औद्योगिक वसाहतीत विकास प्राधिकरण बद्दल संपूर्ण माहिती
भारतीय संविधानाच्या कलम 243(Q) नुसार, राज्य सरकार औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी आणि औद्योगिक क्षेत्राच्या व्यवस्थापन आणि विकासासाठी कोणतेही नागरी क्षेत्र किंवा त्याचा काही भाग औद्यागिक नगरी म्हणून स्थापन करू शकते अशी घटनेत आहे त्यानुसार ,
महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नागरी कायदा 1965 या कायद्याखाली कलम 341 (फ) नुसार औद्योगिक नगरी वसाहतीची स्थापना केली जाते.
कायदेशीर तरतुदी
- निगम निकाय संस्था - त्यास मालमत्ता बाळगण्याचा संपादन करण्याचा अधिकार असतो . तसेच त्यास दुसऱ्यावर किंवा दुसरे त्याच्यावर खटला दाखल करू शकतात.
सदस्य - 5
- निवड - औद्योगिक वसाहत नगर प्राधिकरण सदस्यांची निवड अप्रत्यक्ष पद्धतीने खालीलप्रमाणे केली जाते :
1 सदस्य - औद्योगिक वसाहत नगर प्राधिकरण ज्या जिल्ह्यामध्ये असेल तेथील जिल्हाधिकाऱ्यांकडून
2 सदस्य - महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा कडून
2 सदस्य - औद्योगिक वसाहत नगर प्राधिकरण वसाहतीतील औद्योगिक युनिट संघाकडून
- कार्यकाळ - 5 वर्ष
- राजीनामा - अध्यक्षांकडे
अध्यक्ष
- नेमणूक - महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ( MIDC ) किंवा सहकारी संस्थेकडून केली जाते
- कार्यकाल - 5 वर्ष
- राजीनामा - जिल्हाधिकाऱ्यांकडे
प्राधिकरणाची सभा
औद्योगिक वसाहत नगर प्राधिकरणाची सभा वर्षातून 12 वेळा म्हणजे प्रत्येक महिन्याला एक होते
हे पण वाचा
- पंचायतराज बद्दल माहिती
- 73 वी घटनादुरुस्ती
- वसंतराव नाईक समिती
- बलवंतराय मेहता समिती
- ग्रामसेवक माहिती
- महान्यायवादी बद्दल संपूर्ण माहिती
- महाधिवक्ता माहिती
- महानगरपालिका आयुक्त माहिती
- GVK Rao समिती
- पी . बी पाटील समिती
- पोलीस पाटील माहिती
- 74 वी घटनादुरुस्ती
- नगरपरिषद माहिती
- औद्योगिक वसाहत नगर प्राधिकरण
- कोतवाल माहिती