महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली | Mahrshi Vitthal Ramji Shinde MCQ Question Answer
महर्षी शिंदे यांच्या जीवनावर आधारित सराव प्रश्नसंच
Maharshi Vitthal Ramji Shinde Question Answer MCQ Quiz In Marathi
भारतीय समाजसुधार चळवळींच्या इतिहासात महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे अस्पृश्यता निर्मूलन आणि सामाजिक समानतेचे अग्रणी नेते म्हणून ओळखले जातात. 23 एप्रिल 1873 रोजी जन्मलेल्या शिंदे यांनी आयुष्यभर समाजातील अन्यायकारक प्रथा आणि जातिभेद दूर करण्यासाठी कार्य केले
त्यांनी अस्पृश्यता निवृत्ती मंडळ स्थापन करून अस्पृश्यांना शिक्षण, रोजगार आणि सामाजिक सन्मान मिळवून देण्यासाठी मोठे योगदान दिले. त्यांच्या कार्यामुळे समाजात बंधुभाव, समानता आणि मानवतावादी विचारांचा प्रसार झाला
Maharshi Vitthal Ramji Shinde Question In Marathi : या ब्लॉग पोस्टमध्ये, आम्ही महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जीवनावर आधारित 20+ बहु-निवडक प्रश्नांचा (MCQ) संच तयार केला आहे. हे प्रश्न विशेषत: तुम्हाला विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मदत करण्यासाठी तयार केले गेले आहेत, जिथे महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण समाजसुधारकांबद्दल माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे
Mahrshi Vitthal Ramji Shinde Question Answer,Vitthal Ramji Shinde Prashn Uttar,महर्षी विठ्ठल रामजी शिंदे प्रश उत्तर, Maharshi Shinde MCQ quiz question
Mahrshi Vitthal Ramji Shinde MCQ
Gk Question : 1
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म कधी झाला ?
▪️ 23 एप्रिल 1873
▪️ 23 एप्रिल 1874
▪️ 23 एप्रिल 1875
▪️ 23 एप्रिल 1876
Correct Answer: 23 एप्रिल 1873
महर्षी वि.रा शिंदे यांचा जन्म 23 एप्रिल 1873 रोजी कर्नाटक राज्यातील जमखिंडी येथे झाला.
Gk Question : 2
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे बालपणीचे नाव काय होते ?
▪️ यशवंत
▪️ तुकाराम
▪️ मोहनदास
▪️ भालचंद्र
Correct Answer: तुकाराम
विठ्ठल रामजी शिंदे यांच्या वडिलांचे नाव - रामजी, आईचे नाव - यमुनाबाई व पत्नीचे नाव - रुक्मिणी.
Gk Question : 3
इ.स 1934 मध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांना कोणती पदवी महात्मा गांधी यांच्या अनुमोदाने जनतेद्वारे प्रदान करण्यात आली ?
▪️ महात्मा
▪️ लोकमान्य
▪️ आचार्य
▪️ महर्षी
Correct Answer: महर्षी
Gk Question : 4
वि.रा.शिंदे यांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी कार्य करण्याचा निर्णय कोणत्या सभेला हजर राहिल्यानंतर घेतला ?
▪️ भिंगार - अहमदनगर
▪️ वडाळा - मुंबई
▪️ पन्हाळा - कोल्हापूर
▪️ माणगाव - रायगड
Correct Answer: भिंगार - अहमदनगर
Gk Question : 5
भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिला ?
▪️ डॉ बाबासाहेब आंबेडकर
▪️ महात्मा फुले
▪️ महर्षी वि.रा शिंदे
▪️ शाहू महाराज
Correct Answer: महर्षी वि.रा शिंदे
Gk Question : 6
महर्षी शिंदे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय ?
▪️ फुटके नशीब
▪️ माझ्या आठवणी व अनुभव
▪️ गोड शेवट
▪️ आमच्या देशाची स्थिती
Correct Answer: माझ्या आठवणी व अनुभव
Gk Question : 7
पुणे येथे अहिल्या आश्रमाची स्थापना कोणी केली ?
▪️ महात्मा फुले
▪️ पंडिता रमाबाई
▪️ न्यायमूर्ती रानडे
▪️ महर्षी शिंदे
Correct Answer: महर्षी शिंदे
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी 5 सप्टेंबर 1921 रोजी पुणे येथे अहिल्या आश्रमाची स्थापना केली.
Gk Question : 8
मुरळी प्रतिबंधक चळवळ कोणी सुरू केली ?
▪️ महर्षी शिंदे
▪️ बाबा पद्मनजी
▪️ विष्णूबुवा ब्रह्मचारी
▪️ स्वामी दयानंद सरस्वती
Correct Answer: महर्षी शिंदे
विठ्ठल रामजी शिंदे यांनी जेजुरी येथे ' मुरळी प्रतिबंधक सभा ' भरवून मुरळ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य केले.
Gk Question : 9
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा कोणत्या सत्याग्रहात सहभाग होता ? अ ) पर्वती मंदिर सत्याग्रह ब ) वाई गणपती मंदिर सत्याग्रह क ) वायकोम मंदिर सत्याग्रह ड ) लक्ष्मीनारायण मंदिर सत्याग्रह
▪️ ब आणि क
▪️ अ आणि क
▪️ अ , ब आणि क
▪️ अ , ब , क आणि ड
Correct Answer: अ आणि क
Gk Question : 10
दलितांच्या उद्धारासाठी 1906 मध्ये डिप्रेस्ड क्लास मिशन ( दलित संघ ) या संस्थेची स्थापना कोणी केली ?
