मराठी भाषेचा उगम व व्याकरण
Question : 1
मराठी भाषेसंदर्भातील पुढीलपैकी कोणते वाक्य अयोग्य आहे ?
Correct Answer: हिंदी ही मराठी भाषेची जननी आहे
Question : 2
खालीलपैकी कोणती भाषा भारतातील अभिजात भाषा म्हणून ओळखली जाते ?
1 ) हिंदी
2 ) तमिळ
3 ) बंगाली
4 ) तेलगू
1 ) हिंदी
2 ) तमिळ
3 ) बंगाली
4 ) तेलगू
Correct Answer: 2 , 3 आणि 4
अभिजात भाषेमध्ये तमिळ, संस्कृत, कन्नड, तेलगू, मल्याळम, उडिया, मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली अशा 11 भाषांचा समावेश आहे . 2024 पूर्वी अभिजात भाषांची संख्या 6 (तमिळ , संस्कृत , कन्नड , तेलगू , मल्याळम , उडिया) होती . 4 ऑक्टोबर 2024 रोजी 5 नवीन भाषा सामाविष्ट झाल्या (मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली)
Question : 3
पर्यायी उत्तरातून योग्य ते पर्यायी उत्तर शोधा ' भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते ' कारण -
Correct Answer: भाषेमध्ये बदल होत जातात
Question : 4
द्रविडीयन गटातील भाषेमध्ये खालीलपैकी कोणत्या भाषेचा समावेश नाही ?
Correct Answer: ओरीया
Question : 5
भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार हिंदी तसेच इंग्रजी या संघराज्यांच्या व्यवहारांच्या भाषा आहेत ?
Correct Answer: कलम 343
Question : 6
खाली दिलेली विधाने वाचून योग्य विधान / विधाने निवडा ?
अ ) देवनागरी लिपी डावीकडून उजवीकडे लिहितात
ब ) मोडी लिपी म्हणजे पाय मोडून लिहिण्याची पद्धत
क ) भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन
ड ) भाषेमध्ये भाषण व लेखन या दोन्हींचा समावेश होतो
अ ) देवनागरी लिपी डावीकडून उजवीकडे लिहितात
ब ) मोडी लिपी म्हणजे पाय मोडून लिहिण्याची पद्धत
क ) भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन
ड ) भाषेमध्ये भाषण व लेखन या दोन्हींचा समावेश होतो
Correct Answer: वरील सर्व योग्य
Question : 7
मराठी भाषेबद्दल खालील विधाने वाचून अयोग्य विधान / विधाने निवडा ?
1 ) मराठी भाषेचे लिखाण आपण देवनागरी लिपीत करतो
2 ) मराठी भाषेचा विकास संस्कृत व प्राकृत या भाषांपासून झाला
3 ) मराठी भाषेतील आधुनिक वर्णमालेत एकूण 52 वर्ण आहेत
4 ) मराठी भाषेतील आधुनिक वर्णमालेत एकूण 14 स्वर आहेत
1 ) मराठी भाषेचे लिखाण आपण देवनागरी लिपीत करतो
2 ) मराठी भाषेचा विकास संस्कृत व प्राकृत या भाषांपासून झाला
3 ) मराठी भाषेतील आधुनिक वर्णमालेत एकूण 52 वर्ण आहेत
4 ) मराठी भाषेतील आधुनिक वर्णमालेत एकूण 14 स्वर आहेत
Correct Answer: वरील सर्व योग्य
Question : 8
चूक की बरोबर सांगा
अ ) प्राचीनकाळी भारतात ब्राह्मणी आणि खरोष्टी या दोन लिप्या प्रचारात होत्या
ब ) खरोष्टी ही आर्य भारतीय लिपी आहे
क ) ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या लिपीला ब्राह्मी लिपी म्हणतात
अ ) प्राचीनकाळी भारतात ब्राह्मणी आणि खरोष्टी या दोन लिप्या प्रचारात होत्या
ब ) खरोष्टी ही आर्य भारतीय लिपी आहे
क ) ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या लिपीला ब्राह्मी लिपी म्हणतात
Correct Answer: अ आणि क बरोबर
प्राचीन भारतात ब्राह्मी आणि खरोष्टी या दोन लिप्या प्रचलित होत्या. खरोष्टी ही पर्शियन लिपीतून विकसित झालेली लिपी आहे, त्यामुळे ती आर्य भारतीय लिपी नाही. ब्रह्मदेवाने निर्माण केल्याची आख्यायिका असल्याने ब्राह्मी लिपी असे नाव पडले.
Question : 9
व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे ?
Correct Answer: व्यंजन व स्वर यांचे एकत्रिकरण
व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी त्यांना स्वरांचे एकत्रिकरण करावे लागते
Question : 10
योग्य विधाने ओळखा ?
1 ) तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मुलध्वनींना वर्ण असे म्हणतात
2 ) ध्वनीला किंवा आवाजाला चिन्ह किंवा खूण स्वरूपात लिहिल्यास त्याचे अक्षर बनते
3 ) शब्द तयार होण्यासाठी अक्षरे ठराविक क्रमाने येऊन त्यांना अर्थ प्राप्त होणे गरजेचे असते
4 ) अर्थपूर्ण शब्द समूहाला वाक्य असे म्हणतात
1 ) तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मुलध्वनींना वर्ण असे म्हणतात
2 ) ध्वनीला किंवा आवाजाला चिन्ह किंवा खूण स्वरूपात लिहिल्यास त्याचे अक्षर बनते
3 ) शब्द तयार होण्यासाठी अक्षरे ठराविक क्रमाने येऊन त्यांना अर्थ प्राप्त होणे गरजेचे असते
4 ) अर्थपूर्ण शब्द समूहाला वाक्य असे म्हणतात
Correct Answer: वरील सर्व योग्य
दिलेली सर्व विधाने योग्य आहेत. वर्ण, अक्षर, शब्द आणि वाक्य यांची व्याख्या या विधानांमध्ये योग्य प्रकारे दिली आहे.
