आर्य समाजाची स्थापना कोणी केली | Arya Samaj MCQ Questions Answer | Arya Samaj in Marathi

समाज सुधारणा चळवळ
आर्य समाज


Arya Samaj Question Answer MCQ Quiz In Marathi



भारतीय समाजसुधार आणि धार्मिक पुनरुत्थानाच्या इतिहासात आर्य समाज ही एक प्रभावी आणि परिवर्तनकारी संस्था मानली जाते. स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 मध्ये स्थापन केलेल्या या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट – वेदांच्या तत्त्वज्ञानावर आधारित समाजनिर्मिती करणे, अंधश्रद्धा, मूर्तिपूजा, जातिभेद आणि सामाजिक कुप्रथा दूर करणे.

या ब्लॉग पोस्ट मध्ये दिलेले 10+ आर्य समाजावर आधारित बहुपर्यायी प्रश्न (MCQ) सोडवा व प्रश्नसंचामध्ये काही चुका आढळल्यास कॉमेंट्स जरूर करा.

arya samaj in marathi,arya samaj Question Answer,arya samaj MCQ,आर्य समाजाची स्थापना,arya samaj Prashn Uttar

Arya Samaj MCQ

Gk Question : 1
1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना कोणी केली ?
▪️ स्वामी विवेकानंद
▪️ स्वामी दयानंद सरस्वती
▪️ स्वामी श्रद्धानंद
▪️ स्वामी पद्मानंद
Correct Answer: स्वामी दयानंद सरस्वती
Gk Question : 2
आर्य समाजाची स्थापना कधी व कोठे झाली ?
▪️ 10 एप्रिल 1875 ( मुंबई )
▪️ 27 ऑगस्ट 1872 ( पंजाब )
▪️ 14 मार्च 1873 ( दिल्ली )
▪️ 21 नोव्हेंबर 1874 ( कोलकत्ता )
Correct Answer: 10 एप्रिल 1875 रोजी मुंबई
आर्य समाज ही दयानंद सरस्वती यांनी 10 एप्रिल 1875 रोजी मुंबईत स्थापन केलेली हिंदू सुधारणा चळवळ होती . वेदांच्या विश्वासांवर आधारित मूल्ये आणि प्रथा यांना प्रोत्साहन दिले. या समाजातील लोक एकाच देवावर विश्वास ठेवत आणि मूर्तीपूजा नाकारत
Gk Question : 3
आर्य समाजाचे पहिले मुख्य केंद्र कोठे होते ?
▪️ दिल्ली
▪️ लाहोर
▪️ कोलकाता
▪️ मुंबई
Correct Answer: मुंबई
मुंबई प्रांतात स्वामी दयानंद सरस्वती यांना वेदांचा प्रचार आणि प्रसाराविरोधात सनातनी लोकांकडून विरोधाचा सामना करावा लागल्याने त्यांनी 1877 मध्ये तत्कालीन पंजाब प्रांतातील ' लाहोर ' येथे आर्य समाजाची शाखा स्थापन केली . त्यामुळे लाहोर हे पुढील काळात आर्य समाजाचे प्रमुख केंद्र बनले . तत्पूर्वी मुंबई हेच आर्य समाजाचे मुख्य केंद्र होते
Gk Question : 4
आर्य समाजाच्या स्थापनेवर खालीलपैकी कोणत्या समाजाचा प्रभाव होता ?
▪️ प्रार्थना समाज
▪️ ब्राह्मो समाज
▪️ आर्य महिला समाज
▪️ सत्यशोधक समाज
Correct Answer: ब्राह्मो समाज
Gk Question : 5
सत्यार्थ प्रकाश हा कोणत्या समाजाचा मुख्य ग्रंथ आहे ?
▪️ सत्यशोधक समाज
▪️ ब्राह्मो समाज
▪️ आर्य समाज
▪️ प्रार्थना समाज
Correct Answer: आर्य समाज
Gk Question : 6
1874 मध्ये सत्यार्थ प्रकाश, ज्याला आर्य समाजाचे बायबल म्हटले जाते, त्याची रचना कोणी केली ?
▪️ स्वामी दयानंद
▪️ स्वामी श्रद्धानंद
▪️ स्वामी पद्मानंद
▪️ स्वामी विवेकानंद
Correct Answer: स्वामी दयानंद
Gk Question : 7
आर्य समाजामार्फत कोणती मुखपत्रे चालवली जात असत ?
▪️ वैदिक संदेश
▪️ सुदर्शन
▪️ वैदिक आदर्श
▪️ वरील सर्व
Correct Answer: वरील सर्व
Gk Question : 8
समाजाच्या प्रचार आणि प्रसारासाठी विद्यार्थी व तरुणांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना वाढीस लावण्याकरिता ' दयानंद अँग्लो वैदिक कॉलेज ' ची स्थापना कोणी केली ?
▪️ लाला हंसराज
▪️ स्वामी दयानंद
▪️ लाला लजपत राय
▪️ पंडित गुरुदत्त विद्यार्थी
Correct Answer: लाला हंसराज
Gk Question : 9
स्वामी दयानंदांच्या आर्य समाजाचे वर्णन ' लढाऊ हिंदू धर्म ' असे कोणी केले आहे ?
▪️ सरोजिनी नायडू
▪️ ॲनी बेझंट
▪️ भगिनी निवेदिता
▪️ मीरा बेन ( मिस स्लाद )
Correct Answer: भगिनी निवेदिता
Gk Question : 10
आर्य समाजाची तत्वे कोणती ? योग्य पर्याय निवडा
1 ) ईश्वर निर्मिक ( एकच ) असून तो निर्गुण आणि निराकार आहे
2 ) वेद हे अपौरुषेय ( ईश्वरनिर्मित ) आहेत
3 ) ईश्वर हा संपूर्ण सृष्टीचा निर्माता व पालक आहे
4 ) सर्व ज्ञानाचा उगम व परमेश्वराच्या शुद्ध रूपाचे ज्ञान वेदात आहे
▪️ 1 आणि 3
▪️ 2 आणि 4
▪️ 2 , 3 आणि 4
▪️ वरील सर्व
Correct Answer: वरील सर्व
Gk Question : 11
आर्य समाजाची पुढीलपैकी कोणती उद्दिष्टे होती
1 ) हिंदू धर्मातील दोष दूर करून शुद्ध वैदिक धर्माचा पुरस्कार करणे
2 ) विधवा विवाहास प्रोत्साहन देणे
3 ) स्त्री शिक्षणाचा पुरस्कार व त्यासाठी प्रबोधन करणे
4 ) मूर्तिपूजा , बालविवाह , अस्पृश्यता , देवदासी प्रथा अशा समाजविघातक प्रथांना विरोध करणे
▪️ 2 आणि 4
▪️ 1 , 3 आणि 4
▪️ 1 आणि 3
▪️ वरील सर्व
Correct Answer: वरील सर्व

Your Score

Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /

Post a Comment

Previous Post Next Post