डॉ.भाऊ दाजी लाड प्रश्न उत्तर | Dr Bhau Daji Lad Question Answer in Marathi

डॉ. भाऊ दाजी लाड Question Answer in Marathi, Dr. Bhau Daji Lad MCQ, Dr. Bhau Daji Lad Prashn Uttar, डॉ. भाऊ दाजी लाड प्रश्न उत्तर, Dr. Bhau Daji Lad mahiti


Dr Bhau Daji Lad Question Answer In Marathi


Bhau Dahi Lad Question Answer In Marathi : या ब्लॉग पोस्टमध्ये डॉ. भाऊ दाजी लाड यांच्या जीवनावर आधारित महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे सामाविष्ट केली आहेत . स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार विचारले जाणारे सोपे, मध्यम व कठीण स्वरूपाचे 15+ प्रश्न येथे दिलेले आहेत . इतिहास, सामाजिक कार्य आणि वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल संपूर्ण माहिती या प्रश्नसंचातून मिळेल

TCS व IBPS, MPSC राज्यसेवा, PSI-STI-ASO, Tax Assistant, Clerk, वनरक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरती, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती, आरोग्य भरती आणि इतर सर्व सरळसेवा स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ................

डॉ. भाऊ दाजी लाड Question Answer in Marathi, Dr. Bhau Daji Lad MCQ, Dr. Bhau Daji Lad Prashn Uttar, डॉ. भाऊ दाजी लाड प्रश्न उत्तर, Dr. Bhau Daji Lad mahiti