Question : 11
अयोग्य जोडी ओळखा ?
1 ) भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र - व्याकरण
2 ) पूर्ण अर्थाचे बोलणे - वाक्य
3 ) ज्यांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो - ऱ्हस्व स्वर
4 ) स्पष्ट व खणखणीत उच्चार - अनुस्वार
1 ) भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र - व्याकरण
2 ) पूर्ण अर्थाचे बोलणे - वाक्य
3 ) ज्यांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो - ऱ्हस्व स्वर
4 ) स्पष्ट व खणखणीत उच्चार - अनुस्वार
Correct Answer: केवळ 3
Question : 12
वाक्य म्हणजे .........
Correct Answer: संपूर्ण विचार व्यक्त करणारा एक किंवा अनेक शब्दांचा समूह
वाक्य म्हणजे संपूर्ण विचार व्यक्त करणारा एक किंवा अनेक शब्दांचा समूह
Question : 13
अक्षर म्हणजे काय ? अर्थ सांगा
Correct Answer: नष्ट न होणारे
अक्षर म्हणजे 'नष्ट न होणारे'. व्याकरणात, अक्षर म्हणजे असा ध्वनी जो उच्चारल्या जातो आणि तो कायम राहतो
Question : 14
आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक खुणेला काय म्हणतात ?
Correct Answer: अक्षर
आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक खुणेला अक्षर म्हणतात
Question : 15
शब्दाच्या अक्षरांमधील शेवटच्या अक्षराला काय म्हणतात ?
Correct Answer: अन्त्य अक्षर
शब्दाच्या अक्षरांमधील शेवटच्या अक्षराला 'अन्त्य अक्षर' असे म्हणतात
Question : 16
अक्षरांना ------------- असे म्हणतात
Correct Answer: ध्वनिचिन्हे
अक्षरांना 'ध्वनिचिन्हे' असे म्हणतात कारण ते ध्वनीचे प्रतिनिधित्व करतात
Question : 17
ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांचा अर्थपूर्ण समूह म्हणजे -------------
Correct Answer: शब्द
ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांचा अर्थपूर्ण समूह म्हणजे 'शब्द'
Question : 18
अक्षर उच्चारायला जो वेळ लागतो त्याला काय म्हणतात ?
Correct Answer: मात्रा
अक्षर उच्चारायला जो वेळ लागतो, त्याला 'मात्रा' म्हणतात
Question : 19
मराठी भाषेतील ग्रंथ व ग्रंथकार ( अयोग्य जोडी ओळखा )
1 ) मुकुंदराज - विवेकसिंधू
2 ) म्हाइंभट्ट - लीळाचरित्र
3 ) केशव देव व्यास - दृष्टांत पाठ
4 ) भीष्माचार्य - पंचवार्तिक
1 ) मुकुंदराज - विवेकसिंधू
2 ) म्हाइंभट्ट - लीळाचरित्र
3 ) केशव देव व्यास - दृष्टांत पाठ
4 ) भीष्माचार्य - पंचवार्तिक
Correct Answer: एकही नाही
दिलेल्या सर्व जोड्या योग्य आहेत. मुकुंदराज (विवेकसिंधू), म्हाइंभट्ट (लीळाचरित्र), केशव देव व्यास (दृष्टांत पाठ), आणि भीष्माचार्य (पंचवार्तिक) या जोड्या बरोबर आहेत
Question : 20
भाषा म्हणजे -----------
1 . विचार व्यक्त करण्याचे साधन
2 . भावना व्यक्त करण्याचे साधन
3 . अनुभव व्यक्त करण्याचे साधन
4 . कल्पना व्यक्त करण्याचे साधन
1 . विचार व्यक्त करण्याचे साधन
2 . भावना व्यक्त करण्याचे साधन
3 . अनुभव व्यक्त करण्याचे साधन
4 . कल्पना व्यक्त करण्याचे साधन
Correct Answer: वरील सर्व
Question : 21
व्याकरण म्हणजे ..........
Correct Answer: भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र
व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र. ते भाषेचे नियम आणि रचना स्पष्ट करते
Question : 22
खालीलपैकी कोणी व्याकरणाला शब्दानुशासन असे नाव दिले आहे ?
Correct Answer: महर्षी पतंजली
महर्षी पतंजली यांनी व्याकरणाला 'शब्दानुशासन' असे नाव दिले आहे.
Question : 23
भाषा म्हणजे .............
Correct Answer: विचार व्यक्त करण्याचे साधन
Question : 24
द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज हे पुस्तक कोणी लिहिले ?
Correct Answer: विल्यम कॅरी
विल्यम कॅरी यांनी 'द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज' हे पुस्तक लिहिले
Question : 25
मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती ?
Correct Answer: रंगनाथ पठारे
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती
Your Score
Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /
🔊 महत्त्वाची सूचना : जर तुम्हाला या प्रश्नसंचामध्ये काही त्रुटी आढळल्या असतील किंवा एखाद्या प्रश्नाचे उत्तर चुकीचे दिले आहे, असे वाटत असल्यास, आम्हाला चुकीच्या प्रश्न क्रमांकासह योग्य उत्तर कमेंट करा
🌐 दररोज नवनवीन प्रश्नसंच सोडविण्यासाठी MPSC Battle या संकेतस्थळाला दररोज आवश्य भेट द्या
Q no 11 ch anser 4 aahe
ReplyDeleteआपल्या विनंतीनुसार उत्तरांमध्ये आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत . 🙌 सहकार्याबद्दल धन्यवाद
Delete