लोकमान्य टिळक प्रश्न उत्तर | Lokmanya Tilak Question Answer in Marathi
लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर आधारित सराव प्रश्नसंच
Lokmanya Tilak Question Answer In Marathi
भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे एक महान स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, समाजसुधारक आणि पत्रकार म्हणून ओळखले जातात. 23 जुलै 1856 रोजी जन्मलेले टिळक हे "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" या घोषवाक्यासाठी प्रसिद्ध आहेत .
त्यांनी केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे चालवून जनतेत राष्ट्रीय जाणीव निर्माण केली. सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती साजरी करून त्यांनी लोकांना संघटित केले व स्वातंत्र्यलढ्यासाठी प्रेरित केले. त्यांचे योगदान भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या गरम पंथाच्या नेतृत्वात विशेष महत्त्वाचे होते .
Lokmanya Tilak Question In Marathi : या ब्लॉग पोस्टमध्ये, आम्ही लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर आधारित 50+ बहु-निवडक प्रश्नांचा (MCQ) संच तयार केला आहे . हे प्रश्न विशेषत: तुम्हाला विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मदत करण्यासाठी तयार केले गेले आहेत, जिथे भारतीय स्वातंत्र्यसैनिकांबद्दल माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे .
Lokmanya Tilak Question Answer,Lokmanya Tilak MCQ,Lokmanya Tilak Prashn Uttar, लोकमान्य टिळक प्रश्न उत्तर, लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा
Lokmanya Tilak Question Answer in Marathi
Gk Question : 1
लोकमान्य टिळकांचा जन्म कधी झाला ?
▪️ 23 जुलै 1856
▪️ 23 जुलै 1857
▪️ 23 जुलै 1858
▪️ 23 जुलै 1859
Correct Answer: 23 जुलै 1856
Gk Question : 2
भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हटले जाते ?
▪️ दादाभाई नौरोजी
▪️ लोकमान्य टिळक
▪️ सुभाष चंद्र बोस
▪️ स्वातंत्र्यवीर सावरकर
Correct Answer: लोकमान्य टिळक
Gk Question : 3
लोकमान्य टिळकांचे पूर्ण नाव काय ?
▪️ बाळाजी गंगाधर टिळक
▪️ विश्वनाथ गंगाधर टिळक
▪️ श्रीधर गंगाधर टिळक
▪️ बाळ गंगाधर टिळक
Correct Answer: बाळ गंगाधर टिळक
Gk Question : 4
मंडालेच्या तुरुंगात इतिहास प्रसिद्ध गीतारहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला ?
▪️ गोपाळ गणेश आगरकर
▪️ लोकमान्य टिळक
▪️ स्वातंत्र्यवीर सावरकर
▪️ न्यायमूर्ती रानडे
Correct Answer: लोकमान्य टिळक
Gk Question : 5
लोकमान्य टिळकांच्या वडिलांचे नाव काय होते ?
▪️ गंगाधर श्रीहरीपंत टिळक
▪️ गंगाधर दामोदरपंत टिळक
▪️ गंगाधर रामचंद्रपंत टिळक
▪️ गंगाधर बाळाजीपंत टिळक
Correct Answer: गंगाधर रामचंद्रपंत टिळक
Gk Question : 6
महाराष्ट्रात शिवजयंती उत्सवाची सुरुवात कोणी केली ?
▪️ गाडगे बाबा
▪️ गोपाळ गणेश आगरकर
▪️ महात्मा फुले
▪️ लोकमान्य टिळक
Correct Answer: लोकमान्य टिळक
Gk Question : 7
बाळ गंगाधर टिळक यांच्या पत्नीचे नाव काय होते ?
▪️ अरुणा
▪️ मंजुळा
▪️ यशोदा
▪️ सत्यभामा
Correct Answer: सत्यभामा
Gk Question : 8
लोकमान्य टिळकांनी कोणाच्या सहकार्याने 1 जानेवारी 1880 रोजी पुणे येथे मोरोबा दादा फडणीस यांच्या वाड्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली ?
▪️ न्यायमूर्ती रानडे व विष्णुशास्त्री चिपळूणकर
▪️ गो.ग.आगरकर व न्यायमूर्ती रानडे
▪️ विष्णुशास्त्री चिपळूणकर व गोपाळ कृष्ण गोखले
▪️ विष्णुशास्त्री चिपळूणकर व गो.ग.आगरकर
Correct Answer: विष्णुशास्त्री चिपळूणकर व गो.ग.आगरकर
Gk Question : 9
लोकमान्य टिळकांनी केसरी हे वृत्तपत्र कोणत्या भाषेतून सुरू केले ?
▪️ इंग्रजी
▪️ मराठी
▪️ हिंदी
▪️ संस्कृत
Correct Answer: मराठी
Gk Question : 10
आधी राजकीय सुधारणा मग सामाजिक सुधारणा या मताचे व्यक्ती कोण होते ?
