सत्यशोधक समाज प्रश्न उत्तर | Satyashodhak Samaj MCQ Questions Answer in Marathi | Satyashodhak Samaj Quiz

सत्यशोधक समाज


Satyashodhak Samaj Question Answer MCQ Quiz In Marathi



या ब्लॉग पोस्ट मध्ये सत्यशोधक समाजावर आधारित 20+ सर्वात महत्त्वाचे बहुपर्यायी प्रश्न (MCQ) दिलेले आहोत, जे तुमच्या आगामी MPSC तसेच इतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. समाजसुधार आणि समानतेसाठी कार्य करणारा हा ऐतिहासिक आंदोलन MPSC च्या इतिहास आणि समाजसुधारक घटकांतून वारंवार विचारला जातो .
या पोस्टमधील प्रश्न तुमचे ज्ञान तपासण्याबरोबरच परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या पद्धतीशी तुम्हाला परिचित करतील .
या ब्लॉग पोस्टमध्ये दिलेले सर्व प्रश्न काळजीपूर्वक निवडलेले आहेत, जेणेकरून तुम्ही महत्त्वाच्या तथ्यांचा जलद आढावा घेऊ शकता आणि तुमची तयारी अधिक मजबूत करू शकता. दिलेले सर्व प्रश्न काळजीपूर्वक वाचा व प्रश्नसंचामध्ये काही चूक आढळल्यास कॉमेंट्स करा

Satyashodhak Samaj Question Answer,Satyashodhak Samaj MCQ Quiz in Marathi,Satyashodhak Samaj Prashn Uttar, सत्यशोधक समाज प्रश्न उत्तर