Bhau Daji Lad Question Answer in Marathi

GK Question : 1
डॉ भाऊ दाजी लाड यांचा जन्म कधी झाला ?
▪️ 6 सप्टेंबर 1823
▪️ 5 सप्टेंबर 1822
▪️ 7 सप्टेंबर 1824
▪️ 4 सप्टेंबर 1821
Correct Answer: 7 सप्टेंबर 1824
डॉ भाऊ दाजी लाड यांचा जन्म 7 सप्टेंबर 1824 , गोवा राज्यातील मांजरे , ता. पेडणे येथे झाला
GK Question : 2
डॉ भाऊ दाजी लाड यांचे मूळ नाव काय ?
▪️ हरिपंत
▪️ भाऊसाहेब
▪️ रामकृष्ण
▪️ रामचंद्र
Correct Answer: रामचंद्र
डॉ. भाऊ दाजी लाड यांचे मूळ नाव रामचंद्र विठ्ठल लाड होते . त्यांचा जन्म 7 सप्टेंबर 1824 रोजी गोव्यातील मांजरे येथे झाला . त्यांना त्यांचे मित्र आणि कुटुंबीय प्रेमाने ' भाऊ ' म्हणत असत , व वडिलांना ' दाजी ' म्हणून , रामचंद्र विठ्ठल लाड यांना भाऊ दाजी हे नाव पडले
GK Question : 3
............... यांनी कुष्ठरोगावर औषध शोधून काढले , त्यामुळे ते धन्वंतरी म्हणून ओळखले जाऊ लागले ?
▪️ डॉ भाऊ दाजी लाड
▪️ डॉ प्रकाश आमटे
▪️ डॉ अभय बंग
▪️ रघुनाथ धोंडो कर्वे
Correct Answer: डॉ भाऊ दाजी लाड
GK Question : 4
डॉ भाऊ दाजी लाड यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर सांगता येईल ?
1 ) ते मुंबईतील रॉयल एशियाटिक सोसायटीचे सभासद होते
2 ) त्यांची एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटचे शिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली
3 ) त्यांनी एलफिस्टन कालिदास सोसायटी ही नाटक मंडळी स्थापन केली
4 ) ते मुंबईत स्थापन झालेल्या ' नेटिव्ह जनरल लायब्ररी ' चे अध्यक्ष होते
▪️ 1 , 3 आणि 4
▪️ 3 आणि 4
▪️ 1 आणि 2
▪️ वरील सर्व
Correct Answer: वरील सर्व
GK Question : 5
मुंबईतील पहिली राजकीय संस्था म्हणून मानली जाणारी ' बॉम्बे असोसिएशन ' ही संस्था स्थापन करण्यात डॉ भाऊ दाजी लाड यांच्या समवेत खालीलपैकी कोणी पुढाकार घेतला होता ?
▪️ दादाभाई नौरोजी
▪️ विष्णुशास्त्री चिपळूणकर
▪️ जगन्नाथ शंकर शेठ
▪️ दादोबा पांडुरंग तर्खडकर
Correct Answer: जगन्नाथ शंकर शेठ
बॉम्बे असोसिएशन ही भारतातील पहिली राजकीय संस्था मानली जाते. या संस्थेची स्थापना इ.स. 1852 मध्ये मुंबई येथे झाली . या संस्थेची स्थापना डॉ. भाऊ दाजी, जगन्नाथ शंकरशेठ, करीमजी कामा आणि नौरोजी फुर्डोनजी यांसारख्या शिक्षित, मध्यमवर्गीय आणि समाजहितासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींनी केली
GK Question : 6
परवाना अधिनियमाला तो व्यापार- धंध्याकरिता विपरीत ठरेल म्हणून कोणी विरोध केला ?
▪️ गोपाळ कृष्ण गोखले
▪️ न्यायमूर्ती रानडे
▪️ डॉ बाबासाहेब आंबेडकर
▪️ डॉ भाऊ दाजी लाड
Correct Answer: डॉ भाऊ दाजी लाड
GK Question : 7
बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली ?
▪️ सुरेंद्रनाथ बॅनर्जी
▪️ दादाभाई नौरोजी
▪️ दादोबा पांडुरंग
▪️ डॉ भाऊ दाजी लाड
Correct Answer: भाऊ दाजी लाड
26 ऑगस्ट 1852 मुंबईतील पहिली राजकीय संस्था ' बॉम्बे असोसिएशन ' या संस्थेची स्थापना जगन्नाथ शंकरशेठ यांच्या समवेत डॉ. भाऊ दाजी लाड यांनी )
लक्षात ठेवा 👉 जर प्रश्नामध्ये केवळ जगन्नाथ शंकरशेठ हा पर्याय असेल तर उत्तर ' जगन्नाथ शंकरशेठ ' द्यावे )
GK Question : 8
डॉ . भाऊ दाजी लाड यांनी विधवा विवाहाच्या प्रचारासाठी ' पुनर्विवाहोत्तेजक मंडळी ' कधी व कोठे स्थापन केली ?
▪️ 1866 मुंबई
▪️ 1867 पुणे
▪️ 1868 नागपूर
▪️ 1869 नाशिक
Correct Answer: 1866 मुंबई
लक्षात ठेवा 👉 28 जानेवारी 1866 - विधवा विवाहाच्या प्रचारासाठी न्यायमूर्ती रानडे , विष्णुशास्त्री पंडित यांच्या सहकार्याने डॉ भाऊ दाजी लाड यांनी मुंबईत पुनर्विवाहोत्तेजक मंडळी स्थापन केली
GK Question : 9
स्वतःच्या लग्नात वेश्यांना नाच करू देणार नाही व ज्या विवाह समारंभात असे नाच केले जातील तेथे हजर राहणार नाही अशा प्रकारची शपथ खालीलपैकी कोणत्या समाजाचे सदस्यत्व स्वीकारण्यावेळी घ्यावी लागत असे ?
▪️ प्रार्थना समाज
▪️ नीतीवर्धक समाज
▪️ आर्य समाज
▪️ सत्यशोधक समाज
Correct Answer: नीतीवर्धक समाज
GK Question : 10
डॉ भाऊ दाजी लाड यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर सांगता येईल ?
1 ) त्यांचा दादाभाई नौरोजी यांनी लंडनमध्ये स्थापन केलेल्या ईस्ट इंडिया असोसिएशन या संघटनेच्या कार्यात सहभाग होता
2 ) ते बॉम्बे असोसिएशन या संस्थेचे अध्यक्ष होते
3 ) त्यांची सुप्रिम कोर्टाचे शेरीफ म्हणून निवड करण्यात आली होती
4 ) ते मुंबईतील बोर्ड ऑफ एज्युकेशनचे सदस्य होते
▪️ 2 आणि 3
▪️ 1 , 3 आणि 4
▪️ 1 आणि 4
▪️ वरील सर्व
Correct Answer: 1 आणि 4
GK Question : 11
डॉ भाऊ दाजी लाड यांनी कोणत्या नाटकाचे हिंदीत भाषांतर केले ?
▪️ शाकुंतल
▪️ राजा गोपीचंद
▪️ मानाजीराव
▪️ मंगलप्रभात
Correct Answer: राजा गोपीचंद
GK Question : 12
.............. हे G.G.M.C ( Diploma of Graduate ) ही मेडिकल कॉलेजची पदविका मिळविणारे पहिले भारतीय होते ?
▪️ डॉ बाबासाहेब आंबेडकर
▪️ महर्षी कर्वे
▪️ लोकहितवादी
▪️ रामचंद्र विठ्ठल लाड
Correct Answer: रामचंद्र विठ्ठल लाड
लक्षात ठेवा 👉 रामचंद्र विठ्ठल लाड यांना आदराने भाऊ दाजी असे म्हटले जाते
GK Question : 13
डॉ. भाऊ दाजी लाड यांचा खालीलपैकी कोणत्या संस्थांशी संबंध होता ?
1 ) बोर्ड ऑफ एज्युकेशन
2 ) बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी
3 ) ग्रॅट मेडिकल सोसायटी
4) स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी
▪️ 1 , 2 आणि 4
▪️ 2 आणि 3
▪️ 1आणि 4
▪️ वरील सर्व
Correct Answer: वरील सर्व
GK Question : 14
" एतदेशीयांनी अन्य देशात जाऊन आपली बुद्धी वाढवावी , जे ज्ञान पृथ्वीच्या शेवटाकडील ज्या लहानशा बेटात प्राप्त होते तेथे जाऊन संपादावे " वरील विचार कोणाचे आहेत ?
▪️ डॉ भाऊ दाजी लाड
▪️ सुभाष चंद्र बोस
▪️ डॉ बाबासाहेब आंबेडकर
▪️ महात्मा गांधी
Correct Answer: डॉ भाऊ दाजी लाड
GK Question : 15
डॉ भाऊ दाजी लाड यांचा मृत्यू कधी झाला ?
▪️ 5 जानेवारी 1876
▪️ 3 ऑगस्ट 1867
▪️ 14 नोव्हेंबर 1875
▪️ 31 मे 1874
Correct Answer: 31 मे 1874

Your Score

Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /

Post a Comment

Previous Post Next Post