Input–Output (आदान-प्रदान) | Reasoning बुद्धीमत्ता प्रश्न – उदाहरणांसह
स्पर्धा परीक्षांमधील बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील Input–Output (आदान-प्रदान) हा घटक उमेदवाराची प्रक्रिया समजून घेण्याची क्षमता आणि क्रमवार विचारशक्ती तपासतो. एखाद्या प्रश्नात काही शब्द, अक्षरे, संख्या किंवा मिश्र घटकांचा एक क्रम दिला जातो आणि त्यावर ठराविक नियमांनुसार टप्प्याटप्प्याने प्रक्रिया करून अंतिम परिणाम तयार केला जातो. या प्रक्रियेतील नियम ओळखून पुढील टप्पा किंवा अंतिम परिणाम शोधणे हेच या प्रश्नांचे उद्दिष्ट असते
हा घटक MPSC, Combine Group B&C , Talathi Bharti, Police Bharti, SSC, Bank (IBPS, SBI) , Railway Bharti अशा अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये नियमितपणे विचारला जातो. योग्य पद्धतीने सराव केल्यास हा टॉपिक कमी वेळेत गुण मिळवून देणारा ठरतो
विविध स्पर्धा परीक्षांमध्ये या घटकावर प्रामुख्याने खालील प्रकारचे प्रश्न विचारले जातात ;- शब्दांची आदान-प्रदान प्रक्रिया
- संख्यांची क्रमवार मांडणी
- अक्षर-संख्या मिश्र Input–Output
- स्टेप शोधा / पुढील स्टेप ओळखा
- अंतिम Output ओळखा
या घटकावर खाली दिलेले सर्व प्रश्न सोडवा आणि तुमची बुद्धिमत्ता चाचणी तयारी अधिक भक्कम करा
1 ) एक शब्द संयोजन यंत्रास जेव्हा शब्दांची एक ओळ इनपुट म्हणून दिली जाते , त्यावेळी ते यंत्र त्या ओळीला एका पायरीत एका विशिष्ट नियमानुसार व्यवस्थित संयोजित करते . खाली इनपुट म्हणून दिलेली माहिती व संयोजनाच्या पायऱ्या दिलेल्या आहेत
इनपुट : Apple, Is, Sweet, Red
पायरी I : Is, Apple, Sweet, Red
पायरी II : Is, Red, Apple, Sweet
पायरी II ही अंतिम पायरी आहे. जर इनपुट "Mountain, Sky, Is, Blue" असेल, तर अंतिम पायरी कोणती ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | Is, Sky, Blue, Mountain
2 ) एका शब्द संयोजन यंत्राला विशिष्ट सामग्री दिल्यानंतर ते यंत्र ती सामग्री विशिष्ट नियमानुसार पुन: संयोजित करते . खाली दिलेली सामग्री आणि पुन: संयोजनाच्या पायऱ्या यांचा नमुना दिलेला आहे
इनपुट : Pen, Paper, Ink, Book
पायरी I : Ink, Pen, Paper, Book
पायरी II : Ink, Pen, Book, Paper
जर इनपुट "Mobile, Sim, Network, Call" असेल, तर अंतिम पायरी कोणती असेल ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | Sim, Call, Mobile, Network
3 ) एक अंक व्यवस्थापन यंत्र , संख्यांच्या इनपुट ला प्रत्येक चरणात विशिष्ट नियमानुसार पुनर्व्यवस्थापित करते , खाली इनपुट आणि पुनर्व्यवस्थापनाचे चरण यांचे एक उदाहरण दिलेले आहे
इनपुट : A, To, The, From
पायरी I : From, The, To, A
हा नियम 'शब्दांच्या लांबीचा उतरता क्रम' असल्यास, "Education, Is, Power" ची पहिली पायरी काय होईल ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | Education, Power, Is
4 ) जर एका इनपुटची पायरी III "Go, Cat, Home, School" असेल, तर त्याचे इनपुट खालीलपैकी कोणते असू शकते ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 4 | निश्चित सांगता येत नाही
5 ) एक चिन्ह व्यवस्थापन यंत्रणा दिलेल्या चिन्हांच्या आदानाचे प्रत्येक टप्प्याला विशिष्ट नियमानुसार पुनर्व्यवस्थापन करते . पुढे आदान व त्याचे प्रत्येक टप्प्याला - होणारे व्यवस्थापन यांचा नमुना दिला आहे :
इनपुट : 45, 12, 89, 23
पायरी I : 89, 45, 12, 23
पायरी II : 89, 45, 23, 12