▪️ लोकमान्य टिळक
▪️ आगरकर
▪️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
▪️ महात्मा गांधी
Correct Answer: लोकमान्य टिळक
Gk Question : 11
लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना कोणता ग्रंथ लिहिला ?
▪️ माझी जन्मठेप
▪️ महाराष्ट्र दर्शन
▪️ गीतारहस्य
▪️ गीताई
Correct Answer: गीतारहस्य
Gk Question : 12
लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले मराठा हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेत होते ?
▪️ मराठी
▪️ संस्कृत
▪️ उर्दू
▪️ इंग्रजी
Correct Answer: इंग्रजी
Gk Question : 13
लोकमान्य टिळकांचा जन्म कोठे झाला ?
▪️ निफाड (नाशिक)
▪️ चिखली (रत्नागिरी)
▪️ महाड (रायगड)
▪️ टेंभू (सातारा)
Correct Answer: चिखली (रत्नागिरी)
Gk Question : 14
मराठा व केसरी ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली ?
▪️ लोकमान्य टिळक
▪️ गोपाळ गणेश आगरकर
▪️ बाळशास्त्री जांभेकर
▪️ विष्णुशास्त्री चिपळूणकर
Correct Answer: लोकमान्य टिळक
Gk Question : 15
लोकमान्य टिळक व --------- यांच्यामध्ये वैचारिक मतभेद होते
▪️ महात्मा गांधी
▪️ डॉ. आंबेडकर
▪️ गोपाळ गणेश आगरकर
▪️ न्यायमूर्ती रानडे
Correct Answer: गोपाळ गणेश आगरकर
Gk Question : 16
4 जानेवारी 1881 रोजी लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते ?
▪️ गोपाळ गणेश आगरकर
▪️ विष्णुशास्त्री चिपळूणकर
▪️ न्यायमूर्ती रानडे
▪️ लोकमान्य टिळक
Correct Answer: विष्णुशास्त्री चिपळूणकर
Gk Question : 17
खालीलपैकी कोणत्या प्रकरणात टिळक व आगरकरांना 101 दिवसाची शिक्षा ठोठावण्यात आली ?
▪️ ताई महाराज प्रकरण
▪️ कोल्हापूर बर्वे प्रकरण
▪️ दादाजी विरुद्ध रखमा प्रकरण
▪️ यापैकी नाही
Correct Answer: कोल्हापूर बर्वे प्रकरण
Gk Question : 18
'न्यू इंग्लिश स्कूल' पुणे चे संस्थापक सदस्य कोण होते ?
▪️ लोकमान्य टिळक
▪️ गोपाळ गणेश आगरकर
▪️ विष्णुशास्त्री चिपळूणकर
▪️ वरील सर्व
Correct Answer: वरील सर्व
Gk Question : 19
महाराष्ट्रात केसरी वृत्तपत्र केव्हा सुरू झाले ?
▪️ 1883
▪️ 1882
▪️ 1881
▪️ 1880
Correct Answer: 1881
Gk Question : 20
भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हटले जाते ?
▪️ लोकमान्य टिळक
▪️ वि.दा.सावरकर
▪️ चिपळूणकर
▪️ विष्णूशास्त्री
Correct Answer: लोकमान्य टिळक
Gk Question : 21
खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय नेतृत्वाचा मावाळांच्या गटात समावेश करता येणार नाही ?
▪️ बाळ गंगाधर टिळक
▪️ न्यायमूर्ती रानडे
▪️ गोपाळ कृष्ण गोखले
▪️ सुरेंद्रनाथ बॅनर्जी
Correct Answer: बाळ गंगाधर टिळक
Gk Question : 22
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ! हे विधान कोणत्या समाजसुधारकाचे आहे ?
▪️ सुभाष चंद्र बोस
▪️ बाळ गंगाधर टिळक
▪️ महात्मा गांधी
▪️ दादाभाई नौरोजी
Correct Answer: बाळ गंगाधर टिळक
Gk Question : 23
लोकमान्य टिळकांच्या आईचे नाव काय होते ?
▪️ हौसाबाई
▪️ पार्वताबाई
▪️ गोजराबाई
▪️ हिराबाई
Correct Answer: पार्वताबाई
Gk Question : 24
लोकमान्य टिळकांचे मूळ नाव काय ?
▪️ केशव
▪️ बाळाजी
▪️ विश्वनाथ
▪️ श्रीधर
Correct Answer: केशव
Gk Question : 25
जहाल व मवाळ यांच्यातील दुफळीमुळे १९०७ च्या सुरत अधिवेशनात काँग्रेसमध्ये फूट पडली. सुरतच्या या अधिवेशनात जहाल गटाचे नेतृत्व कोणाकडे होते ?
