैरव्यवहारात अटक झाली तर त्यांना पदच्युत केले जाऊ शकते
4 ) कार्यक्षमतेची कमतरता : जर आयुक्त महानगरपालिकेच्या कार्यक्षमतेत सुधारणा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करत नसतील, तर त्यांना पदच्युत केले जाऊ शकते . उदाहरणार्थ, जर आयुक्त महानगरपालिकेच्या क्षेत्रात स्वच्छता, पाणीपुरवठा किंवा रस्त्यांच्या स्थितीसारख्या मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा करत नसतील, तर त्यांना पदच्युत केले जाऊ शकते
❒ आयुक्तांना रजा
महानगरपालिका आयुक्तांना रजा कोण देते ?
● 2 महीन्यासाठी ➙ म.न.पा स्थायी समिती
● 2+ महीन्यासाठी ➙ राज्यसरकार
❒ आयुक्तांना वेतन
महानगरपालिका आयुक्तांना वेतन कोण देते ?
महानगरपालिका आयुक्तांना वेतन महानगरपालिका निधीतून दिले जाते आयुक्तांना किती वेतन द्यावे ठरवण्याचा अधिकार राज्यसरकारला आहे .
❒ आयुक्तांवर नियंत्रण
महानगरपालिका आयुक्तांवर नियंत्रण कोण ठेवते ? महानगर पालिका आयुक्तांवर नियंत्रण कोणाच असते महानगरपालिका आयुक्तांवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार ⤵
● प्रशासकीय नियंत्रण ➙ राज्य सरकार
● राजकीय नियंत्रण ➙ म.न.पा महापौर
❒ आयुक्तांना बडतर्फ व निलंबित
महानगरपालिका आयुक्तांना बडतर्फ व निलंबित कोण करते ?
● बडतर्फ (Dismissal) - बडतर्फ म्हणजे सेवेतून कायमच काढून टाकणे .
● निलंबन (suspended) - निलंबन म्हणजे सेवेतून तात्पुरते काढून टाकणे
आयुक्त हे वरिष्ठ सनदी अधिकारी असतात . त्यांची निवड केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून केली जाते ; त्यामुळे त्यांना बडतर्फ किंवा निलंबित करण्याचा अधिकारही केंद्र सरकारला म्हणजेच ( कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग DoPT) या केंद्रीय संस्थेला आहे . या संस्थेचे अध्यक्ष पंतप्रधान असतात
❒ आयुक्तांचे अधिकार व कार्य
● महानगर पालिकेच्या ठराव आदेश निर्णयांची अंमलबजावणी करणे
● महानगरपालिकेच्या विकास कामावर नियंत्रण व देखरेख ठेवणे
● महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे वेतन - भत्ते रजा निवृत्तीवेतन संबंधीचे प्रश्न सोडवणे
● महानगरपालिकेचा अर्थसंकल्प / अंदाजपत्रक तयार करुन स्थायी समितीला सादर करणे
● 31 जुलै पूर्वी पर्यावरण परीस्थिती विषयक अहवाल महानगर पालिका मध्ये सादर करणे
● वार्षिक प्रशासन अहवाल व लेखा विवरणपत्र तयार करुण महानगरपालिकेला सादर करणे
● महानगरपालिकेच्या सभेत उपस्थितीत राहणे परंतु मतदान करण्याचा अधिकार नाही
● महानगर पालिका मध्ये वर्ग 3 व वर्ग 4 च्या कर्मचाऱ्यांची भरती करणे
● महानगर पालिका मध्ये हंगामी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे
● महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करणे
● स्थायी समितीचा सचिव म्हणून कार्य करणे
● महानगर पालिकेच्या प्रशासनावर नियंत्रण ठेवणे
● महानगरपालिका क्षेत्रातील कर गोळा करणे
● महानगरपालिका क्षेत्रातील अतिक्रमण हटवणे
हे पण वाचा
● महान्यायवादी बद्दल संपूर्ण माहिती