Gramsevak Information In Marathi
ग्रामसेवक बद्दल संपूर्ण माहिती
जर तुम्ही ग्रामसेवक परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला ग्रामसेवक बद्दल माहिती असणे आवश्यक आहे . या लेखांमध्ये आपण ग्रामसेवक बद्दल माहिती सविस्तर पणे पाहणार आहोत
ग्रामसेवक म्हणजे काय ?
गावातील विकास योजनांची आखणी आणि त्याची अंमलबजावणी करणारा ग्राम विकास अधिकारी म्हणजे ग्रामसेवक . जो ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कार्य पाहतो .
सामुदायिक कल्याण आणि विकासाच्या बाबतीत गावकऱ्यांना सल्ला देण्याची महत्वपूर्ण भूमिका ग्रामसेवकाची असते .
प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक ग्रामसेवक किंवा विशिष्ट परिस्थितीत एकापेक्षा अधिक ग्रामपंचायतीसाठी एकाच ग्रामसेवकाची नेमणूक करण्याची तरतूद महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 60 मध्ये देण्यात आली आहे .
त्यानुसार ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवकांची नेमणूक करण्यासाठी खालील पद्धतीने परीक्षा घेऊन ग्रामसेवकांची ग्रामपंचायतीवर नेमणूक केली जाते .
❒ ग्रामसेवक परीक्षेकरिता पात्रता
जर तुम्हाला ग्रामसेवक होण्याची इच्छा असेल तर ग्रामसेवक परिक्षा देण्यासाठी तुमच्याकडे खालील पात्रता असणे आवश्यक आहे .
1 | कोणत्याही शाखेतून 12 वी पास व 12 वी ला किमान 60 टक्के मार्क असणे आवश्यक |
MCVC शाखेतून 12 वी पास | |
इंजिनिअरिंग OR डिप्लोमा OR समाज कल्याण पदवी | |
Agree | |
Btech | |
यापैकी कोणतीही एक पात्रता आवश्यक | |
2 | MS-CIT Course केलेला असावा |
3 | वयोमर्यादा : 18-38 वर्षे आहे महाराष्ट्र सरकार वय सवलत : OBC – 3 वर्ष & SC/ST - 5 वर्षे |
4 | तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा |
लक्षात ठेवा - ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक हा पदवीधर असावा अशी शिफारस बाबुराव काळे या समितीने केली होती .
❒ ग्रामसेवक परीक्षा स्वरूप
ग्रामसेवक परीक्षा खालील प्रमाणे एकूण तीन टप्प्यांमध्ये घेतली जाते .
1 ) लेखी परीक्षा - Written Exam
ग्रामसेवक पदासाठी एकूण 200 गुणांची परीक्षा घेतली जाते ज्याच्या मध्ये 100 प्रश्न विचारले जातात एक प्रश्न 2 मार्कासाठी विचारला जातो प्रश्नांचे विश्लेषण खालील प्रमाणे
क्र | एकूण विषय : 5 | प्रश्न : 100 | गुण : 200 |
1 | कृषी | 40×2 | 80 |
2 | मराठी व्याकरण | 15×2 | 30 |
3 | इंग्रजी व्याकरण | 15×2 | 30 |
4 | सामान्य ज्ञान | 15×2 | 30 |
5 | अंकगणित व बुद्धिमत्ता | 15×2 | 30 |
2 ) मुलाखत
3 ) शारिरिक चाचणी
❒ ग्रामसेवकाची निवड कोण करते ?
ग्रामसेवकाची निवड ही जिल्हाधिकारीच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या जिल्हा निवड समिती मार्फत स्पर्धा परीक्षाद्वारे केली जाते
याकरिता वरीलप्रमाणे परीक्षा घेतली जाते व उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवाराची ग्रामपंचायतीवर ग्रामसेवक म्हणून नेमणूक केली जाते
❒ ग्रामसेवकाची नेमणूक कोण करते ?
ग्रामसेवक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची ग्रामपंचायतीवर नेमणूक करण्याचा अधिकार हा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला आहे .
गावचा विस्तार गावची एकूण लोकसंख्या आणि ग्रामपंचायतीची प्राप्ती या बाबींचा विचार करून जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी एका ग्रामसेवकाकडे किती ग्रामपंचायतीची जबाबदारी सोपवायची हे निर्धारित करतात .