▪️ लोकमान्य टिळक
▪️ लाला लजपत राय
▪️ अरविंद घोष
▪️ बिपिन चंद्र पाल
Correct Answer: लोकमान्य टिळक
Gk Question : 26
लोकमान्य टिळकांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे कोणाच्या सहकार्याने सुरू केली ?
▪️ गोपाळ गणेश आगरकर
▪️ राजर्षी शाहू महाराज
▪️ गोपाळ कृष्ण गोखले
▪️ लोकहितवादी
Correct Answer: गोपाळ गणेश आगरकर
Gk Question : 27
लोकमान्य टिळक व आगरकरांनी 'डेक्कन एज्युकेशन सोसायटी' ची स्थापना कधी व कोठे केली ?
▪️ 24 ऑक्टोबर 1884 (मुंबई)
▪️ 24 ऑक्टोबर 1884 (पुणे)
▪️ 24 ऑक्टोबर 1884 (नाशिक)
▪️ 24 ऑक्टोबर 1884 (छ.संभाजीनगर)
Correct Answer: 24 ऑक्टोबर 1884 (पुणे)
Gk Question : 28
जून 1908 मध्ये लोकमान्य टिळकांवरील खटल्याची सुनावणी झाली त्यावेळी त्यांच्या कैदेच्या निषेधार्थ कोणी संपर्क पुकारला होता ?
▪️ पुणे येथील जनतेने
▪️ कोलकत्ता येथील व्यापाऱ्यांनी
▪️ बॉम्बे प्रांतातील शेतकऱ्यांनी
▪️ मुंबईमधील कामगारांनी
Correct Answer: मुंबईमधील कामगारांनी
Gk Question : 29
लोकमान्य टिळकांना मंडालेच्या तुरुंगात नेण्यापूर्वी कोणत्या तुरुंगात बंदिस्त करण्यात आले होते ?
▪️ येरवडा (पुणे)
▪️ आर्थर रोड (मुंबई)
▪️ हर्सूल (छ.संभाजीनगर)
▪️ तळोजा (नवी मुंबई)
Correct Answer: येरवडा (पुणे)
Gk Question : 30
खालीलपैकी कोणते प्रकरण टिळक व आगरकर यांच्या मतभेदास कारणीभूत ठरले ?
▪️ कोल्हापूर बर्वे प्रकरण
▪️ ताई महाराज प्रकरण
▪️ दादाजी विरुद्ध रखमा प्रकरण
▪️ वेदोक्त प्रकरण
Correct Answer: दादाजी विरुद्ध रखमा प्रकरण
Gk Question : 31
'तेल्या तांबोळ्याचा पुढारी' म्हणून कोणाला ओळखले जाते ?
▪️ विष्णुशास्त्री चिपळूणकर
▪️ बाळ गंगाधर टिळक
▪️ महात्मा गांधी
▪️ शाहू महाराज
Correct Answer: बाळ गंगाधर टिळक
Gk Question : 32
लोकमान्य टिळकांचे राजकीय गुरु कोण ?
▪️ गोपाळ कृष्ण गोखले
▪️ दादाभाई नौरोजी
▪️ न्यायमूर्ती रानडे
▪️ स्वामी विवेकानंद
Correct Answer: स्वामी विवेकानंद
Gk Question : 33
टिळकांनी गीतारहस्य हा ग्रंथ कोणत्या तुरुंगात असताना लिहिला ?
▪️ मंडाले
▪️ येरवडा
▪️ ऑर्थर
▪️ तिहार
Correct Answer: मंडाले
Gk Question : 34
लोकमान्य टिळकांनी कांग्रेसचे अध्यक्षपद किती वेळा भूषवले ?
▪️ 3
▪️ 2
▪️ 1
▪️ एकदाही नाही
Correct Answer: एकदाही नाही
Gk Question : 35
' स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ' अशी गर्जना लोकमान्य टिळकांनी कोणत्या चळवळीत केली ?
▪️ होमरुल चळवळ
▪️ असहकार चळवळ
▪️ छोडो भारत चळवळ
▪️ यापैकी नाही
Correct Answer: होमरुल चळवळ
Gk Question : 36
इ.स.वी. सन 1919 च्या मॉन्टेंग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यावर 'हे स्वराज्य नव्हे व त्याचा पायाही नव्हे' अशी टीका कोणी केली ?
▪️ महात्मा गांधी
▪️ दादाभाई नौरोजी
▪️ लोकमान्य टिळक
▪️ पंडित नेहरू
Correct Answer: लोकमान्य टिळक
Gk Question : 37
लोकमान्य टिळकांशी संबंधित खालील घटनांची कालानुक्रमे रचना करा व योग्य पर्याय निवडा ? अ) साराबंदी मोहीम, ब) गणेश उत्सव, क) होमरूल लीग, ड) शिवाजी उत्सव
▪️ क, अ, ड, ब
▪️ ड, क, ब, अ
▪️ अ, ब, क, ड
▪️ ब, ड, अ, क
Correct Answer: ब, ड, अ, क
Gk Question : 38
बाळ गंगाधर टिळक यांनी डॉ. ॲनी बेझंट यांच्याबरोबर स्थापन केलेल्या होमरूल लीगबाबत काय खरे नाही ?
