राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रश्न उत्तर | Tukdoji Maharaj Question Answer in Marathi | Tukdoji Maharaj MCQ Quiz Question

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रश्न उत्तर | Rashtrasant Tukdoji Maharaj Information in Marathi


Rashtrasant Tukdoji Maharaj Question Answer MCQ Quiz In Marathi


भारतीय संतपरंपरेतील एक प्रख्यात समाजसुधारक आणि आध्यात्मिक नेते म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे योगदान उल्लेखनीय आहे. 30 एप्रिल 1909 रोजी जन्मलेले तुकडोजी महाराज यांनी ग्रामीण विकास, समाजजागृती आणि आध्यात्मिक प्रबोधन यासाठी कार्य केले.

त्यांनी ग्रामगीते सारख्या ग्रंथातून ग्रामविकासाची संकल्पना मांडली आणि स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग घेतला. लोकसंगीत, कीर्तन आणि प्रवचनांच्या माध्यमातून त्यांनी जनजागृती केली.

Rashtrasant Tukdoji Maharaj Question In Marathi : या ब्लॉग पोस्टमध्ये, आम्ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर आधारित 25+ बहु-निवडक प्रश्नांचा (MCQ) संच तयार केला आहे . हे प्रश्न विशेषत: विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त आहेत . सर्व प्रश्न काळजीपूर्वक वाचा व प्रश्नसंचामध्ये काही चूक आढळल्यास कमेंट जरुर करा

Rashtrasant Tukdoji Maharaj Question Answer in Marathi,Rashtrasant Tukdoji Maharaj Prashn Uttar,तुकडोजी महाराज मराठी माहिती,तुकडोजी महाराजांचे नाव काय, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रश्न उत्तर