❒ ग्रामसेवकाबद्दल माहिती
ग्रामपंचायत सचिव - ग्रामसेवकाबद्दल माहिती | ||
---|---|---|
● | नेमणूक | जिल्हा परिषद CEO |
● | बदली | जिल्हा परिषद CEO |
● | बढती | जिल्हा परिषद CEO |
● | निलंबन | जिल्हा परिषद CEO |
● | निवृत्तीचे वय | नियुक्तीपासून वयाच्या 60 वर्षापर्यंत |
● | नियंत्रण | ⤵ |
राजकीय नियंत्रण | सरपंच | |
प्रत्यक्ष नियंत्रण | गटविकास अधिकारी | |
अप्रत्यक्ष नियंत्रण | जिल्हा परिषद CEO | |
● | वेतन | जिल्हा निधीतून |
● | रजा | ⤵ |
किरकोळ रजा | गटविकास अधिकारी | |
अर्जित रजा | जिल्हा परिषद CEO | |
● | राजीनामा | जिल्हा परिषद CEO |
❒ ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक संबंध
● ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा तसेच ग्रामसभेचा सचिव असतो
● ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कार्य करत असला तरी तो ग्रामपंचायतीचा नोकर / सेवक नसतो
● ग्रामसेवक ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख असतो
● तो जिल्हा परिषदेच्या ग्राम विकास खात्याचा वर्ग 3 मधील सेवक असतो
❒ ग्रामसेवकाचे वेतन किती ?
महाराष्ट्र शासनाने ग्रामसेवकाच्या वेतन श्रेणीत वाढ करून त्यासाठी नवीन वेतन 5200 ते 20200 + Grade pay 2400 पर्यंत वाढवले आहे तर 12 वर्षाच्या सेवेनंतर Grade pay 3500 पर्यंत वाढवले जाईल .
Note : हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की येथे प्रदान केलेली पेमेंट माहिती 2022 पर्यंत उपलब्ध असलेल्या ज्ञानावर आधारित आहे . वेतन श्रेणी मध्ये काळानुरूप बदल होत असतात त्यामुळे सर्वात अचूक आणि अद्ययावत माहितीसाठी, अधिकृत सरकारी स्रोतांचा संदर्भ घ्या .
❒ महाराष्ट्रातील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र
क्र | जिल्हा | ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र |
१ | अमरावती | अमरावती |
२ | परभणी | परभणी |
३ | बुलढाणा | बुलढाणा |
४ | जालना | जालना |
५ | कोल्हापूर | गारगोटी |
६ | चंद्रपूर | सिंदेवाही |
७ | पुणे | मांजरी - कोसबाड |
❒ ग्रामसेवकाची कार्य आणि कर्तव्य
● ग्रामसभेचा सचिव म्हणून कार्य करणे
● ग्रामनिधीची संपूर्ण जबाबदारी सांभाळणे
● जन माहिती अधिकारी म्हणून कार्य करणे
● ग्रामपंचायतीचे दप्तर सांभाळणे
● ग्रामस्थांना विविध दाखले देणे
● मजूर नोंदणी अधिकारी म्हणून कार्य करणे
● ग्रामपंचायतीचे वार्षिक अहवाल आणि हिशोब पंचायत समितीस व जिल्हा परिषदेला सादर करणे
● ग्रामपंचायतीच्या सभा व ग्रामसभा व तिच्या बैठकांच्या इतिवृत्ताची नोंद ठेवणे
● गावात विकासाची योजना आखणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे
● विस्तार अधिकाऱ्याच्या सल्ल्याने शासकीय योजनांची माहिती देणे व अंमलबजावणी करणे
● ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख या नात्याने ग्रामपंचायतीचे कार्यालयीन कामकाज पाहणे आणि तिचे दैनंदिन प्रशासन चालवणे
● ग्रामपंचायतीच्या ठरावांची आणि निर्णयांची अंमलबजावणी करणे
● ग्रामपंचायतीच्या नोकर वर्गावर नियंत्रण व देखरेख ठेवणे
● ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांचे हिशोब ठेवणे कर वसुली करणे
● विवाह नोंदणी निबंधक अधिकारी म्हणून कामकाज पाहणे
● बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून कार्य करणे
● आपत्कालीन समितीचा सचिव म्हणून कार्य करणे
● जन्म-मृत्यू नोंदणी निबंधक म्हणून काम पहाणे
● जैवविविधता समिती सचिव म्हणून कामकाज संभाळणे
● महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 60 (क) (2) नुसार - ग्रामपंचायतीच्या विकास कामांच्या खर्चाचा अहवाल तयार करून तो ग्रामसभेसमोर सादर करणे व ग्रामपंचायतीच्या सुचना फलकावर लावणे
वरील कार्यात जर ग्रामसेवकांनी कसूर केली तर महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा ( शिस्त व अपील ) नियम 1964 नुसार ग्रामसेवकावर कारवाई केली जाते
✾✾✾
ग्रामसेवक माहिती संबंधी आपल्याला काही शंका असल्यास Massage box द्वारे आमच्याशी संपर्क साधा . ग्रामसेवक माहिती आवडल्यास जरूर शेअर करा
हे पण वाचा
● महान्यायवादी बद्दल संपूर्ण माहिती
Khoop chhan
ReplyDelete