विनोबा भावे यांच्या जीवन कार्यावर आधारित प्रश्न उत्तर | Vinoba Bhave Question Answer In Marathi

Maharashtra Samaj Sudharak MCQ Quiz in Marathi | Samaj Sudharak GK Questions

विनोबा भावे यांच्या जीवनावर आधारित
सराव प्रश्नसंच


Vinoba Bhave Question Answer MCQ Quiz In Marathi


भारतीय स्वातंत्र्य चळवळ आणि समाजसुधार चळवळीतील एक आदर्श विचारवंत व गांधीवादी नेता म्हणून विनोबा भावे यांचे नाव घेतले जाते. 11 सप्टेंबर 1895 रोजी जन्मलेले विनोबा भावे हे महात्मा गांधींचे शिष्य होते आणि त्यांनी भूदान आंदोलन चालवून भूमिहीन शेतकऱ्यांना जमीन मिळवून देण्यासाठी कार्य केले.

ते अखंड भारत, अहिंसा, सत्य आणि सामाजिक समता या मूल्यांचे प्रखर पुरस्कर्ते होते. त्यांच्या कार्याचा प्रभाव आजही ग्रामीण भारतावर दिसून येतो.

Vinoba Bhave Question In Marathi : या ब्लॉग पोस्टमध्ये, आम्ही विनोबा भावे यांच्या जीवनावर आधारित 20+ बहु-निवडक प्रश्नांचा (MCQ) संच तयार केला आहे.
हे प्रश्न विशेषत: विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त ठरतील .

Vinoba Bhave Question Answer in Marathi, Vinoba Bhave MCQ, Vinoba Bhave Prashn Uttar, विनोबा भावे प्रश्न उत्तर, Vinoba Bhave mahiti