Satyashodhak Samaj MCQ

Gk Question : 1
सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा झाली ?
● 27 नोव्हेंबर 1875
● 16 ऑगस्ट 1874
● 24 सप्टेंबर 1873
● 21 जून 1872
योग्य उत्तर : पर्याय क्र. 3
Gk Question : 2
महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोठे केली ?
● मुंबई
● पुणे
● सातारा
● कोल्हापूर
योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
Gk Question : 3
सत्यशोधक चळवळीची वैशिष्ट्ये काय होती ? 1) कृतिशील चळवळ 2) वर्गीय चळवळ 3) क्रांतीवादी चळवळ 4) परिवर्तनवादी चळवळ
● फक्त 4
● 1 , 3 आणि 4
● 3 आणि 4
● 1 , 2 आणि 4
योग्य उत्तर : पर्याय क्र. 4
Gk Question : 4
सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष कोण ?
● भास्करराव जाधव
● कृष्णराव भालेकर
● शाहू महाराज
● महात्मा फुले
योग्य उत्तर : पर्याय क्र. 4
Gk Question : 5
सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते ?
● दीनबंधू
● समता
● देशबंधू
● दिनमित्र
योग्य उत्तर : दीनबंधू
दीनबंधू हे वृत्तपत्र महात्मा फुले यांचे जवळचे सहकारी कृष्णराव भालेकर यांनी 1 जानेवारी 1877 रोजी पुणे येथून सुरू केलेले मराठी भाषेचे साप्ताहिक वृत्तपत्र होते .
📝 हे भारतातील पहिले बहुजन वृत्तपत्र होते आणि त्याचा उद्देश शोषित आणि वंचित वर्गांचा आवाज उठवणे हा होता
Gk Question : 6
सत्यशोधक समाज यातील ' सत्यशोधक ' हा शब्द महात्मा फुले यांनी कोठून घेतला ?
● महर्षी शिंदे
● दादोबा पांडुरंग
● बाबा पद्मनजी
● न्यायमूर्ती रानडे
योग्य उत्तर : बाबा पद्मनजी
' सत्यशोधक ' हा शब्द महात्मा फुले यांनी का वापरला किंवा तो कुठून आला , तर याबाबत महेश जोशी यांनी 'सत्यशोधक समाज' या पुस्तकामध्ये म्हटलंय की ......
👉 महात्मा फुले यांच्या तोंडी 'सत्यशोधक समाज' आणि 'मानवधर्म' असे दोन शब्द वारंवार आढळतात , यापैकी 'सत्यशोधक' हा शब्द बाबा पद्मनजी यांच्याकडून आणि 'मानवधर्म' हा शब्द दादोबा पांडुरंग यांच्याकडून घेतलेला आहे
Gk Question : 7
' सर्वसाक्षी जगत्पती | त्यास नकोच मध्यस्थी ' हे कोणत्या सामाजिक संघटनेचे ब्रीदवाक्य होते ?
● ब्राह्मो समाज
● प्रार्थना समाज
● सत्यशोधक समाज
● आर्य समाज
योग्य उत्तर : पर्याय क्र. 3
Gk Question : 8
सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचा मुख्य उद्देश काय होता ?
● पीडित शोषित समाजाची जागृती करणे
● अस्पृश्यता नष्ट करणे
● महिलांना शिक्षण देणे
● छात्र धर्माचा प्रसार करणे
योग्य उत्तर : पर्याय क्र. 1
Gk Question : 9
कोणत्या व्यक्तीने 1200 रुपये खर्च करून सत्यशोधक समाजाला छापखाना विकत घेऊन दिला ?
● रामशेठ उरवणे
● व्यंकू बाळोजी काळेवार
● माया कराडी लिंगु
● कृष्णराव भालेकर
योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
Gk Question : 10
ब्राह्मणेतर व सत्यशोधक चळवळींतील फरक कोणता
1 ) ब्राह्मणेतर राजकीय तर सत्यशोधक सामाजिक व धार्मिक चळवळ होती
2 ) ब्राह्मणेतरमध्ये मराठा तर सत्यशोधकमध्ये माळी जातीचे वर्चस्व होते
3 ) ब्राह्मणेतर,दिनकर जवळकर व इतरांच्या तर सत्यशोधक,महात्मा फुल्यांच्या विचारावर आधारित होती
● 1 आणि 2
● फक्त 2
● 1 आणि 3
● वरील सर्व
योग्य उत्तर : पर्याय क्र. 4
Gk Question : 11
पुढील विधाने वाचून त्यात कोणत्या संघटनेचे वर्णन केले आहे ते ओळखा
1 ) 1875 पासून दर रविवारी हा समाज प्रार्थना सभा घेत असे
2 ) त्यांनी पुण्यात सुशिक्षणगृह सुरू केले
3 ) विद्यार्थ्यांसाठी निबंध वकृत्व स्पर्धा आयोजित केल्या जात
4 ) 1873 पासून हिच्या कार्याला सुरुवात झाली
● सत्यशोधक समाज
● प्रार्थना समाज
● ब्राह्मो समाज
● आर्य समाज
योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
Gk Question : 12
सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक खालीलपैकी कोण होते ?
● केशवराव बावलकर
● सखाराम परांजपे
● सदाशिव बल्लाळ गोवंडे
● नारायणराव कटगळ
योग्य उत्तर : पर्याय क्र. 4
Gk Question : 13
" आईला भेटण्यास अगर बापाला प्रसन्न करण्यास ज्याप्रमाणे मध्यस्तांची जरुरी नसते त्याप्रमाणे परमेश्वराची प्रार्थना करण्यास पुरोहितांची आवश्यकता नसते " हे तत्व कोणत्या समाजाचे आहे
● प्रार्थना समाज
● सत्यशोधक समाज
● ब्राह्मो समाज
● आर्य समाज
योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
Gk Question : 14