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रश्न उत्तर

Gk Question : 1
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म कधी झाला ?
◉ 30 एप्रिल 1909
◉ 26 डिसेंबर 1914
◉ 17 मार्च 1910
◉ 27 सप्टेंबर 1912
Correct Answer: 30 एप्रिल 1909
Gk Question : 2
तुकडोजी महाराजांचा जन्म कुठे झाला ?
◉ शिरवली
◉ यावली
◉ ना़ंदगाव
◉ हिंगणघाट
Correct Answer: यावली
Gk Question : 3
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मगाव असलेले यावली हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
◉ वर्धा
◉ नागपूर
◉ यवतमाळ
◉ अमरावती
Correct Answer: अमरावती
Gk Question : 4
राष्ट्रसंत म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो ?
◉ तुकडोजी महाराज
◉ तुकाराम महाराज
◉ ज्ञानेश्वर महाराज
◉ एकनाथ महाराज
Correct Answer: तुकडोजी महाराज
Gk Question : 5
तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत ही पदवी खालीलपैकी कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात आली ?
◉ डॉ राजेंद्र प्रसाद
◉ पंडित जवाहरलाल नेहरू
◉ महात्मा गांधी
◉ डॉ बाबासाहेब आंबेडकर
Correct Answer: महात्मा गांधी
Gk Question : 6
तुकडोजी महाराजांचा मृत्यू कधी झाला ?
◉ 11 ऑक्टोबर 1968
◉ 11 ऑक्टोबर 1967
◉ 11 ऑक्टोबर 1966
◉ 11 ऑक्टोबर 1965
Correct Answer: 11 ऑक्टोबर 1967
Gk Question : 7
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना एकूण किती वर्ष आयुष्य लाभले ?
◉ 60 वर्ष
◉ 55 वर्ष
◉ 45 वर्षे
◉ 50 वर्ष
Correct Answer: 50 वर्ष
Gk Question : 8
तुकडोजी महाराजांचे संपूर्ण नाव काय ?
◉ माणिक बंडोजी इंगळे
◉ डेबुजी झिंगरोजी जानोरकर
◉ बंडोजी माणिक इंगळे
◉ झिंगरोजी डेबुजी जानोरकर
Correct Answer: माणिक बंडोजी इंगळे
Gk Question : 9
तुकडोजी महाराजांचे गुरु कोण होते ?
◉ महात्मा गांधी
◉ आकडोजी महाराज
◉ छत्रपती शिवाजी महाराज
◉ संत गाडगे महाराज
Correct Answer: आकडोजी महाराज
Gk Question : 10
संत तुकडोजी महाराज यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला ?
◉ ग्रामगीता
◉ ज्ञानेश्वरी
◉ दासबोध
◉ अमृतानुभव
Correct Answer: ग्रामगीता
Gk Question : 11
कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रजागृतीचे कार्य करणाऱ्या .......... यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो ?
◉ गाडगे महाराज
◉ साने गुरुजी
◉ तुकडोजी महाराज
◉ विनोबा भावे
Correct Answer: तुकडोजी महाराज
Gk Question : 12
अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना कोणी केली ?
◉ संत गाडगेबाबा
◉ साने गुरुजी
◉ आचार्य विनोबा भावे
◉ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
Correct Answer: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
Gk Question : 13
1930 च्या जंगल सत्याग्रहात त्यांचा सक्रिय सहभाग होता . सत्याग्रही तरुणांच्या शिबिरांमध्ये आपल्या भजनांद्वारे चैतन्य निर्माण करणारे देवबाबा म्हणून ते प्रसिद्ध झाले . ते कोण ?
◉ साने गुरुजी
◉ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
◉ आचार्य विनोबा भावे
◉ बाबा पद्मनजी
Correct Answer: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
Gk Question : 14
पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरात सर्व जातींना प्रवेश मिळावा म्हणून स्वाक्षरी मोहीम कोणी राबविली ?
◉ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
◉ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
◉ महात्मा फुले
◉ गोपाळ बाबा वलंगकर
Correct Answer: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
Gk Question : 15
तुकडोजी महाराजांच्या आईचे नाव काय ?
◉ सावित्री
◉ नर्मदा
◉ मंजुळा
◉ विजया
Correct Answer: मंजुळा
Gk Question : 16
अंधश्रद्धा व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी भजन आणि कीर्तनाच्या माध्यमातून खालीलपैकी कोणी जनजागृती करण्याचे कार्य केले ?
◉ महात्मा फुले
◉ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
◉ आचार्य बाळशास्त्री जांभेकर
◉ साने गुरुजी
Correct Answer: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
Gk Question : 17
गावचा विकास कसा साधावा हे लोकांना समजावून देण्यासाठी ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला ?
◉ संत ज्ञानेश्वर महाराज
◉ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
◉ संत तुकाराम महाराज
◉ संत गाडगे महाराज
Correct Answer: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
Gk Question : 18
सन 1934 मध्ये लोककल्याणाचे उपक्रम राबविण्याकरिता गुरुकुंज आश्रमाची स्थापना कोणी केली ?
◉ तुकडोजी महाराज
◉ संत गाडगेबाबा
◉ पंजाबराव देशमुख
◉ महर्षी कर्वे
Correct Answer: तुकडोजी महाराज
Gk Question : 19
संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कोठे आहे ?
◉ भंडारा
◉ गोंदिया
◉ मोझरी
◉ शेगाव
Correct Answer: मोझरी
Gk Question : 20
खंजिरी भजन हा प्रकार कोणाच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते ?
◉ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
◉ संत गाडगे महाराज
◉ आचार्य विनोबा भावे
◉ संत आकडोजी महाराज
Correct Answer: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
Gk Question : 21
............ यांना आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणून ओळखतो ?
◉ माणिक बंडूजी इंगळे
◉ विष्णू भिकाजी गोखले
◉ डेंबुजी झिंगराजी जानोरकर
◉ गोपाळ हरी देशमुख
Correct Answer: माणिक बंडूजी इंगळे
Gk Question : 22
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी केली ?
◉ 27 फेब्रुवारी 1952
◉ 19 नोहेंबर 1943
◉ 6 डिसेंबर 1933
◉ 14 एप्रिल 1950
Correct Answer: 19 नोहेंबर 1943
Gk Question : 23
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना तुकड्या असे नाव कोणी ठेवले ?
◉ महात्मा गांधी
◉ कर्मवीर भाऊराव पाटील
◉ महर्षी विठ्ठल शिंदे
◉ आकडोजी महाराज
Correct Answer: आकडोजी महाराज
Gk Question : 24
" झाड - झडूले शस्त्रे बनेंगे , भक्त बनेगी सेना ।। पत्थर सारे बॉम्ब बनेंगे , नाव लगेगी किनारे , आते है नाथ हमारे ।। "अशा प्रकारे स्फूर्तिपर भजने करून तरुणांमध्ये राष्ट्रप्रेम जागविणारे राष्ट्रभक्त कोण ?
◉ सुभाषचंद्र बोस
◉ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
◉ स्वातंत्र्यवीर सावरकर
◉ सेनापती बापट
Correct Answer: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
Gk Question : 25
खालीलपैकी कोणाचे नाव मोझरी ( अमरावती ) येथील गुरुकुंज आश्रमाशी संबंधित आहे ?
◉ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
◉ बाबा आमटे
◉ आचार्य विनोबा भावे
◉ महर्षी कर्वे
Correct Answer: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

Your Score

Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /

Post a Comment

Previous Post Next Post