विष्णुबुवा ब्रह्मचारी प्रश्न उत्तर | Vishnubuwa Brahmachari Question Answer | Vishnubuwa Brahmachari in Marathi

Vishnubuwa Brahmachari Question Answer in Marathi, Vishnubuwa Brahmachari MCQ, Vishnubuwa Brahmachari Prashn Uttar, विष्णुबुवा ब्रह्मचारी प्रश्न उत्तर, Vishnubuwa Brahmachari mahiti


Vishnubuwa Brahmachari Question Answer In Marathi


१९व्या शतकातील एक प्रभावी समाजसुधारक, प्रबोधनकार आणि धार्मिक सुधारणांचे अग्रणी म्हणून विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचे नाव घेतले जाते. त्यांनी समाजातील अंधश्रद्धा, जातिभेद आणि अन्यायकारक धार्मिक प्रथांविरुद्ध ठाम भूमिका घेतली.

विष्णुबुवांनी लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन, शिक्षणाचे महत्त्व आणि सामाजिक समतेची जाणीव निर्माण केली. त्यांच्या विचारांनी समाजात नवी जागृती निर्माण झाली आणि सामाजिक सुधारणांच्या चळवळींना गती मिळाली.

Vishnubuwa Brahmachari Question In Marathi : या ब्लॉग पोस्टमध्ये आम्ही विष्णुबुवा ब्रह्मचारी यांच्या जीवनावर आधारित 10+ बहु-निवडक प्रश्नांचा (MCQ) संच तयार केला आहे. हे प्रश्न स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी तसेच सामान्य ज्ञान वृद्धीसाठी उपयुक्त आहेत ......

Vishnubuwa Brahmachari Question Answer in Marathi, Vishnubuwa Brahmachari MCQ, Vishnubuwa Brahmachari Prashn Uttar, विष्णुबुवा ब्रह्मचारी प्रश्न उत्तर

Vishnubuwa Brahmachari Quiz

GK Question : 1
विष्णूबुवा ब्रह्मचारी यांचा जन्म कधी झाला ?
▪️ 20 जुलै 1825
▪️ 26 जुलै 1818
▪️ 15 जुलै 1807
▪️ 2 जुलै 1813
Correct Answer: 20 जुलै 1825
GK Question : 2
विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचे पूर्ण नाव काय ?
▪️ विष्णुबुवा मोरोपंत ब्रह्मचारी
▪️ विष्णू भिकाजी गोखले
▪️ विष्णू भिकाजी ब्रह्मचारी
▪️ विष्णुबुवा मोरोपंत गोखले
Correct Answer: विष्णू भिकाजी गोखले
GK Question : 3
विष्णूबुवा ब्रह्मचारी यांचा जन्म कोठे झाला ?
▪️ पावस ( रत्नागिरी )
▪️ सायखेडा ( नाशिक )
▪️ खारेइ ( सिंधुदुर्ग )
▪️ शिरवली ( रायगड )
Correct Answer: शिरवली ( रायगड )
GK Question : 4
............. यांना आपण विष्णुबुवा म्हणून ओळखतो ?
▪️ विष्णू भिकाजी गोखले
▪️ विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर
▪️ विष्णू परशुरामशास्त्री पंडित
▪️ यापैकी नाही
Correct Answer: विष्णू भिकाजी गोखले
GK Question : 5
ख्रिस्ती धर्मप्रसारकांद्वारे होणाऱ्या वैदिक धर्मावरील टीकेला विष्णुबुवांनी कोणत्या वृत्तपत्रातून प्रत्युत्तर दिले ?
▪️ सुबोध प्रकाश
▪️ जागृती
▪️ वर्तमान दीपिका
▪️ ज्ञानप्रकाश
Correct Answer: वर्तमान दीपिका
GK Question : 6
साम्यवादी विचारांच्या विष्णुबुवा ब्रह्मचारी यांना ' कम्युनिझमचा पहिला प्रतिपादक ' असे कोणी म्हटले ?
▪️ विष्णुशास्त्री चिपळूणकर
▪️ ग.त्र्य.माडखोलकर
▪️ केरुनाना छत्रे
▪️ धनंजय किर
Correct Answer: ग.त्र्य.माडखोलकर
GK Question : 7
खालीलपैकी कोणता ग्रंथ विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी लिहिलेला नाही ?
▪️ बोधसागर रहस्य
▪️ वेदोक्तधर्मप्रकाश
▪️ भावार्थसिंधू
▪️ भावार्थदीपिका
Correct Answer: भावार्थदीपिका
GK Question : 8
ख्रिस्ती मिशनऱ्यांनी सुरू केलेल्या धर्मांतर प्रक्रियेविरुद्ध सर्वप्रथम कोणी आवाज उठविला ?
▪️ विष्णुबुवा ब्रह्मचारी
▪️ महर्षी शिंदे
▪️ महात्मा फुले
▪️ बाळशास्त्री जांभेकर
Correct Answer: विष्णुबुवा ब्रह्मचारी
GK Question : 9
विष्णुबुवा ब्रह्मचारी आणि मिशनरी यांच्यातील वाद कोणत्या पुस्तकात आढळतो ?
▪️ वेदोक्त धर्मप्रकाश
▪️ समुद्रकिनारीचा वाद विवाद
▪️ अरुणोदय
▪️ धर्म विवेचन
Correct Answer: समुद्रकिनारीचा वाद विवाद
GK Question : 10
विष्णूबुवा ब्रह्मचारी यांचा मृत्यू कधी झाला ?
▪️ 18 फेब्रुवारी 1871
▪️ 18 फेब्रुवारी 1873
▪️ 23 फेब्रुवारी 1871
▪️ 23 फेब्रुवारी 1873
Correct Answer: 18 फेब्रुवारी 1871

Your Score

Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /

Post a Comment

Previous Post Next Post