Vinoba Bhave Question Answer in Marathi

Gk Question : 1
भारतीय भूदान चळवळीचे जनक कोणास म्हटले जाते ?
▪️ विनोबा भावे
▪️ सेनापती बापट
▪️ साने गुरुजी
▪️ महात्मा गांधी
Correct Answer: विनोबा भावे
Gk Question : 2
आचार्य विनोबा भावे यांचा जन्म कधी झाला ?
▪️ 15 मार्च 1895
▪️ 11 सप्टेंबर 1895
▪️ 26 ऑगस्ट 1895
▪️ 21 डिसेंबर 1895
Correct Answer: 11 सप्टेंबर 1895 , गागोदे ( जि. रायगड )
Gk Question : 3
विनोबा भावे यांचे संपूर्ण नाव काय ?
▪️ श्रीधर चिंतामणी भावे
▪️ गोविंद वल्लभपंत भावे
▪️ विनोबा दिनकरराव भावे
▪️ विनायक नरहर भावे
Correct Answer: विनायक नरहर भावे
Gk Question : 4
11 जुलै 1957 रोजी विनोबा भावे यांनी शांतीसेनेची स्थापना करून कोणाची सेनापती म्हणून निवड केली ?
▪️ रामचंद्र रेड्डी
▪️ केलप्पनजी
▪️ सिंगरवेलु
▪️ विरेसलिंगम पंतलु
Correct Answer: रामचंद्र रेड्डी
Gk Question : 5
आचार्य विनोबा भावे यांच्यावर खालीलपैकी कोणाचा प्रभाव होता ?
▪️ न्या.रानडे
▪️ जॉन स्टुअर्ट मिल
▪️ महात्मा गांधी
▪️ एच.स्पेनर
Correct Answer: महात्मा गांधी
Gk Question : 6
खालीलपैकी कोणते सन्मान विनोबा भावे यांना दिले होते ?
1 ) भारतरत्न
2 ) पद्मविभूषण
3 ) रॅमन मॅगसेसे
4 ) एल.एल.डी
▪️ 1 , 2 आणि 3
▪️ 1 आणि 3
▪️ फक्त 1
▪️ वरील सर्व
Correct Answer: 1 आणि 3
Gk Question : 7
आचार्य विनोबा भावे यांचे मूळ गाव कोणते ?
▪️ गागोदे
▪️ पुलगांव
▪️ लाखणी
▪️ वाई
Correct Answer: वाई
Gk Question : 8
विनायक नरहर भावे यांना ' विनोबा ' हे टोपण नाव कोणी दिले ?
▪️ महात्मा गांधी
▪️ पंडित जवाहरलाल नेहरु
▪️ लोकमान्य टिळक
▪️ डॉ. राजेंद्र प्रसाद
Correct Answer: महात्मा गांधी
Gk Question : 9
आचार्य विनोबा भावे यांचा जन्म कोठे झाला ?
▪️ पवनार ( जि. वर्धा )
▪️ गागोदे ( जि. रायगड )
▪️ रामटेक ( जि. नागपूर )
▪️ मोर्शी ( जि. अमरावती )
Correct Answer: 11 सप्टेंबर 1895 , गागोदे ( जि. रायगड )
Gk Question : 10
13 जून 1923 रोजी आचार्य विनोबा भावेंना अटक करून त्यांना एक वर्ष सक्त मजुरीची शिक्षा झाली होती . कारण -
▪️ त्यांनी भारतात भूदान चळवळ उभी करून इंग्रजांविरुद्ध लढा दिला म्हणून
▪️ ते नागपूर येथील झेंडा सत्याग्रहात सहभागी झाले म्हणून
▪️ गांधीजींच्या सत्याग्रहात प्रवेश करून बंड करू लागले म्हणून
▪️ सेवाग्राम येथे गांधीवादी नेत्यांचे संमेलन भरवून सर्वोदय समाजाची स्थापना केली म्हणून
Correct Answer: ते नागपूर येथील झेंडा सत्याग्रहात सहभागी झाले म्हणून
Gk Question : 11
विनोबा भावेंच्या भूदान चळवळी संदर्भात खालील विधाने विचारात घेऊन योग्य विधान/ने असलेला पर्याय निवडा ?
1 ) विनोबा भावे यांनी नालगोंडा जिल्ह्यातील पोचमपल्ली गावापासून भूदान यज्ञास सुरुवात केली
2 ) गरीब , दलित - भुकेल्या , भूमिहीन लोकांसाठी त्यांना हक्काची जमीन मिळवून देणे हा त्यामागचा उद्देश होता
3 ) पोचमपल्ली गावातील श्री रामचंद्र रेड्डी या गृहस्थाने 100 एकर जमीन देऊन भूदान यज्ञाचा आरंभ केला
4 ) उत्तर प्रदेशातील हमीपूर जिल्ह्यातील ' मंगरोठ ' हे भारतातील पहिले ग्रामदानी गाव म्हणून घोषित झाले
▪️ 1 आणि 4
▪️ 2 , 3 आणि 4
▪️ 1 आणि 3
▪️ वरील सर्व
Correct Answer: वरील सर्व
Gk Question : 12
कोणत्या आश्रमात विनोबांची गांधीजींशी पहिली भेट झाली ?
▪️ विसर्जन आश्रम
▪️ परमधाम आश्रम
▪️ सत्याग्रह आश्रम
▪️ मैत्री आश्रम
Correct Answer: सत्याग्रह आश्रम
7 जून 1916 रोजी कोचरब येथील ' सत्याग्रह आश्रमात ' गांधीजींशी विनोबा भावेंची पहिली भेट झाली
Gk Question : 13
आंतरराष्ट्रीय रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण ?
▪️ देवेंद्रनाथ टागोर
▪️ महर्षी कर्वे
▪️ महात्मा गांधी
▪️ विनोबा भावे
Correct Answer: विनोबा भावे
Gk Question : 14
विनोबा भावे यांनी १९३०-३१ दरम्यान तुरुंगवासात असताना कोणत्या ग्रंथाची रचना केली
▪️ गीतासार
▪️ गीताई
