
संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर आधारित
सराव प्रश्नसंच
Sant Gadge Baba Question Answer MCQ Quiz In Marathi
महाराष्ट्रातील महान संत आणि समाजसुधारकांपैकी संत गाडगेबाबा हे स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन आणि समाजसेवेचे प्रतीक म्हणून ओळखले जातात
गाडगेबाबांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजातील गरिब, पीडित आणि वंचितांच्या सेवेसाठी अर्पण केले. ते गावोगावी फिरून स्वच्छतेचा प्रचार करत, लोकांना अंधश्रद्धा सोडण्याचे आणि शिक्षण घेण्याचे आवाहन करत. त्यांनी अनेक धर्मशाळा, शाळा आणि धर्मादाय संस्थांची स्थापना केली
Sant Gadge Baba Question In Marathi : या ब्लॉग पोस्टमध्ये, आम्ही संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर आधारित 25+ बहु-निवडक प्रश्नांचा (MCQ) संच तयार केला आहे.
हे प्रश्न विशेषत: तुम्हाला विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मदत करण्यासाठी तयार केले गेले आहेत . खाली दिलेले सर्व प्रश्न काळजीपूर्वक वाचा , प्रश्नसंचामध्ये चूक आढळल्यास कमेंट जरूर करा ....
श्री संत गाडगे महाराज
GK Question : 1
संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव काय होते ?
Correct Answer: डेंबुजी झिंगराजी जानोरकर
GK Question : 2
श्री संत गाडगे महाराजांचा जन्म कधी झाला ?
Correct Answer: 23 फेब्रुवारी 1876
GK Question : 4
संत गाडगे महाराज यांच्या वडिलांचे नाव काय होते ?
Correct Answer: झिंगराजी
GK Question : 5
............ यांना आपण गाडगेबाबा म्हणून ओळखतो ?
Correct Answer: डेंबुजी झिंगराजी जानोरकर
GK Question : 6
सद्गुरु श्री संत गाडगे महाराजांचा मृत्यू कधी झाला ?
Correct Answer: 20 डिसेंबर 1956
GK Question : 7
संत गाडगे महाराज यांना एकूण किती वर्ष आयुष्य लाभले ?
Correct Answer: 76 वर्ष
GK Question : 8
श्री संत गाडगेबाबा यांच्या आईचे नाव काय होते ?
Correct Answer: सखुबाई
GK Question : 9
अमरावती जिल्ह्यातील ऋणमोचन येथे संत गाडगे महाराज यांनी कोणते मंदिर बांधले ?
Correct Answer: लक्ष्मीनारायण मंदिर
GK Question : 10
श्री संत गाडगे महाराज यांच्या पत्नीचे नाव काय होते ?
Correct Answer: कुंताबाई
GK Question : 11
संत गाडगे महाराजांनी घरादाराचा त्याग करून केव्हा संन्यास स्वीकारला ?
Correct Answer: 1905
GK Question : 12
संत गाडगेबाबा महाराज यांचे मते देव कोठे आहे ?
Correct Answer: माणसात
GK Question : 13
" मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव , देव बाजाराचा भाजीपाला नाही रे " हे भक्तिगीत कोणाचे आहे ?
Correct Answer: संत गाडगे महाराज
GK Question : 14
20 डिसेंबर 1956 रोजी ( वलगाव , जि. अमरावती ) येथे कोणत्या नदीच्या काठावर श्री संत गाडगे बाबांचा मृत्यू झाला ?
Correct Answer: पेढी
GK Question : 15
संत गाडगे महाराज यांचा जन्म कोठे झाला ?
Correct Answer: शेणगाव ( ता. दर्यापूर )
GK Question : 16
" डेबू " हा गाडगे महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट कोणी दिग्दर्शित केला आहे ?
Correct Answer: नीलेश जलमकर
GK Question : 17
दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणून कोणाला ओळखले जाते ?
Correct Answer: संत गाडगे महाराज
GK Question : 18
संत गाडगे महाराज जातीने कोण होते ?
Correct Answer: परीट
GK Question : 19
महाराष्ट्रातील ग्राम स्वच्छता अभियानाला कोणत्या संताचे नाव दिले आहे ?
Correct Answer: संत गाडगे महाराज
GK Question : 20
" सिंहाला पहावे वनात , हत्तीला पहावे रानात " तसे " गाडगेबाबांना पहावे कीर्तनात " असे गाडगे महाराजांच्या कीर्तनाबद्दल कोणी म्हटले आहे ?
Correct Answer: प्रल्हाद केशव अत्रे
GK Question : 21
गाडगे महाराजांनी कीर्तनाद्वारे आपले लोकशिक्षणाचे कार्य कोणत्या गावापासून सुरू केले ?
Correct Answer: ऋणमोचन
GK Question : 22
कोणत्या विद्यापीठाला सद्गुरु संत गाडगेबाबांचे नाव देण्यात आले आहे ?
Correct Answer: अमरावती विद्यापीठ
GK Question : 23
श्री संत गाडगे महाराजांचे आवडते भजन कोणते होते ?
Correct Answer: " गोपाला ! गोपाला ! देवकीनंदन गोपाला "
GK Question : 24
श्री संत गाडगेबाबांच्या गुरूंचे नाव काय होते ?
Correct Answer: संत तुकाराम महाराज
GK Question : 25
काही दृष्ट सामाजिक रुढींना विरोध दर्शविण्यासाठी गाडगे महाराजांनी कोणत्या पारंपारिक प्रचार पद्धतीचा वापर केला ?
Correct Answer: किर्तन
Your Score
Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /