सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर आधारित
सराव प्रश्नसंच
Savitribai Phule Question Answer MCQ Quiz In Marathi
भारतीय समाजसुधार चळवळीतील स्त्रीशिक्षणाच्या अग्रणी म्हणून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव आदराने घेतले जाते
अंधश्रद्धा, जातिव्यवस्था आणि स्त्रियांवरील अन्याय याविरुद्ध त्यांनी कठोर लढा दिला. शिक्षण, सामाजिक प्रबोधन आणि स्त्री-पुरुष समानतेसाठी त्यांचे योगदान अतुलनीय आहे
Savitribai Phule Question In Marathi : या ब्लॉग पोस्टमध्ये, आम्ही सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित 20+ बहु-निवडक प्रश्नांचा (MCQ) संच तयार केला आहे.
हे प्रश्न विशेषत: विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त आहेत
Savitribai Phule Question Answer in Marathi
GK Question : 1
दुर्लक्षित मातांचे कल्याण , बालविवाहास विरोध व स्त्री - शिक्षण या क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या आद्य महिला समाजसेविका कोण ?
Correct Answer: सावित्रीबाई फुले
GK Question : 2
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला ?
Correct Answer: 3 जानेवारी 1831
GK Question : 3
सावित्रीबाई फुले यांचा जन्म कोठे झाला ?
Correct Answer: नायगाव
GK Question : 4
सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव ' नायगाव ' हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Correct Answer: सातारा
GK Question : 5
3 जानेवारी हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जातो ?
Correct Answer: बालिका दिन
GK Question : 6
सन 1840 मध्ये महात्मा जोतिबा फुले यांच्याशी सावित्रीबाईंचा विवाह झाला . विवाहवेळी सावित्रीबाईंचे वय किती वर्ष होते ?
Correct Answer: 9 वर्ष
GK Question : 7
महात्मा जोतिबा फुले यांनी शिक्षित केलेली पहिली महिला कोण ?
Correct Answer: सावित्रीबाई फुले
GK Question : 8
सावित्रीबाईंच्या वडिलांचे नाव काय होते ?
Correct Answer: खंडोजी पाटील
GK Question : 9
' बावनकशी सुबोध रत्नाकर ' हा काव्यग्रंथ कोणी लिहिला ?
Correct Answer: सावित्रीबाई फुले
GK Question : 10
महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी घेतलेल्या दत्तक मुलाचे नाव काय ?
Correct Answer: यशवंत
GK Question : 11
भारतातील पहिली महिला शिक्षिका कोण ?
Correct Answer: सावित्रीबाई फुले
GK Question : 12
1897 च्या पुणे येथील प्लेग साथीच्या वेळी कोणत्या मुलाची सुश्रुषा करताना सावित्रीबाई प्लेग साथीच्या बळी ठरल्या ?
Correct Answer: पांडुरंग बाबाजी गायकवाड
GK Question : 13
मुलींच्या शिक्षणाच्या मौलिक कार्याबद्दल इंग्रज सरकारच्या वतीने कोणाच्या हस्ते सावित्रीबाईंचा गौरव करण्यात आला ?
Correct Answer: मेजर कॅन्डी
GK Question : 14
सावित्रीबाई फुले व जोतिबांनी दत्तक घेतलेला मुलगा ' यशवंत ' याच्या आईचे नाव काय होते ?
Correct Answer: काशीबाई नातू
GK Question : 15
सावित्रीबाई फुले खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी ओळखल्या जातात ?
Correct Answer: शिक्षण
GK Question : 16
शिक्षण कार्यामुळे सनातनांच्या विरोधातून फुले परिवारास गृहत्या करावा लागला होता . त्यावेळी कोणाच्या घरी जोतिबांनी आश्रय घेऊन शिक्षण कार्य सुरू ठेवले ?
Correct Answer: उस्मान शेख
GK Question : 17
शिक्षणापासून वंचित मुलींसाठी महाराष्ट्र सरकारने कोणती योजना सुरू केली आहे ?
Correct Answer: दत्तक बालक योजना
GK Question : 18
सावित्रीबाईच्या शिक्षण कार्यात सहभागी झालेल्या भारतातील पहिल्या मुस्लिम स्त्री शिक्षिका पुढीलपैकी कोण ?
Correct Answer: फातिमा शेख
GK Question : 19
ज्ञानज्योती सावित्रीबाई जोतिबा फुले यांचे निधन केव्हा झाले ?
Correct Answer: 10 मार्च 1897
Your Score
Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /