RRB Group D Mock Test in Marathi | रेल्वे भरती सराव प्रश्नपत्रिका

RRB Group D Free Mock Test in Marathi | Railway Group D Online Test in Marathi

RRB Group D Mock Test in Marathi | Railway Group D Online Test | Objective Q&A - रेल्वे भरती सराव पेपर

🚆 भारतीय रेल्वेतील Group D पदांसाठीची परीक्षा ही लाखो विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी असते. पण या स्पर्धेत यश मिळवायचे असेल,योग्य मार्गदर्शन, नियमित सराव, आणि खऱ्या परीक्षेसारखा अनुभव देणाऱ्या मॉक टेस्ट सुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत

🌐 म्हणूनच MPSC Battle वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही रेल्वे भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी या पेजवर मोफत RRB Group D Mock Test दिलेल्या आहेत , ज्याद्वारे तुम्ही ऑनलाइन सराव चाचण्या (Online Tests) देऊन तुमची तयारी अधिक मजबूत करू शकता. येथे दिलेले रेल्वे ग्रुप D प्रॅक्टिस टेस्ट पेपर पूर्णपणे मराठी भाषेत आहेत, ज्यामुळे मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यास अधिक सोपा आणि समजण्यासारखा होतो

📋 प्रत्येक टेस्टमध्ये सामान्य ज्ञानावर आधारित निवडक व दर्जेदार 25 प्रश्न दिलेले आहेत. हे प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत

टेस्ट सोडवण्यासाठी - खालील लिंकवर क्लिक करा आणि प्रश्नांचा सराव सुरू करा

RRB Group D Mock Test
RRB Group D Mock Test

RRB Group D Mock Test | रेल्वे भरती ग्रुप डी सराव पेपर - 01

1 ) भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी करण्यात आले ?

▪️ 1951

▪️ 1957

▪️ 1948

▪️ 1956

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | 1951


2 ) भारतातील कोणते शहर 'गुलाबी शहर' म्हणून ओळखले जाते ?

▪️ मुंबई

▪️ दिल्ली

▪️ जयपूर

▪️ कोलकाता

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | जयपूर


3 ) 'मेक इन इंडिया' उपक्रम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला ?

▪️ 2012

▪️ 2014

▪️ 2016

▪️ 2018

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | 2014


4 ) 'स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड' (SAIL) चे मुख्यालय कोठे आहे ?

▪️ मुंबई

▪️ नवी दिल्ली

▪️ कोलकाता

▪️ चेन्नई

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | नवी दिल्ली


5 ) आधुनिक आवर्त सारणीचे जनक कोणाला मानले जाते ?

▪️ जॉन डाल्टन

▪️ दिमित्री मेंडेलीव्ह

▪️ हेन्री मोसले

▪️ रुदरफोर्ड

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | दिमित्री मेंडेलीव्ह


6 ) 'भांगडा' हे कोणत्या राज्याचे प्रसिद्ध लोकनृत्य आहे ?

▪️ गुजरात

▪️ पंजाब

▪️ महाराष्ट्र

▪️ राजस्थान

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | पंजाब


7 ) गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती कोठे झाली ?

▪️ कुशीनगर

▪️ बोधगया

▪️ सारनाथ

▪️ लुम्बिनी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | बोधगया


8 ) 1857 च्या उठावाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता ?

▪️ लॉर्ड डलहौसी

▪️ लॉर्ड कॅनिंग

▪️ लॉर्ड हार्डिंग

▪️ लॉर्ड वेलेस्ली

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | लॉर्ड कॅनिंग


9 ) पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे ?

▪️ CO2

▪️ NaCl

▪️ H2O

▪️ O2

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | H2O


10 ) 'नर्मदा बचाव आंदोलन' शी संबंधित प्रमुख व्यक्तिमत्व कोण आहे ?

▪️ सुंदरलाल बहुगुणा

▪️ मेधा पाटकर

▪️ अण्णा हजारे

▪️ एम एस स्वामीनाथन

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | मेधा पाटकर


11 ) ‘भारतरत्न’ पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली ?

▪️ 1950

▪️ 1954

▪️ 1960

▪️ 1965

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | 1954


12 ) प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी कोणता वायू आवश्यक आहे ?