1911 मध्ये कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करून छत्रपती शाहू महाराज यांनी कोणाला अध्यक्ष म्हणून नियुक्त केले ?
● भास्करराव जाधव
● बाबुराव कदम
● अण्णासाहेब लठ्ठे
● हरिभाऊ चव्हाण
योग्य उत्तर : भास्करराव जाधव
शाहू महाराजांनी 11 जानेवारी 1911 रोजी कोल्हापुरात भास्करराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना केली .
उपाध्यक्ष - आण्णासाहेब लठ्ठे , कार्यवाहक - हरिभाऊ चव्हाण
Gk Question : 15
महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या ग्रंथाद्वारे सत्यशोधकी विचार प्रसृत केले ?
● ब्राह्मणांचे कसब
● इशारा
● सार्वजनिक सत्यधर्म
● सत्सार
योग्य उत्तर : पर्याय क्र. 3
Gk Question : 16
सत्यशोधक विचारवंत व दिनबंधू या साप्ताहिकाचे संपादक कृष्णराव भालेकरांनी ग.वा जोशींच्या सार्वजनिक सभेला पर्याय म्हणून कोणती संस्था स्थापन केली ?
● परमहंस सभा
● दीनबंधू सार्वजनिक सभा
● ज्ञान प्रसारक सभा
● बहिष्कृत हितकारणी सभा
योग्य उत्तर : दीनबंधू सार्वजनिक सभा
लक्षात ठेवा 👉 1884 मध्ये कृष्णराव भालेकर यांनी दीनबंधू सार्वजनिक सभेची स्थापना केली . या सार्वजनिक सभेचे मुखपत्र म्हणून दीनमित्र मासिक सुरू करण्यात आले .
📝 या मासिकाचे संपादक म्हणून गणपतराव पाटील व त्यांच्या निधनानंतर मुकुंदराव पाटील यांनी काम पाहिले . हे मासिक तरवडी - जि . अहमदनगर येथून प्रकाशित होत असे
Gk Question : 17
सत्यशोधक समाजाची पुढीलपैकी कोणती उद्दिष्टे होती ?
● बहुजन समाजाला साक्षर करून सामाजिक व धार्मिक गुलामगिरीतून मुक्त करणे
● वर्णवर्चस्ववादी वर्गाविरुद्ध व्यापक संघर्ष उभा करणे
● अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी विचारांना व कृतीला व्यासपीठ मिळवून देणे
● वरील सर्व
योग्य उत्तर : पर्याय क्र. 4
Gk Question : 18
सत्यशोधक समाजाचे नामांतर ' सत्यधर्म समाज ' असे कधी करण्यात आले ?
● 24 मे 1891
● 14 एप्रिल 1991
● 6 जून 1991
● 15 ऑगस्ट 1991
योग्य उत्तर : 24 मे 1891
24 मे 1891 ला सत्यशोधक समाजाचे नाव बदलून सत्यधर्म समाज असे करण्यात आले . हे नामांतर सासवडचे मोतीराम नवले यांच्या पुढाकाराने घडवून आणले होते . सत्यधर्म समाजाचे अध्यक्ष म्हणून डॉ . विश्राम घोले तर चिटणीस म्हणून हरिश्चंद्र नवलकर यांची नेमणूक करण्यात आली .परंतु ;
👉 महात्मा फुले यांचे एकनिष्ठ सहकारी नारायण मेघाजी लोखंडे व कृष्णराव भालेकरांनी सत्यशोधक समाज या नावानेच पुढे चळवळ सुरू ठेवली .
Gk Question : 19
सत्यशोधक समाजाची तत्वे कोणती ? योग्य पर्याय निवडा
1 ) ईश्वर निर्मिक असून तो निर्गुण आणि निराकार आहे
2 ) कोणताही धर्मग्रंथ अपौरुषेय नाही . सर्व धर्मग्रंथ हे मानवनिर्मित आहेत
3 ) परमेश्वराची प्रार्थना केल्याने फलप्राप्ती होत नाही, मात्र अध्यात्मिक उन्नती होते
4 ) सत्य, सदाचार व भक्ती हे परमेश्वराच्या उपासनेचे खरे मार्ग आहेत
● फक्त 1 आणि 3
● फक्त 2 आणि 4
● फक्त 2 , 3 आणि 4
● वरील सर्व
योग्य उत्तर : पर्याय क्र. 4
Gk Question : 20
सत्यशोधक समाजाच्या चळवळीचे आचार व विचार खानदेश व वऱ्हाड - मध्यप्रांतात पोहोचविण्याचे श्रेय कोणास दिले जाते ?
● बाबाजी पानसरे व धर्माजी डुबरे-पाटील
● राघोजी बुवा व महादेव ससाने
● नामदेव शेंडे व धोंडीबा कुंभार
● सखाराम कोळी व केशव बावलेकर
योग्य उत्तर : पर्याय क्र. 1
Gk Question : 21
सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेची स्थापना कोणी केली ?
अ ) रामय्या व्यंकय्या अय्यावारु
ब ) नरसिंगराव सायबू वडनाला
क ) जाया यलप्पा लिंगु
ड ) व्यंकू बाळोजी कालेवार
● फक्त अ
● अ आणि ड
● ब , क आणि ड
● वरील सर्व
योग्य उत्तर : वरील सर्व
सत्यशोधक समाजाची मुंबई शाखा रामय्या व्यंकय्या अय्यावारू, नरसिंगराव सायबू वडताळा, जया यल्लप्पा लिंगू, आणि व्यंकू बालोजी काळेवार यांनी स्थापन केली. त्यांनी या आंदोलनाला आर्थिक पाठबळ देखील दिले.
🏷️ महात्मा जोतिराव फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केली. यानंतर लगेचच मुंबई, भिल्लार, भांबुर्डे (शिवाजीनगर), हडपसर, पर्वती (पुणे), ठाणे आदी ठिकाणी त्याच्या शाखा स्थापन झाल्या .
👉 नारायण मेघाजी लोखंडे सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेचे काही दिवस अध्यक्ष होते

Your Score

Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /

Post a Comment

Previous Post Next Post