जर इनपुट "10, 50, 20, 40" असेल, तर पायरी IlI काय असेल ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | 50, 40, 20, 10
6 ) एक अंक व्यवस्थापन यंत्र , संख्यांच्या इनपुट ला प्रत्येक चरणात विशिष्ट नियमानुसार पुनर्व्यवस्थापित करते , खाली इनपुट आणि पुनर्व्यवस्थापनाचे चरण यांचे एक उदाहरण दिलेले आहे
इनपुट : 7, 24, 15, 32
पायरी I : 32, 7, 24, 15
पायरी II : 32, 24, 7, 15
पायरी III : 32, 24, 15, 7
दिलेल्या नियमानुसार "11, 5, 19, 13" या इनपुटसाठी दुसरी पायरी कोणती ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | 19, 13, 11, 5
7 ) एक शब्द संयोजन यंत्रास जेव्हा शब्दांची एक ओळ इनपुट म्हणून दिली जाते , त्यावेळी ते यंत्र त्या ओळीला एका पायरीत एका विशिष्ट नियमानुसार व्यवस्थित संयोजित करते . खाली इनपुट म्हणून दिलेली माहिती व संयोजनाच्या पायऱ्या दिलेल्या आहेत
इनपुट : Box 20, Pen 10, Cup 30
पायरी I : Pen 10, Box 20, Cup 30
पायरी II : Pen 10, Cup 30, Box 20 (अंतिम पायरी)
इनपुट "Day 50, Night 20, Soon 40" साठी पायरी I कोणती ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | Soon 40, Day 40, Night 20
8 ) एका शब्द संयोजन यंत्राला विशिष्ट सामग्री दिल्यानंतर ते यंत्र ती सामग्री विशिष्ट नियमानुसार पुन: संयोजित करते . खाली दिलेली सामग्री आणि पुन: संयोजनाच्या पायऱ्या यांचा नमुना दिलेला आहे
इनपुट : 40, Win, 10, Loss
पायरी I : 10, 40, Win, Loss
पायरी II : 10, 40, Loss, Win
जर इनपुट "50, High, 30, Low" असेल, तर पायरी II काय येईल ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | 30, 50, Low, High
9 ) जर पायरी I "An, 15, Book, 20" असेल आणि पायरी II "An, 20, 15, Book" असेल, तर हा कोणता बदल दर्शवतो ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | मोठ्या संख्येला दुसऱ्या स्थानी आणले
10 ) एक 'शब्द आणि संख्या' मांडणी करणारे यंत्र जेव्हा त्याला शब्द आणि संख्यांची इनपुट ओळ दिली जाते, तेव्हा ते प्रत्येक टप्प्यात एका विशिष्ट पद्धतीचा वापर करून त्यांची पुनर्रचना करते. खाली इनपुट म्हणून दिलेली माहिती व संयोजनाच्या पायऱ्या दिलेल्या आहेत
इनपुट : Cat, 5, Rat, 2, Mat, 8
पायरी I : 2, Cat, 5, Rat, Mat, 8
पायरी II : 2, 5, Cat, Rat, Mat, 8
अंतिम पायरी (Step III) काय असेल ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | 2, 5, 8, Cat, Mat, Rat
11 ) एक चिन्ह व्यवस्थापन यंत्रणा दिलेल्या चिन्हांच्या आदानाचे प्रत्येक टप्प्याला विशिष्ट नियमानुसार पुनर्व्यवस्थापन करते . पुढे आदान व त्याचे प्रत्येक टप्प्याला - होणारे व्यवस्थापन यांचा नमुना दिला आहे
इनपुट : Z, 1, Y, 2, X, 3
अंतिम पायरी : 1, 2, 3, X, Y, Z
जर पायरी I "1, Z, Y, 2, X, 3" असेल, तर "3, 2, 1, A, B, C" या इनपुटसाठी पहिली पायरी काय असेल ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | 1, 3, 2, A, B, C
12 ) एक 'शब्द आणि संख्या' मांडणी करणारे यंत्र जेव्हा त्याला शब्द आणि संख्यांची इनपुट ओळ दिली जाते, तेव्हा ते प्रत्येक टप्प्यात एका विशिष्ट पद्धतीचा वापर करून त्यांची पुनर्रचना करते. खाली इनपुट म्हणून दिलेली माहिती व संयोजनाच्या पायऱ्या दिलेल्या आहेत
Input : Windows , Open , Cat , Day , Horizontal , Mobile
पायरी 1 : Cat , Windows , Open , Day , Horizontal , Mobile
पायरी 2 : Cat , Day , Windows , Open , Horizontal , Mobile
पायरी 3 : Cat , Day , Open , Windows , Horizontal , Mobile
