प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली | Prarthana Samaj MCQ Questions Answer | Prarthana Samaj in Marathi

समाज सुधारणा चळवळ
प्रार्थना समाज


Prarthana Samaj Question Answer MCQ Quiz In Marathi



भारतीय समाजसुधार चळवळींच्या इतिहासात प्रार्थना समाज ही एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सामाजिक सुधारणा चळवळ मानली जाते. डॉ. आत्माराम पांडुरंग यांनी 1867 मध्ये मुंबई येथे स्थापन केलेल्या या संस्थेचे उद्दिष्ट – एकेश्वरवादाचा प्रसार, जातिभेद निर्मूलन, स्त्रीशिक्षणाचा प्रसार आणि समाजातील अंधश्रद्धा दूर करणे .
प्रार्थना समाजाने धार्मिक सहिष्णुता, साधेपणा आणि नैतिकतेवर आधारित जीवनशैलीचा प्रचार केला. इतिहास आणि समाजसुधार या विषयांतून यासंबंधी वारंवार प्रश्न विचारले जातात.
या ब्लॉग पोस्ट मध्ये दिलेले 10+ प्रार्थना समाजावर आधारित बहुपर्यायी प्रश्न (MCQ) सोडवा व प्रश्नसंचामध्ये काही चुका आढळल्यास कॉमेंट्स जरूर करा.

prarthana samaj in marathi,prarthana samaj Question Answer,prarthana samaj MCQ, प्रार्थना समाजाची स्थापना,prarthana samaj Prashn Uttar

Prarthana Samaj MCQ

Gk Question : 1
1867 मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली ?
● महर्षी शिंदे
● आत्माराम पांडुरंग तर्खडकर
● महात्मा फुले
● राजा राममोहन रॉय
योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
Gk Question : 2
प्रार्थना समाजाची स्थापना कधी व कोठे झाली ?
● 31 मार्च 1867 मुंबई
● 24 सप्टेंबर 1873 पुणे
● 22 जून 1844 सुरत
● 31 जुलै 1849 बंगाल
योग्य उत्तर : पर्याय क्र. 1
Gk Question : 3
प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?
● न्या . रानडे
● महात्मा फुले
● दादोबा पांडुरंग
● आत्माराम पांडुरंग
योग्य उत्तर : पर्याय क्र. 4
Gk Question : 4
प्रार्थना समाजाचे वैचारिक संस्थापक कोणास म्हटले जाते ?
● भास्कर तर्खडकर
● रा . गो भंडारकर
● न्या . चंदावरकर
● वामन आबाजी मोडक
योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
Gk Question : 5
प्रार्थना समाजाचे मुखपत्र कोणते ?
● प्रार्थना समाचार
● दिग्दर्शन
● सुबोध पत्रिका
● संवादकौमुदी
योग्य उत्तर : पर्याय क्र. 3
Gk Question : 6
खालीलपैकी कोणाच्या प्रेरणेने 31 मार्च 1867 रोजी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना झाली ?
● केशवचंद्र सेन
● राधाकांत देव
● रामचंद्र विद्याबागीश
● देवेंद्रनाथ टागोर
योग्य उत्तर : पर्याय क्र. 1 ( सन 1864 , ब्राह्मो समाजाचे नेते केशवचंद्र सेन यांच्या मुंबईतील व्याख्यानावरून प्रेरणा घेऊन आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांनी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली )
Gk Question : 7
प्रार्थना समाजाची शिकवणूक लोकांना कळावी व त्यावरील आक्षेप दूर व्हावेत यासाठी ' एकेश्वर निष्ठेची कैफियत ' हा निबंध कोणी लिहिला ?
● दादोबा पांडुरंग
● न्यायमूर्ती रानडे
● महर्षी शिंदे
● डॉ रा.गो भंडारकर
योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
Gk Question : 8
प्रार्थना समाजाबाबत कोणत्या बाबी बरोबर आहेत
1 ) प्रार्थना समाजाची स्थापना तर्खडकर बंधूंनी केली
2 ) समाजाने सुबोध पत्रिका मुखपत्र चालवले
3 ) वारसा भागवत धर्मातून घेतल्याचे मानतो
4 ) हिंदुत्वाचा प्रगतीच्या प्रवृत्तीची वेळ घातला
● 1 आणि 3
● 1 , 2 आणि 4
● 3 आणि 4
● वरील सर्व
योग्य उत्तर : पर्याय क्र. 4
Gk Question : 9
प्रार्थना समाजाची पुढीलपैकी कोणती उद्दिष्टे होती
1 ) मूर्तिपूजेला विरोध करणे
2 ) विधवा विवाहास प्रोत्साहन देणे
3 ) स्त्री शिक्षणाचा पुरस्कार व त्यासाठी प्रबोधन करणे
4 ) अस्पृश्यता निवारण व अस्पृश्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे
● 1 , 2 आणि 3
● 1 , 2 आणि 4
● 1 , 3 आणि 4
● वरील सर्व
योग्य उत्तर : पर्याय क्र. 3
Gk Question : 10
प्रार्थना समाजाची तत्वे कोणती ? योग्य पर्याय निवडा
1 ) ईश्वर निर्मिक ( एकच ) असून तो निर्गुण आणि निराकार आहे
2 ) कोणताही धर्मग्रंथ अपौरुषेय नाही . सर्व धर्मग्रंथ हे मानवनिर्मित आहेत
3 ) परमेश्वराची प्रार्थना केल्याने फलप्राप्ती होत नाही, मात्र अध्यात्मिक उन्नती होते
4 ) सत्य, सदाचार व भक्ती हे परमेश्वराच्या उपासनेचे खरे मार्ग आहेत
◉ 1 आणि 3
◉ 2 आणि 4
◉ 2 , 3 आणि 4
◉ वरील सर्व
योग्य उत्तर : पर्याय क्र. 3
Explanation - प्रार्थना समाजाचे तत्त्वज्ञान 👉 1 ) प्रार्थना समाजवाद्यांना मूर्तीपूजा व अवतार कल्पना मान्य नसली तरी ते ईश्वराला सगुण मानतात 2) ईश्वर भक्तीने प्रसन्न होतो . ईश्वराची प्रार्थना केल्याने फलप्राप्ती होत नाही मात्र , अध्यात्मिक उन्नती होते 3) कोणताही धर्मग्रंथ अपौरुषेय नाही . सर्व धर्मग्रंथ हे मानवनिर्मित आहेत 4) सत्य, सदाचार व भक्ती हे परमेश्वराच्या उपासनेचे खरे मार्ग आहेत

Your Score

Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /

Post a Comment

Previous Post Next Post