▪️ महर्षी वि . रा शिंदे
▪️ बाबासाहेब आंबेडकर
▪️ महात्मा फुले
▪️ गोपाळ गणेश आगरकर
Correct Answer: महर्षी वि . रा शिंदे
अस्पृश्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करून त्यांचा उद्धार करण्याच्या उद्देशाने 18 ऑक्टोबर 1906 रोजी महर्षी वि.रा शिंदे यांनी मुंबई येथे डिप्रेस्ड क्लास मिशनची ( निराश्रित सहाय्यकारी मंडळ ) स्थापना केली.
Gk Question : 11
भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिला ?
▪️ वि.रा शिंदे
▪️ डॉ बाबासाहेब आंबेडकर
▪️ महात्मा फुले
▪️ गोपाळ बाबा बलंगकर
Correct Answer: वि.रा शिंदे
Gk Question : 12
खालीलपैकी कोणाला अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळाली होती ?
▪️ कर्मवीर भाऊराव पाटील
▪️ सेनापती बापट
▪️ स्वातंत्र्यवीर सावरकर
▪️ महर्षी वि.रा शिंदे
Correct Answer: महर्षी वि.रा शिंदे
Gk Question : 13
................ यांनी सर्वप्रथम जातीनिहाय जनगणनेचा अभ्यास करून 1/6 भारत अस्पृश्य असल्याचा सिद्धांत मांडला होता ?
▪️ महात्मा फुले
▪️ महर्षी वि.रा.शिंदे
▪️ बाबा बाबासाहेब आंबेडकर
▪️ दादाभाई नौरोजी
Correct Answer: महर्षी वि.रा.शिंदे
Gk Question : 14
मुरळी , विधवा व हरिजन स्त्रियांना आधार देण्याच्या उद्देशाने 21 मे 1907 रोजी निराश्रित सेवा सदनची स्थापना कोणी केली ?
▪️ महर्षी वि.रा शिंदे
▪️ पंडिता रमाबाई
▪️ न्यायमूर्ती रानडे
▪️ दादासाहेब गायकवाड
Correct Answer: महर्षी वि.रा शिंदे
Gk Question : 15
निष्काम कर्मयोगी म्हणून गौरविले गेलेल्या पुढीलपैकी कोणत्या महान समाजसुधारकाचा उल्लेख द्वारकापिठाच्या शंकराचार्यांनी ' आधुनिक काळातील महान कलिपुरुष ' अशा शब्दात केला ?
▪️ लोकमान्य टिळक
▪️ विष्णुशास्त्री चिपळूणकर
▪️ महर्षी वि.रा शिंदे
▪️ महात्मा फुले
Correct Answer: महर्षी वि.रा शिंदे
Gk Question : 16
इ.स 1928 मध्ये पुणे येथे शेतकरी परिषदेचे आयोजन करून सरकारपुढे शेतकऱ्यांच्या समस्यांना कोणी वाचा फोडली ?
▪️ सेनापती बापट
▪️ महर्षी शिंदे
▪️ दादासाहेब खापर्डे
▪️ साने गुरुजी
Correct Answer: महर्षी शिंदे
Gk Question : 17
1919 च्या माॅटेग्यू-चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यांतर्गत निवडणुकीत सहभागी होण्यासाठी कोणी ' बहुजन पक्षाची स्थापना ' केली ?
▪️ डॉ बाबासाहेब आंबेडकर
▪️ महर्षी शिंदे
▪️ महात्मा गांधी
▪️ यापैकी नाही
Correct Answer: महर्षी शिंदे
बहुजन पक्ष : स्थापना - 1 सप्टेंबर 1920
Gk Question : 18
कोलकत्ता येथे 1917 साली डॉक्टर ॲनी बेझंट यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात ' अस्पृश्यता निवारणाचा ठराव ' संमत व्हावा म्हणून कोणी पुढाकार घेतला ?
▪️ महर्षी शिंदे
▪️ फिरोज शहा मेहता
▪️ केशवचंद्र सेन
▪️ महात्मा गांधी
Correct Answer: महर्षी शिंदे
Gk Question : 19
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण संघाची स्थापना कधी केली ?
▪️ 23 मार्च 1916
▪️ 23 मार्च 1917
▪️ 23 मार्च 1918
▪️ 23 मार्च 1919
Correct Answer: 23 मार्च 1918
महर्षी शिंदे यांनी 23 मार्च 1918 रोजी पुणे येथे अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण संघाची स्थापना केली.
Gk Question : 20
महर्षी शिंदें यांनी 18 ऑक्टोबर 1906 रोजी स्थापन केलेल्या डिप्रेस्ड क्लास मिशन ( निराश्रित सहाय्यकारी मंडळ ) या संस्थेचा उद्देश काय होता 1 ) अस्पृश्य समाजात शिक्षणाचा प्रसार घडवून आणणे 2 ) अस्पृश्य बांधवांच्या अडीअडचणींचे निवारण करणे 3 ) अस्पृश्य बांधवांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे 4 ) अस्पृश्य बांधवांना खऱ्या धर्माची शिकवण देणे