ब्राम्हो समाजाची स्थापना कोणी केली | Brahmo Samaj MCQ Question Answer in Marathi | Brahmo Samaj in Marathi

समाज सुधारणा चळवळ
ब्राम्हो समाज


Brahmo Samaj Question Answer MCQ Quiz In Marathi



भारतीय समाजसुधार चळवळींच्या इतिहासात ब्राम्हो समाज ही एक महत्त्वपूर्ण आणि क्रांतिकारक संस्था मानली जाते. राजा राममोहन रॉय यांनी 1828 मध्ये स्थापन केलेल्या या संस्थेने अंधश्रद्धा, सतीप्रथा, बालविवाह, जातिव्यवस्था यांसारख्या सामाजिक व धार्मिक कुप्रथांविरुद्ध ठाम भूमिका घेतली.
भारतीय समाजात एकेश्वरवाद, विज्ञाननिष्ठ विचारसरणी आणि स्त्री-पुरुष समानतेचा प्रसार करण्यासाठी या चळवळीने मोठे योगदान दिले. इतिहास आणि समाजसुधार या विषयांतून यासंबंधी वारंवार प्रश्न विचारले जातात.
या ब्लॉग पोस्ट मध्ये दिलेले 10+ ब्राम्हो समाजावर आधारित बहुपर्यायी प्रश्न (MCQ) सोडवा व प्रश्नसंचामध्ये काही चुका आढळल्यास कॉमेंट्स जरूर करा.

ब्राम्हो समाजाची स्थापना कोणी केली,Brahmo Samaj MCQ Question Answer in Marathi,Brahmo Samaj in Marathi,ब्राम्हो समाजाची स्थापना कधी झाली,

Brahmo Samaj MCQ

Gk Question : 1
ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली ?
● महात्मा फुले
● स्वामी दयानंद सरस्वती
● राजा राममोहन रॉय
● दादोबा पांडुरंग
योग्य उत्तर : पर्याय क्र. 3
Gk Question : 2
राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना कधी व कोठे केली ?
● 26 सप्टेंबर 1826 मुंबई
● 20 ऑगस्ट 1828 कलकत्ता
● 22 मार्च 1824 पुणे
● 21 जून 1827 दिल्ली
योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
Gk Question : 3
ब्राह्मो समाजाचे मुखपत्र कोणते ?
● संवाद कौमुदी
● दिनबंधु
● सुदर्शन
● सुबोध पत्रिका
योग्य उत्तर : पर्याय क्र. 1
Gk Question : 4
राजा राममोहन रॉय यांच्या निधनानंतर ब्राह्मो समाजाचे अनुयायी देवेंद्रनाथ टागोर व केशवचंद्र सेन यांच्यात असलेल्या वैचारिक मतभेदामुळे ब्राह्मो समाज दोन भागात विभागला गेला . हे विधान -----------
● चूक आहे
● बरोबर आहे
योग्य उत्तर : बरोबर आहे
Gk Question : 5
ब्राम्हो समाजाची पुढीलपैकी कोणती उद्दिष्टे सांगता येतील ?
अ ) एकेश्वरवादाचा पुरस्कार करणे
ब ) विधवा विवाहास प्रोत्साहन देणे
क ) स्त्री शिक्षणाचा पुरस्कार व त्यासाठी प्रबोधन करणे
ड ) मूर्तिपूजा , बालविवाह , सतीप्रथा , बहुपत्नीत्व अशा समाजविघातक अनिष्ट रूढी - परंपरांना पायबंध घालणे
● अ आणि ब
● अ , क आणि ड
● ब आणि ड
● वरील सर्व
वरील सर्व
Gk Question : 6
1830 मध्ये ब्राह्मो समाजाला विरोध करण्यासाठी कोणाच्या नेतृत्वाखाली सनातन कर्मठ हिंदूनी ' धर्मसभा ' या नावाची संस्था स्थापन केली ?
● लाला हरदयाळ
● निशिवनाथ शास्त्री
● राधाकांत देव
● उमेशचंद्र दत्त
योग्य उत्तर : पर्याय क्र. 3
Gk Question : 7
'First Voice of freedom' असे कोणास म्हटले जाते ?
● प्रार्थना समाज
● आर्य समाज
● ब्राह्मो समाज
● सत्यशोधक समाज
योग्य उत्तर : पर्याय क्र. 3
Gk Question : 8
ब्राह्मो समाज ( काही सदस्यांच्या अमुलाग्र सुधारणांच्या पाठपुराव्यामुळे ) 1866 मध्ये दोन भागात विभागला गेला ते दोन भाग कोणते ? अ) देवेंद्रनाथ टागोर यांचा ब्राह्मो समाज ऑफ इंडिया ब) केशवचन्द्र सेन यांचा आदी ब्रह्मो समाज
● अ बरोबर परंतु ब चूक
● ब बरोबर परंतु अ चूक
● दोन्ही चूक
● दोन्ही बरोबर
योग्य उत्तर : पर्याय क्र. 3
Gk Question : 9
राजा राममोहन रॉय यांच्या मृत्यूनंतर ब्राह्मो समाजाची आठवड्याची प्रार्थना कोण घेत असे ?
● देवेंद्रनाथ टागोर
● रामचंद्र विद्याबागीश
● केशवचन्द्र सिंह
● आनंद मोहन बोस
योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
Gk Question : 10
ब्राम्हो समाजाची तत्वे कोणती ? योग्य पर्याय निवडा
अ ) ईश्वर एकच असून तो निर्गुण व निराकार आहे
ब ) प्रेम , सेवा , परोपकार हाच धर्माचा खरा अर्थ आहे
क ) ईश्वर हा संपूर्ण सृष्टीचा निर्माता व पालक आहे
ड ) परमेश्वर आणि मनुष्य यांच्यात मध्यस्थ म्हणून पुरोहित व पुजाऱ्याची गरज नाही
● अ , क आणि ड
● अ आणि ड
● फक्त क
● वरील सर्व
वरील सर्व

Your Score

Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /

Post a Comment

Previous Post Next Post