▪️ ऑक्सिजन

▪️ नायट्रोजन

▪️ कार्बन डायऑक्साइड

▪️ हायड्रोजन

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | कार्बन डायऑक्साइड


13 ) भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?

▪️ डॉ. राजेंद्र प्रसाद

▪️ डॉ. बी आर आंबेडकर

▪️ जवाहरलाल नेहरू

▪️ सर बी एन राव

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | डॉ. बी आर आंबेडकर


14 ) मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे ?

▪️ यकृत Liver

▪️ मूत्रपिंड Kidney

▪️ स्वादुपिंड Pancreas

▪️ थायरॉइड Thyroid

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | यकृत (Liver)


15 ) दक्षिण आफ्रिकेतून परतल्यानंतर महात्मा गांधींनी पहिला सत्याग्रह कोठे सुरू केला ?

▪️ अहमदाबाद

▪️ चंपारण

▪️ बारडोली

▪️ दांडी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | चंपारण


16 ) खालीलपैकी कोणते रब्बी पीक आहे ?

▪️ तांदूळ

▪️ गहू

▪️ मका

▪️ बाजरी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | गहू


17 ) विद्युत प्रवाहाचे SI एकक काय आहे ?

▪️ व्होल्ट (V)

▪️ ओम (O)

▪️ ॲम्पिअर (A)

▪️ वॅट (W)

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | ॲम्पिअर (A)


18 ) 'कोणार्क' येथील सूर्य मंदिर कोणत्या राज्यात स्थित आहे ?

▪️ महाराष्ट्र

▪️ ओडिशा

▪️ गुजरात

▪️ तमिळनाडू

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | ओडिशा


19 ) 'हवेचा दाब' मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते ?

▪️ ॲमीटर

▪️ बॅरोमीटर

▪️ हायग्रोमीटर

▪️ लॅक्टोमीटर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | बॅरोमीटर


20 ) खालीलपैकी कोणत्या ग्रहाला 'लाल ग्रह' म्हणून ओळखले जाते ?

▪️ शुक्र

▪️ मंगळ

▪️ गुरु

▪️ शनी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | मंगळ


21 ) 'रणथंबोर राष्ट्रीय उद्यान' कोणत्या राज्यात स्थित आहे ?

▪️ गुजरात

▪️ मध्य प्रदेश

▪️ राजस्थान

▪️ उत्तर प्रदेश

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | राजस्थान


22 ) भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये 'अस्पृश्यता निवारण' चा उल्लेख आहे ?

▪️ कलम 21

▪️ कलम 17

▪️ कलम 19

▪️ कलम 14

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | कलम 17


23 ) लोखंडाला गंज चढणे ही कोणत्या प्रकारची रासायनिक प्रक्रिया आहे ?

▪️ ऑक्सिडीकरण

▪️ क्षपण

▪️ उदासीनीकरण

▪️ अपघटन

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | ऑक्सिडीकरण (Oxidation)


24 ) 'पानीपत' ची पहिली लढाई कोणत्या वर्षी झाली ?

▪️ 1696

▪️ 1761

▪️ 1526

▪️ 1831

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | 1526


25 ) 'गोल्डन ग्लोब' पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत ?

▪️ साहित्य

▪️ क्रीडा

▪️ चित्रपट आणि दूरदर्शन

▪️ संगीत

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | चित्रपट आणि दूरदर्शन


🗃️ Railway Group D Online Test in Marathi सरावासाठी हे पेज सेव्ह करा आणि रोज नवीन प्रश्नसंच सोडवत तयारी सुरू ठेवा

🔂 हि टेस्ट तुमच्या मित्रांना आणि रेल्वे भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या ग्रुप्समध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त उमेदवारांना या मोफत सिरीजचा फायदा घेता येईल

🌐 नियमित सरावासाठी आमच्या MPSC Battle संकेतस्थळाला दररोज भेट द्या . येथे आम्ही तुमच्या तयारीसाठी नियमितपणे सराव प्रश्नसंच अपडेट करत असतो . दररोज नवीन प्रश्नसंच सोडवा, चुका ओळखा आणि तुमची तयारी अधिक मजबूत करा

© MPSC Battle — RRB Group D Mock Test in Marathi | Railway Group D Online Test

4 Comments

Previous Post Next Post