▪️ गीता रहस्य
▪️ गीताबोध
Correct Answer: गीताई
Gk Question : 15
वर्धाश्रम मूर्तरुपास आणण्यास विनोबा भावे यांना कोणी सहकार्य केले ?
▪️ जमनलाल बजाज
▪️ महात्मा गांधी
▪️ मधुकर दंडवते
▪️ मनोहर दिवान
Correct Answer: जमनलाल बजाज
Gk Question : 16
आचार्य विनोबा भावे यांचे निधन कधी झाले ?
▪️ 12 जानेवारी 1982
▪️ 26 सप्टेंबर 1982
▪️ 15 नोव्हेंबर 1982
▪️ 27 जून 1982
Correct Answer: 15 नोव्हेंबर 1982 पवनार ( वर्धा )
Gk Question : 17
आचार्य विनोबा भावे यांच्यासंदर्भात कोणते विधान असत्य नाही ?
1 ) 1936 साली फैजपूर येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या पहिल्या ग्रामीण अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते
2 ) त्यांनी सेवाग्राम येथे गांधीवादी नेत्यांचे संमेलन भरवून सर्वोदय समाजाची स्थापना केली
3 ) 1940 च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळी दरम्यान गांधीजींनी त्यांची प्रथम सत्याग्रही म्हणून निवड केली
4 ) 1975 मध्ये वर्धा येथे त्यांनी परमधाम आश्रमाची स्थापना केली
▪️ 1 आणि 4
▪️ 2 , 3 आणि 4
▪️ फक्त 3
▪️ वरील सर्व
Correct Answer: 2 , 3 आणि 4
27 व 28 डिसेंबर 1936 रोजी जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या पहिल्या ग्रामीण अधिवेशनाची मुहूर्तमेढ विनोबा भावे यांच्या हस्ते करण्यात आली होती . या अधिवेशनाचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते
Gk Question : 18
विनोबा भावे यांनी स्थापन केलेले आश्रम व त्यांचे ठिकाण या संदर्भात चुकीची जोडी असलेला पर्याय ओळखा ?
▪️ सत्याग्रह आश्रम - कोचरब
▪️ विसर्जन आश्रम - इंदूर
▪️ मैत्री आश्रम - धारवाड
▪️ परमधाम आश्रम - वर्धा
Correct Answer: मैत्री आश्रम - धारवाड
5 मार्च 1962 रोजी विनोबा भावे यांनी भारत - चीन सीमेवरील नेफा येथील सुबन्सरी डिव्हिजनजवळ मैत्री आश्रमाची स्थापना केली
Gk Question : 19
विनोबा भावे यांच्याबाबतीत कोणते विधान/ने असत्य आहे ?
1 ) जानेवारी 1923 मध्ये त्यांनी महाराष्ट्र धर्म हे मासिक सुरू केले
2 ) त्यांचा नागपूर येथे झालेल्या झेंडा सत्याग्रहात सहभाग होता
3 ) 1934 मध्ये त्यांनी वर्धा येथे ग्रामसेवा मंडळाची स्थापना केली
4 ) 1934 साली भरलेल्या अखिल भारतीय गो-सेवा परिषदेचे ते अध्यक्ष होते
▪️ फक्त 1
▪️ फक्त 3
▪️ 2 आणि 4
▪️ वरीलपैकी एकही नाही
Correct Answer: वरीलपैकी एकही नाही
Gk Question : 20
विनोबा भावे यांनी स्थापन केलेले आश्रम व त्यांचे स्थापना वर्ष यांच्या योग्य जोड्या लावा ?
गट अ : आश्रम
1 सर्वोदय आश्रम
2 विसर्जन आश्रम
3 मैत्री आश्रम
4 परमधाम आश्रम
गट ब : स्थापना वर्ष
A 1960
B 1962
C 1975
D 1940
▪️ 1-B , 2-C , 3-D , 4-A
▪️ 1-C , 2-B , 3-A , 4-D
▪️ 1-D , 2-A , 3-B , 4-C
▪️ 1-A , 2-B , 3-C , 4-D
Correct Answer: 1-D , 2-A , 3-B , 4-C
Gk Question : 21
आचार्य विनोबा भावे यांच्या संदर्भातील कोणते विधान असत्य आहे ?
▪️ त्यांनी धारवाड येथे सर्वोदय पत्राची कल्पना रुजवली
▪️ सर्वोदय कार्यकर्त्यांसाठी त्यांनी इंदूर येथे सर्वोदय समाजाची स्थापना केली
▪️ त्यांनी बिहार मधील कहलगाव येथे आचार्य कुलाची स्थापना केली
▪️ भारत चीन सीमेवर नेफा येथील सुबन्सरी डिव्हिजनजवळ त्यांनी ' मैत्री आश्रमा ' ची स्थापना केली
Correct Answer: त्यांनी धारवाड येथे सर्वोदय पत्राची कल्पना रुजवली
Gk Question : 22
आचार्य विनोबा भावे यांचे निधन कोठे झाले ?
▪️ पाचोरा ( जळगाव )
▪️ बाबूळगांव ( अकोला )
▪️ पवनार ( वर्धा )
▪️ परतवाडा ( अमरावती )
Correct Answer: पवनार ( वर्धा )
Gk Question : 23
विनोबा भावे यांनी सुरू केलेली चळवळ कोणती ?
▪️ पर्यावरण चळवळ
▪️ असहकार चळवळ
▪️ भूदान चळवळ
▪️ संयुक्त महाराष्ट्र चळवळ
Correct Answer: भूदान चळवळ

Your Score

Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /

Post a Comment

Previous Post Next Post