पायरी 4 : Cat , Day , Open , Mobile , Windows , Horizontal
पायरी 4 ही वरील इनपुटची अंतिम पायरी आहे
वरील स्टेप्समध्ये अवलंबलेल्या पॅटर्ननुसार, खालील इनपुटसाठी 2 री पायरी योग्य असलेला पर्याय शोधा
Input : Teacher , Door , Electricity , Swimming , Horse , Rain
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | Door, Rain, Teacher, Electricity, Swimming, Horse
13 ) एक चिन्ह व्यवस्थापन यंत्रणा दिलेल्या चिन्हांच्या आदानाचे प्रत्येक टप्प्याला विशिष्ट नियमानुसार पुनर्व्यवस्थापन करते . पुढे आदान व त्याचे प्रत्येक टप्प्याला - होणारे व्यवस्थापन यांचा नमुना दिला आहे
आदान : N , T , Y , A , P , F
टप्पा 1 : Y , T , F , A , P , N
टप्पा 2 : Y , P , F , T , A , N
टप्पा 3 : P , F , A , T , Y , N
टप्पा 4 : P , T , N , F , Y , A
टप्पा 5 : P , N , T , A , Y , F अंतिम व्यवस्थापन
जर एका आदानाचे पहिल्या टप्प्याचे व्यवस्थापन O , D , K , W , G , X असेल , तर दिलेल्या पर्यायातून ज्या टप्प्याला G , X , D , W , O , K अशी व्यवस्था प्रदर्शित करणारा टप्पा निवडा ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 4 | 5 वा
14 ) एक अंक व्यवस्थापन यंत्र , संख्यांच्या इनपुट ला प्रत्येक चरणात विशिष्ट नियमानुसार पुनर्व्यवस्थापित करते , खाली इनपुट आणि पुनर्व्यवस्थापनाचे चरण यांचे एक उदाहरण दिलेले आहे
इनपुट : 38 , 28 , 3 , 7 , 30 , 5
चरण l : 3 , 38 , 28 , 7 , 30 , 5
चरण ll : 3 , 28 , 38 , 7 , 30 , 5
चरण lll : 3 , 28 , 5 , 38 , 7 , 30
चरण lV : 3 , 28 , 5 , 30 , 38 , 7
चरण V : 3 , 28 , 5 , 30 , 7 , 38
चरण V या इनपुटचा अंतिम चरण आहे . जर 11 , 58 , 45 , 17 , 20 , 38 , हा एखाद्या इनपुटचा प्रथम चरण असेल तर , 11 , 45 , 38 , 20 , 58 , 17 हा त्या इनपुटचा कोणता चरण असेल ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 4 | IV
15 ) एका शब्द संयोजन यंत्राला विशिष्ट सामग्री दिल्यानंतर ते यंत्र ती सामग्री विशिष्ट नियमानुसार पुन: संयोजित करते . खाली दिलेली सामग्री आणि पुन: संयोजनाच्या पायऱ्या यांचा नमुना दिलेला आहे
इनपुट : Ja Ma Da Ch Ha Bo Ka
पायरी 1 : Da Ja Ma Ha Bo Ka Ch
पायरी 2 : Ha Da Ja Ma Ka Ch Bo
पायरी 3 : Ja Ha Da Ka Ch Bo Ma आणि या प्रमाणे जर दिलेल्या सामग्रीची पायरी 2 ' ga re bu la ra hi hai ' असेल तर वरील पायऱ्या मधील नियमानुसार पायरी 7 काय असेल ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | ra re la bu hai ga hi
16 ) एक शब्द संयोजन यंत्रास जेव्हा शब्दांची एक ओळ इनपुट म्हणून दिली जाते , त्यावेळी ते यंत्र त्या ओळीला एका पायरीत एका विशिष्ट नियमानुसार व्यवस्थित संयोजित करते . खाली इनपुट म्हणून दिलेली माहिती व संयोजनाच्या पायऱ्या दिलेल्या आहेत
इनपुट : NO , GO , Fit , COUNTER , FORCE , I , TURN , NET
पायरी l : I , NO , GO , Fit , COUNTER , FORCE , TURN , NET
पायरी ll : I , GO , NO , Fit , COUNTER , FORCE , TURN , NET
पायरी lll : I , GO , NO , Fit , NET , COUNTER , FORCE , TURN
पायरी lV : I , GO , NO , Fit , NET , TURN COUNTER , FORCE
पायरी V : I , GO , NO , Fit , NET , TURN , FORCE , COUNTER
जर इनपुट "Class , Rat , An , UP , PEN , TRUE" असेल तर "An , UP , Class , Rat , PEN , TRUE " हे कोणत्या पायरीत येईल ?
📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | An, UP, Class, Rat, PEN, TRUE