▪️ तिचा उद्देश राष्ट्रीय संघटना वाढविण्याचा आणि त्यांना सशक्त करण्याचा होता
▪️ ब्रिटिशांनी तिला दडपण्याचे ठरविले, वर्तमानपत्रांची मुस्कटदाबी केली
▪️ मवाळांनी व मुस्लिम लीग पुढाऱ्यांनीही तिच्या कार्यक्रमात भाग घेतला
▪️ वरीलपैकी एकही नाही
Correct Answer: वरीलपैकी एकही नाही
Gk Question : 39
स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या चतुःसूत्रीचे पुरस्कर्ते कोण होते ?
▪️ बाळ गंगाधर टिळक
▪️ दादाभाई नौरोजी
▪️ गोपाळ कृष्ण गोखले
▪️ महात्मा गांधी
Correct Answer: बाळ गंगाधर टिळक
Gk Question : 40
खालीलपैकी कोण लोकमान्य टिळकांचे सहकारी मित्र व वकील होते ?
▪️ गोपाळ कृष्ण गोखले
▪️ गोपाळ गणेश आगरकर
▪️ जोसेफ बॅप्टीस्टा
▪️ न्यायमूर्ती महादेव रानडे
Correct Answer: जोसेफ बॅप्टीस्टा
Gk Question : 41
जर देवाने अस्पृश्यता सहन केली तर मी त्याला देव मानणार नाही असे उद्गार कोणी काढले ?
▪️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
▪️ बाळ गंगाधर टिळक
▪️ महात्मा गांधीं
▪️ महात्मा फुले
Correct Answer: बाळ गंगाधर टिळक
Gk Question : 42
............... स्फूर्ती घेऊन 1893 मध्ये लोकमान्य टिळकांनी गणपती सणाचे सार्वजनिक उत्सवात रूपांतर केले
▪️ बंगालच्या दुर्गा पूजेवरून
▪️ मुस्लिमांच्या मोहरम सणावरून
▪️ थोप किप्पूर सणावरुन
▪️ मुस्लिमांच्या ईद सणावरून
Correct Answer: मुस्लिमांच्या मोहरम सणावरून
Gk Question : 43
भारतातील पहिले राजकीय कैदी म्हणून कोणाला ओळखले जाते ?
▪️ बाळ गंगाधर टिळक
▪️ सुभाष चंद्र बोस
▪️ स्वातंत्र्यवीर सावरकर
▪️ महात्मा गांधी
Correct Answer: बाळ गंगाधर टिळक
Gk Question : 44
1897 मध्ये रॅड साहेबांच्या वधाला 'अफजलखानाचा वध' असे आपल्या लेखात संबोधल्याबद्दल कोणाला दीड वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली ?
▪️ गोपाळ गणेश आगरकर
▪️ लोकहितवादी
▪️ बाळ गंगाधर टिळक
▪️ न्यायमूर्ती रानडे
Correct Answer: बाळ गंगाधर टिळक
Gk Question : 45
खालील व्यक्तीपैकी कोणी फर्ग्युसन महाविद्यालयात गणिताचे अध्यापन केले होते ?
▪️ बाळ गंगाधर टिळक
▪️ गोपाळ कृष्ण गोखले
▪️ महर्षी कर्वे
▪️ वरील सर्व
Correct Answer: वरील सर्व
Gk Question : 46
लोकमान्य टिळकांनी 1881 मध्ये सुरू केलेल्या छापखान्याचे नाव काय होते ?
▪️ आर्यभूषण
▪️ समाजभूषण
▪️ पद्मभूषण
▪️ लोकभूषण
Correct Answer: आर्यभूषण
Gk Question : 47
लोकांमध्ये एकीची भावना निर्माण व्हावी यासाठी लोकमान्य टिळकांनी कोणता उत्सव सुरू केला ?
▪️ नवरात्रोत्सव
▪️ गणेशोत्सव
▪️ शिवजयंती
▪️ यापैकी नाही
Correct Answer: गणेशोत्सव
Gk Question : 48
लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या मराठा या इंग्रजी वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते ?
▪️ आगरकर
▪️ लोकहितवादी
▪️ चिपळूणकर
▪️ लोकमान्य टिळक
Correct Answer: लोकमान्य टिळक
Gk Question : 49
खालीलपैकी कोणता ग्रंथ लोकमान्य टिळकांनी लिहिलेला नाही ?